आपण आपल्या शृंखलेत राहू: यहूदा च्या जीवनाकडून धडा
तो बेथानी येथेकुष्टरोगी शिमोन ह्याच्या घरी जेवावयास बसला असता कोणीएक स्त्री जटामांसीच्या फार मौल्यवान सुगंधी तेलाने भरलेली अलाबास्त्र कुपी घेऊन आली; तिने ती कुपी फोडून त्याच्या मस्तकावर ओतिली.
तेव्हा कित्येक जण आपसांत चडफडून म्हणाले, ह्या सुगंधी तेलाची अशी नासाडी कशासाठी केली? (मार्क १४: ३-४).
जेव्हा स्त्री ने इतके महागडे तेल प्रभु येशूच्या मस्तकावर ओतिले, यहूदा हा खूप निराश झाला होता.त्या स्त्री ने येशू ला काहीतरी दिले असते तर ते त्यास ठीक वाटत होते-परंतु सर्व काही नाही, असाव्यक्ति कदाचित शेवटी सर्वकाही गमावून बसू शकतो. ह्या विषयाची वास्तविकता ही; यहूदा ने कधीही स्वतःला येशूला पूर्णपणे समर्पित केले नव्हते. तो नेहमीच त्याच्या स्वतःचा कार्यक्रम घेऊन चालला होता.
आज सुद्धा, येथे अनेक लोक आहेत जे येशूला केवळ काही समर्पित करतात म्हणजे ते स्वर्गात जातील परंतु इतके नाही की ज्याने त्यांच्या जीवनाला अडथळा होईल. असे लोक येशूवर सार्वकालिक जीवनासाठी भरंवसा ठेवतात परंतु दैनंदिन जीवनासाठी नाही. जर तुम्हांला येशूचे सर्वकाही पाहिजे तर तुम्ही तुमचे सर्व काही त्यास समर्पित केले पाहिजे!
दुसरे, स्त्री ने जो काही उपासनेचा विचार केला होता ते यहूदा च्या दृष्टिने वायफळ होते. दु:खद आहे की, आजच्या वेळेत सुद्धा, अनेक लोक जे बाह्यरित्या ख्रिस्ताला समर्पित आहेत असे दिसतात ते उपासनेला वायफळ असे समजतात. त्यांच्या व्यक्तिगत भक्ती समयादरम्यान, ते प्रभूची उपासना कधीही करीत नाहीत. ते कदाचित प्रार्थना करतील परंतु उपासना करीत नाहीत.
ते उपासनेला हजर राहतात परंतु ते उपासनेला कधीही वेळेवर येत नाहीत. जेव्हा प्रश्न केला तर, तेअत्यंत आध्यात्मिक उत्तर देतात हे म्हणत, 'की मी वचनासाठी येतो.' आजच निर्णय करा कीतुम्ही उपासनेला वेळेवर याल आणि त्याची उपासना कराल.
ह्या स्त्रीला स्पष्टपणे समजआणि गहन कृतज्ञता होती कीतिला किती क्षमा केली गेली आहे. जर आपल्याला किती क्षमा केली गेली आहे याचा खरच विचार केला; तो आपल्याला किती प्रेम करतो; तर मग आपण सुद्धा प्रभूची अधिक आणि अधिक उपासना करू.
प्रार्थना
मी तुझ्या योजनेला समर्पित होतो मग याची पर्वा नाही की ते कोठे नेईल, परमेश्वरा, मी तुला विनंती करीत आहे की मला घे आणि माझा उपयोग कर जे केवळ तूच करू शकतो, तुला मी कसा व्यक्ति हवा आहे तसे होण्यास मला साहाय्य कर. येशूच्या नांवात, मी प्रार्थना करतो. आमेन.
Join our WhatsApp Channel

Most Read
● कृतज्ञतेसाठी एक धडा● गुप्त गोष्टी समजून घेणे
● स्वतःवरच घात करू नका
● परमेश्वरा सोबत चालणे
● ख्रिस्तासाठी राजदूत
● दिवस १८:४० दिवसांचा उपवास आणि प्रार्थना
● चालण्यास शिकणे
टिप्पण्या