डेली मन्ना
दिवस ०१ : ४० दिवस उपास व प्रार्थनेचे
Friday, 22nd of November 2024
46
32
363
Categories :
उपास व प्रार्थना
देवाबरोबर गहन संबंधात
"हे देवा, तू माझा देव आहेस; मी आस्थेने तुझा शोध करीन; शुष्क, रुक्ष व निर्जल प्रदेशांत माझा जीव तुझ्यासाठी तान्हेला झाला आहे, माझ्या देहालाही तुझी उत्कंठा लागली आहे. अशा प्रकारे तुझे बळ व वैभव पाहण्यास पवित्रस्थानी मी तुझ्याकडे दृष्टि लाविली आहे. तुझे वात्सल्य जीवनाहून उत्तम आहे; माझे ओठ तुझे स्तवन करितील." (स्तोत्र. ६३:१-३)
येशूचे अनुसरण करण्यात आपण गंभीर आहात काय? तो "नेहमी एकांतात जात असे, आणि प्रार्थना करीत असे" (लूक ५:१६). "तो एका डोंगरावर गेला की स्वतः तेथे प्रार्थना करावी" (मत्तय १४:२३). याकोब जो फसविणारा तो "इस्राएल, देवाबरोबर राजकुमार" कसा झाला? (उत्पत्ति ३२:२८ वाचा). बायबल म्हणते, "तो एकटाच राहिला होता, आणि एका मनुष्याने (देवाचा एक दूत) पहाट होईपर्यंत त्याच्याशी झोंबाझोंबी केली. (उत्पत्ति ३२:२४)
ज्याप्रमाणे विवाह हा कमकुवत होईल जर पती व पत्नी हे कधीही एकटे असे राहणार नाहीत, त्याचप्रमाणे, आपले संबध ख्रिस्ताबरोबर अपयशी ठरेल जर आपल्या आध्यात्मिक जीवनात त्याच्याबरोबर कोणताही वेळ एकटेच घालविला याचा समवेश नसेल. व्यत्ययाच्या या युगात, देवाबरोबर एकाकी वेळ घालविणे ही प्राथमिकता झाली पाहिजे.
देवाबरोबर एकटे कसे व्हावे
१. प्रार्थनेसाठी एक विशेष वेळ निश्चित करा
प्रतिदिवशी तीन वेळा प्रार्थना करण्याची दानीएलास सवय होती. "हया फर्मानावर सही झाली आहे असे दानीएलाने ऐकले तेव्हा तो आपल्या घरी गेला; त्याच्या खोलीतल्या खिडक्या यरुशलेमेच्या दिशेकडे असून उघडया होत्या; त्याने आपल्या नित्यक्रमाप्रमाणे दिवसातून तीनदा गुडघे टेकून प्रार्थना केली व आपल्या देवाचा धन्यवाद केला." (दानीएल ६:१०)
उपास समयाच्या यावेळी, याची खात्री करा की तुम्ही देवाबरोबर प्रार्थना व संगतीसह चांगला वेळा व्यतीत करावा. यिर्मयाने लिहिले, "विनोद करणाऱ्या मंडळीत मी बसलो नाही, मी मजा केली नाही; तुझा हात मजवर पडल्यामुळे मी एकांती बसलो; कारण तू मला अस्वस्थ केले आहे." (यिर्मया १५:१७)
२. उपासना व स्तुति
आपल्याला प्रोत्साहन देण्यात आले आहे की आपण देवाच्या उपस्थितीत धन्यवाद व स्तुतीद्वारे प्रवेश करावा.
"त्याचे उपकारस्मरण करीत त्याच्या द्वारांत स्तवन करीत त्याच्या अंगणात प्रवेश करा; त्याचे उपकारस्मरण करा; त्याच्या नावाचा धन्यवाद करा." (स्तोत्र १००:४)
३. आध्यात्मिक प्रार्थना करणे
प्रार्थना करण्याचे दोन प्रकार आहेत
- मानसिक प्रार्थना करणे आणि
- आध्यात्मिक प्रार्थना करणे
मानसिक प्रार्थना ही तेव्हा होते जेव्हा तुम्ही तुमची समज व मनाने प्रार्थना करिता, तर आध्यात्मिक प्रार्थना करणे तेव्हा होते जेव्हा तुम्ही अन्य भाषेमध्ये प्रार्थना करिता.
"कारण जर मी अन्य भाषेत प्रार्थना केली तर माझा आत्मा प्रार्थना करितो, पण माझ्या बुद्धीचा उपयोग कोणाला होत नाही. तर मग काय? मी प्रार्थना आत्म्याच्या सामर्थ्याने करणार व बुद्धीच्या सामर्थ्यानेही करणार; मी स्तोत्र आत्म्याच्या सामर्थ्याने गाणार व बुद्धीच्या सामर्थ्यानेही गाणार." (१ करिंथ. १४:१४-१५)
४. पवित्र शास्त्राचा अभ्यास व संशोधन करा
जेव्हा तुम्ही पवित्र शास्त्र वाचता, तेव्हा तुम्ही देवाबरोबर सरळपणे संगतीमध्ये आहात. देवाचे वचन हे देव आहे आणि देवाचे वचन वाचण्याचा अनुभव हे देवाबरोबर व्यक्तिगतरीत्या संभाषण करण्यासारखे आहे.
देवाबरोबर एकटे असण्याचे लाभ
- रहस्ये ही प्रकट केली जातील
परमेश्वर हा सर्व-ज्ञानी व सर्व-जाणणारा आहे. त्याच्याबरोबर एकाकी वेळ घालवून तुम्ही अज्ञानी राहू शकत नाही. "तो गहन व गूढ गोष्टी प्रगट करितो; अंधारात काय आहे हे त्याला ठाऊक असते; त्याच्याजवळ प्रकाश वसतो." (दानीएल २:२२)
- तुम्हांला समर्थ करण्यात येईल
जेव्हा देवाबरोबर तुम्ही एकाकी वेळ घालविता, तेव्हा तुम्ही केवळ शारीरिक शक्तीचे नाविन्य प्राप्त करीत नाही, परंतु तुम्ही आध्यात्मिकरित्या भरणे व ताजेतवाने होण्याचा आनंद प्राप्त करता. यशया ४०:३१ म्हणते, "तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ति संपादन करितील; ते गरुडाप्रमाणे पंखांनी वर उडतील; ते धावतील तरी दमणार नाहीत, चालतील तरी थकणार नाहीत." (यशया ४०:३१)
स्तोत्रसंहिता ६८:३५ नुसार, "तुझ्या पवित्रस्थानातून कार्य करणारा देव भयप्रद आहे, इस्राएलाचा देव आपल्या लोकांस बल व सामर्थ्य देतो. देव धन्यवादित असो."
- तुम्ही पवित्र आत्म्याने भरले जाल.
"द्राक्षारसाने मस्त होऊ नका; द्राक्षारसात बेतालपणा आहे; पण आत्म्याने परिपूर्ण व्हा" (इफिस. ५:१८). तुम्ही जेव्हा देवाच्या आत्म्याने भरले जाता, तेव्हा तुमचे जीवन हे पूर्णपणे पवित्र आत्म्याद्वारे प्रेरित होईल.
- देवाबरोबरच्या संगतीदरम्यान देवाबरोबरच्या संगतीचा तुमचा समय सैतानी ओझ्यांना मोडेल.
हे त्या दिवसात घडेल की त्याचे ओझे हे तुमच्या खांद्यावरून आणि त्याचे ओझे तुमच्या मानेवरून काढून टाकिले जाईल, आणि ओझे हे अभिषेकच्या तेलामुळे नष्ट केले जाईल. (यशया १०:२७)
- तुम्ही देवाच्या प्रतिमेमध्ये परिवर्तीत व्हाल.
म्हणून आपण सर्व जण ज्यांमधून तो पडदा काढला गेला आहे ते देवाचे गौरव पाहू व प्रतिबिंबित करू शकतात. आणि परमेश्वर-जो आत्मा आहे-तो आपल्याला अधिक करून त्याच्यासारखे करतो जेव्हा आपण त्याच्या गौरवी प्रतिमेमध्ये बदलतो. २ करिंथ. ३:१८)
देवाला तुमचे संपूर्ण हृदय तसेच चांगला वेळ दया. देवाबरोबर गहन संबंधामध्ये जाण्यासाठी या दोन मुख्य अटी आहेत.
Bible Reading Plan : Matthew 1-7
प्रार्थना
१. हे परमेश्वरा, मजवर प्रत्येक प्रकारे दया कर जे पापाने मला तुजपासून दूर केले आहे. (स्तोत्रसंहिता ५१: १-२, १ योहान १:९)
२. देवाबरोबरच्या माझ्या प्रत्येक संबंधावर परिणाम करणाऱ्या पापाच्या प्रत्येक ओझ्यास मी येशूच्या नावात ओढून काढीत आहे.(इब्री लोकांस १२:१, रोमकरांस ६:१२-१४)
३. चुका, खोटेपणा, शंका आणि भीति ज्या माझ्या मनात संघर्ष करीत आहेत त्यांस येशूच्या नावात मी काढून टाकीत आहे. (२ करिंथकरांस १०:४-५, यशया ४१:१०)
४. पित्या ! माझे नेत्र उघड की तुझ्या नियमशास्त्रातून मी अद्भुत गोष्टी येशूच्या नावात पाहाव्यात. ( स्तोत्रसंहिता ११९:१८, इफिसकरांस१:१७-१८)
५. येशूच्या नावात, माझ्या स्वर्गीय पित्याबरोबरच्या संगतीमध्ये कृपा ही पुनर्स्थापित केली आहे यास मी येशूच्या नावात प्राप्त करितो. (२ करिंथकरांस १३: १४, यहूदा ४:८)
६. हे परमेश्वरा ! माझ्या आध्यात्मिक मनुष्यास समर्थ कर. ( इफिसकरांस ३:१६, यशया ४०:२९-३१)
७. काहीही जे माझ्या आध्यात्मिक शक्तीला कमी करीत आहे ते येशूच्या नावात नष्ट केले जावे. (यशया ४०:२९, मत्तय ११:२८-३०)
८. श्रीमंतीच्या प्रत्येक फसवणुकीस मी ओढून काढीत आहे ज्यास रचले आहे की मला देवाच्या गोष्टीपासून दूर घेऊन जावे. (मत्तय ६:२४, १ तीमथ्याला ६:९-१०)
९. पित्या, तुझी प्रीति व तुझ्या ज्ञानामध्ये वाढण्यास येशूच्या नावात मला प्रेरित कर. (फिलिप्पैकरांस १:९, कलस्सैकरांस १:१०)
१०. परमेश्वरा, ज्ञान, प्रतिष्ठा व कृपेमध्ये तुझ्यासह आणि लोकांसह मला वाढण्यास येशूच्या नावात प्रेरित कर. (लूक २:५२ , यहूदा १:५)
Join our WhatsApp Channel
Most Read
● तुमचे मार्गदर्शन कोण करीत आहे?● मोठया संकटात
● ख्रिस्तासाठी राजदूत
● दानीएलाच्या उपासादरम्यान प्रार्थना
● तुमच्या पीडे मध्ये देवाच्या अधीन होण्यास शिकणे
● दिवस ०८:४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
● दिवस ०५: ४० दिवस उपास व प्रार्थनेचे
टिप्पण्या