एके दिवशी, प्रभु येशूने त्याच्या शिष्यांना घोषणा केली की आता त्याच्यासाठी वेळ आली आहे की त्यास वधस्तंभावर खिळण्यात यावे आणि त्याचे सर्व शिष्य त्यास सोडून जातील.
पेत्राने त्याला उत्तर दिले, आपणांविषयी सर्व अडखळले तरी मी कधीही अडखळणार नाही." (मत्तय २६: ३३)
परंतु केवळ एक दिवसानंतरच, पेत्र त्याचे वचन पाळू शकला नाही आणि त्याने प्रभूचा नकार केला. पेत्राप्रमाणे आपल्यापैकी अनेकांनी प्रभूला अनेक आश्वासने दिली आहेत परंतु आपण प्रत्यक्षात ती वचने पाळलेली नाहीत.
आपल्यापैंकी अनेक ह्या क्षेत्रात संघर्ष करतो
जेव्हा तुम्ही "हो-मीतुमच्यासाठी प्रार्थना करेन" असे प्रत्युत्तर देता,-तुम्ही खरेच तसे करता काय?
जेव्हा तुम्ही म्हणता अमुक अमुक वेळी तुम्ही तेथे असाल-तुम्ही वेळेवर येता काय?
जेव्हा तुम्ही कोणाला एका ठरलेल्या तारखेला दिलेले कर्ज परत देण्याचे आश्वासन देता- तुम्ही ते करता काय
तुम्हांला लक्षात आले का!
परमेश्वर त्याचे वचन पाळतो (तीताला पत्र १:२), आणि त्याची लेकरे म्हणून, आपल्याला त्याच्यासारखे झाले पाहिजे (इफिस ५: १).
परमेश्वर निर्भर राहतो आणि त्याच्या लोकांनी निर्भर राहावयास पाहिजे. ख्रिस्ती लोक हे प्रामाणिकपणा साठी ओळखले जावयास पाहिजे.
एक महान व्यक्तीने एकदा म्हटले, "जसे मी वयाने वाढतो, लोक काय बोलतात त्याकडे मी कमी लक्ष देतो, मी केवळ त्याकडे लक्ष देतो ते काय करत आहेत," तेविद्वत्तापूर्ण वाक्य आहे.
त्यांचे एक सर्वांत महत्वाचे गुण हे आहे ज्यांस परमेश्वराबरोबर घनिष्ठ संबंध बनवायचे आहे हे स्तोत्रसंहिता १५: ४ मध्ये उल्लेखिलेले आहे, ते त्यांची आश्वासने पाळतात...जरी जेव्हा त्यांचे अहित होते.
मान हा जे लोक विचार करतात की तुम्ही कोण आहात आणि चरित्र हे परमेश्वर काय बोलत आहे जे तुम्ही आहात. तुमचे वचन पाळणे हे तुमच्या आंतरिक चरित्रगुणांमध्ये वाढ करणे होय. जेव्हा लोक पाहतात किंवा जाणतात की तुम्ही वचन पाळणारे पुरुष किंवा स्त्री आहात, तेव्हा तुम्ही भक्कम विश्वसनीयता विकसित कराल आणि अविश्वसनीय प्रभाव प्राप्त कराल.
जे काही आपण बोलले तसे करण्यात अपयशी झालो तर, आपल्या सभोवतालच्या लोकांमध्ये त्याविषयी निराशा आणि चिडचिड निर्माण होऊ शकते. कारण हे उघड आहे की, लोक हे आपल्या वक्तव्यांच्या अचूकतेवर आधारित योजना आणि आश्वासने करीत असतात. जर आपण तसे करण्यात कमी पडलो तर, ते इतरांच्या बाबतीत तसेच करतात. तुमच्या स्वतःला निराशा-निर्माण करणारा असे पाहण्यापेक्षा निराशा-कमी करणारा असे पाहण्यास सुरुवात करा.
आध्यात्मिकदृष्टया म्हटले तर येथे दोन महत्वाच्या शिकवणी आहेत की आपले वचन पळावे.
# १ म्हणजे आपला विश्वास हा कार्य करेल जसे त्याने केले पाहिजे.
प्रभु येशूने आपल्याला शिकविले आहे: "मी तुम्हांला खचित सांगतो की, जो कोणी ह्या डोंगराला तूं उपटून समुद्रात टाकला जा, असे म्हणेल आणि आपल्या अंत:करणात शंका न बाळगता, आपणम्हणतो तसे घडेलच असा विश्वास धरील त्याच्या शब्दाप्रमाणे घडून येईल." (मार्क ११: २३)
विश्वासाने प्रभावीपणे कार्य करण्यासाठी आपण जे बोलतो त्यागोष्टींवर विश्वास ठेवला पाहिजे आणि ज्यावर आपण विश्वास ठेवतो त्याच गोष्टी बोलल्या पाहिजे. जर आपण आपले शब्द पाळले नाही, ते आपल्या विश्वासावर परिणाम करेल. जर आपल्याला विश्वासात चालावयाचे आहे, आणि अशा प्रकारे परमेश्वराने जे सर्व आशीर्वाद आपल्याला दिले आहेत त्याचा आनंद घ्यावा, तर मग आपण जे बोलतो त्यावर विश्वास ठेवला पाहिजे आणि ज्यावर आपण विश्वास ठेवतो त्याच गोष्टी बोलल्या पाहिजेत.
# २ प्रत्येक शब्द जो तुम्ही बोलता (बोलण्याने किंवा लिहिण्या द्वारे)तो देवा साठी महत्वाचा आहे
परमेश्वर ज्याने विश्व शब्द बोलण्याने घडविले तो तुम्ही तुमचे शब्द कसे वापरता त्याकडे बारकाईने लक्ष देतो.
शब्दांमध्ये आध्यात्मिक सामर्थ्य आहे जे एकतर इतरांना साहाय्य किंवा हानी पोहचवू शकते. (नीतिसूत्रे १८: २१)
प्रभु येशूने हे बोलत शिकविले, "मी तुम्हांस सांगतो की, माणसे जो जो व्यर्थ शब्द बोलतील त्याचा हिशेब त्यांना न्यायाच्या दिवशी दयावा लागेल. कारण तूं आपल्या बोलण्यावरून निर्दोषी ठरशील आणि आपल्या बोलण्यावरून दोषी ठरशील." (मत्तय १२: ३६-३७)
म्हणून बोलणे, संदेश, ईमेल, किंवाशब्द वापरणे की आश्वासने देणे हे करू नका जेव्हा तुम्ही तसे खरेच करणार नसाल.
आता कधीकधी, आपण आपल्या स्वतःला आपल्या नियंत्रणाबाहेरील परिस्थती मध्ये पाहतो जेथे आपण जे आश्वासन दिले आहेत ते पाळणे हे शक्यतो अशक्य असे दिसते. अशा प्रकरणात, आपण क्षमा मागावी,आणि जीवनात पुढे जावे, देवालाकृपा आणि सामर्थ्य मागत की पुढच्या वेळी चांगले करण्यास आम्हांला साहाय्य कर.
प्रार्थना
पित्या, येशूच्या नांवात, नेहमी माझे वचन पाळण्यात मला साहाय्य कर.
पित्या, येशूच्या नांवात, माझ्या ओठांना अभिषेक कर म्हणजे मी केवळ तेच योग्य शब्द बोलावे जे तुझ्या दृष्टीसमोर योग्य आहेत.
पित्या, येशूच्या नांवात, माझ्या ओठांना अभिषेक कर म्हणजे मी केवळ तेच योग्य शब्द बोलावे जे तुझ्या दृष्टीसमोर योग्य आहेत.
Join our WhatsApp Channel
Most Read
● परिवर्तनाची किंमत● निंदा संबंधाला नष्ट करते
● स्वप्न पाहण्याचे धाडस करा
● वातावरणावर महत्वाची समज- ४
● दानीएलाच्या उपासादरम्यान प्रार्थना
● पवित्र आत्म्यासाठी संवेदनशीलता विकसित करावी-१
● या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आनंद कसा अनुभवायचा
टिप्पण्या