ही कल्पना की आपण कायमचे कोठेतरी राहणार आहोत याने मानवी इतिहासाला वळण दिले आहे. जेव्हा मी मिसर देशाला भेट दिली, मार्गदर्शकाने मला सांगितले की मिसर च्या पिऱ्यामीड मध्ये, मसाले लावलेल्या शरीराच्या बाजूला काही नकाशे त्यांच्या शेजारी ठेवलेले आहेत की भविष्यातील जगासाठी त्यांचे मार्गदर्शक असे व्हावे. पाहा, हेच ते काय विश्वास ठेवतात.
रोम, इटली मध्ये, रोमनगुहेत जेथे अनेक ख्रिस्ती हुतात्म्यांची शरीरे ही पुरलेली आहेत. ही गुहेतील कबरे दुसऱ्या शतकातील आहेत. ह्या गुहेच्या कबरेतील भिंतीवर सुंदर चित्रासह स्वर्गाचे चित्रण केलेले आहे, लेकरे खेळत आहे आणि लोक मोठया जेवणावळीत स्वाद घेत आहेत हे पाहू शकतात.
काही वर्षांपूर्वी जेव्हा मी प्रार्थने मध्ये होतो, मला स्वर्गाचा दृष्टांत झाला जेथे मी स्वर्गात इमारतीपाहिल्या.ह्या इमारती फार उंच होत्या आणि त्यांचा बाह्य भाग अतिशय चमकदार प्रखर होता. हे एका विशाल नगरा सारखे होते. त्या नगरावर एका प्रकारचे तेज होते.
आता काहींसाठी, हे एका परीकथे सारखे वाटेल परंतु हे सर्व पवित्र शास्त्रात खोलवर रुजलेले आहे.
प्रेषित पौलाने फिलिप्पै करांस लिहिताना म्हटले आहे,
कारण मला तर जगणे हे खिस्त आणि मरणे हे लाभ आहे; मी ह्या दोहोंसंबंधाने पेचात आहे; येथून सुटून जाऊन ख्रिस्ताजवळ असण्याची मला उत्कंठा आहे; कारण देहांत राहण्यापेक्षा हे फारच चांगले आहे.(फिलिप्पै १: २१, २३)
म्हणून आम्ही सर्वदा धैर्य धरतो; आणि हे लक्षात बाळगतो की, आम्ही शरीरात वस्ती करीत आहो तोवर आम्ही प्रभूपासून दूर आलेले असे आहो.
आम्ही धैर्य धरतो, आणि शरीरापासून दूर जाऊन प्रभूसह गृहवास करणे हे आम्हांस अधिक बरे वाटते. (२ करिंथ ५: ६, ८)
आपल्यापैकी अनेक हे माझे ऐकत आहात, काही समयानंतर काहीनी प्रियजनांनागमावले आहे. आपण सर्व भरंवसा ठेवतो आणि विश्वास धरतो की ते एका चांगल्या ठिकाणी आहेत.
कधीकधी भीती आणि शंका आपल्या मनात येतात आणि आपण आश्चर्य करतो, "आपण कधी तेथे जाऊ शकणार काय"
फ्रांस चा राजा, ल्युईस १४, त्याने एक नियम पारित केला की शब्द 'मृत्यू' त्याच्यासमोर कधीही उच्चारला नाही पाहिजे. ते असे की तो मृत्यू ला किती घाबरत होता.
प्रभु येशूने ह्या विषयाला संबोधित असे म्हटले, "तुमचे अंत:कारण अस्वस्थ होऊ देऊ नका, तुम्ही देवावर विश्वास ठेवा, आणि माझ्यावर सुद्धा विश्वास ठेवा."
प्रभु येशू मुख्यतः हे म्हणत होता, "तुम्ही देवावर विश्वास ठेवता, ते चांगले आहे, तुम्हाला त्यावर विश्वास ठेवण्याची सुद्धा गरज आहे" तो पित्याकडे जाण्याचा मार्ग आहे.
येशूने मग त्यांना सार्वकालिक आश्रयस्थानाची खात्री दिली.
तुमचे अंत:कारण अस्वस्थ होऊ नये; देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत; नसत्या तर मी तुम्हांला तसे सांगितले असते; मी तुम्हांसाठी जागा तयार करावयास जातो; आणि मी जाऊन तुम्हांसाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हाला आपल्याजवळ घेऊन; ह्यासाठीकी, जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे. (योहान १४: १-३)
लक्षात घ्या प्रभु येशूने सामान्य शब्द जसे घर, राजवाडा, एक ठिकाण असे वापरले की वर्णन करावे की तो कोठे जात आहे आणि तो आपल्यासाठी काय तयार करीत आहे. त्यास पाहिजे होते की त्याच्या शिष्यांना भविष्यात काहीतरी ज्याकडे पाहावेकी जेथे आपण जाऊ शकतो आणि त्याच्यासह राहू शकतो.
स्वर्गाचे आश्वासन हे महत्वाचे आहे. त्याने असंख्य लोकांस सांत्वन आणि आशा आणली आहे जेव्हा ते मृत्यूचा सामना करतात मग ते घरी किंवा हॉस्पिटल मध्ये खाटेवर पडलेले असो. स्वर्ग हे खरे ठिकाण आहे-सार्वकालिक घर.
प्रार्थना
प्रभु येशू, तूं देवाचा पुत्र आहे आणि देवाकडे जाण्याचा एकच मार्ग आहे. मी तुला माझा प्रभु आणि तारणारा असे स्वीकारतो. माझ्यासाठी वधस्तंभावर तुझ्या अनमोल बलिदान साठी मी तुझा आभारी आहे. परमेश्वरा मला तुला आणखी घनिष्ठपणे ओळखायचे आहे. मी तुला ह्या कृपे साठी प्रार्थना करतो. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● विश्वास जो जय मिळवितो● अनिश्चिततेच्या काळात उपासनेचे सामर्थ्य
● आध्यात्मिक वाढीचे शांत गुदमरवणारे
● दिवस ०५:४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
● तुम्ही मत्सरास कसे हाताळाल
● आज पवित्र व्हा आणि अद्भुत कृत्येउद्या होतील
● प्राचीन इस्राएलच्या घरांकडून शिकवणी
टिप्पण्या