तुम्ही कशाविषयी जास्त घाबरता?
इतक्या वर्षांमध्ये, जेव्हाकेव्हा मी "भीती" या विषयावर संदेश दिला आहे, उपासने नंतर, मी नेहमी लोकांना विचारतो, "तुम्ही कशाविषयी जास्त घाबरता?"
मला विभिन्न उत्तरे मिळाली आहेत- काही मनोरंजक आणि विचार करण्याजोगे. येथे अनेक गोष्टी आहेत ज्याविषयी लोक घाबरून आहेत, परंतु येथे तीन सर्व सामान्यभीतीचीकारणे आहेत:
सर्वात सामान्यभीती
१.सार्वजनिक क्षेत्रात बोलणे
पेशा किंवा भौगोलिक स्थान याची पर्वा नाही अक्षरशः लोक सर्व लोकांमध्ये बोलण्यास घाबरतात.
एक पास्टर म्हणून, पुढारीतयार करण्यास मला आवडते.
तथापि, जेव्हा मी लोकांना पुढे येऊन प्रार्थना करण्यास, वचन प्रचार करण्यास आमंत्रित करतो. काही सरळपणे अस्वीकार करतात भीतीमुळे. अशा प्रकारच्या भीतीने त्यांच्या आध्यात्मिक वाढीला आळा बसविला आहे.
२. अस्वीकार केले जाण्याची भीती
अस्वीकार केले जाण्याची भीतीही मूळतः "नाही" ऐकणे किंवा आपल्या कल्पना अस्वीकार करणे आहे.
हे प्रत्युत्तर त्या लोकांमध्ये बरेच सामान्य आहे जे जीवनाचा जोडीदार शोधत आहे. मला आठवते एक तरुण मुली ने मला लिहिले होते, जिने म्हटले होते की तिला आत्महत्या करायची होती कारण वैवाहिक जोडीदार शोधण्याच्या भेटी मध्ये तीचा 11 वेळा नकार केला गेला होता.
तिच्यासाठी प्रार्थना केल्या नंतर, मी तिला सल्ला दिला की तिच्या भीतीचा सामना कर. सुवार्ता ही आहे की आज ती आनंदात विवाहित आहे.
अस्वीकार केले जाण्याची भीती ही विक्री करणाऱ्या व्यक्तींमध्ये खूपच सामान्य आहे विशेषतः त्यांच्यामध्ये जे सहज फोन करतात.
३. अपयशाची भीती
मला वरदान चा दाखला आठवतो जो येशूने सांगितला होता. स्वामी ने प्रत्येक सेवकास काही वरदान दिले होते की त्यांनी "त्याच्या योग्यतेनुसार" ते निवेश करावे. दोन सेवकांनी बुद्धिमत्तापूर्वक त्याचा निवेश केला. तथापि, तिसऱ्या व्यक्तीने त्याचे दान पुरून ठेवले. जेव्हा स्वामी परत आला, तो मनुष्य हे बोलला:
"नंतर ज्याला एक हजार मिळाले होते तोही येऊन म्हणाला, महाराज, मी जाणून होतो की, तुम्ही कठोर माणूसआहा; जेथे तुम्ही पेरिले नाही तेथे कापणी करिता व जेथे पसरून ठेविले नाही तेथून गोळा करिता; म्हणून मी भ्यालो व तुमचे हजार रुपये मी जाऊन जमिनीत लपवून ठेवले होते; पाहा, ते तुमचे तुम्हांला मिळाले आहेत." (मत्तय २५: २४-२५)
काळजीपूर्वक लक्षात घ्या, त्या मनुष्याने का निवेश केला नाही, तो अपयश बाबतीत घाबरला होता.
मी विश्वास ठेवतो, आपण देवाच्या सामर्थ्याचा अधिक अनुभव करीत नाही आणि त्याचे अधिक चमत्कार पाहत नाही त्याचे मुख्य कारण म्हणजे आपणअपयशाबद्दल घाबरत असतो. दुष्ट सेवका सारखे, आपण आपल्या संधी जमिनीत पुरतो आणि मग कुरकरू करतो की काहीही घडत नाही.
अपयशाच्याभीतीने अनेक विध्यार्थ्यांना मरी आणली आहे आणि त्यांच्या वैयक्तिक कारकीर्द मध्ये वाढ थांबविली आहे.
माझ्या बंधुंनो, नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हांला तोंड दयावे लागते तेव्हा तुम्ही आनंदच माना. तुम्हांस ठाऊक आहे की, तुमच्या विश्वासाची पारख उतरल्याने धीर उत्पन्न होतो; आणि धीराला आपले कार्य पूर्ण करू दया, ह्यासाठीकी, तुम्ही कशातही उणे न होता तुम्हांला अखंड परिपूर्णता प्राप्त व्हावी. (याकोब १: २-४)
अपयशाने निराश होऊ नका. एकच वेळ जेव्हा यश हे अशक्य होते जेव्हा तुम्ही धैर्य सोडून देता-म्हणूनधैर्य सोडू नका. परमेश्वर आपल्या पक्षाचा आहे.
प्रार्थना
पित्या, येशूच्या नांवात, मी तुला कृपेसाठी मागतो की विश्वासाद्वारे चालावे आणि भावनांवर अवलंबून राहू नये.
Join our WhatsApp Channel
Most Read
● आध्यात्मिक दरवाजे बंद करणे● कृपे द्वारे तारण पावलो
● दीर्घ रात्रीनंतर सूर्योदय
● प्रीति-जिंकण्याची योजना -१
● परमेश्वराकडून सल्ल्याची गरज
● त्याच्या पुनरूत्थानाचे साक्षीदार कसे व्हावे-२
● कृत्रिम बुद्धिमत्ता ख्रिस्तविरोधक आहे काय?
टिप्पण्या