डेली मन्ना
सामर्थ्यशाली तीन-पदरी दोरी
Thursday, 21st of November 2024
23
15
217
Categories :
उपास व प्रार्थना
तीन पदरी दोरी सहसा तुटत नाही. (उपदेशक ४:१२). हे वचन विवाह समारंभावेळी सामान्यपणे संबोधले जाते, जे नवरी, नवरा आणि प्रभू मधील एकतेच्या शक्तीचे प्रतीक म्हणून दर्शविते. तथापि, या तीन पदरी दोरीचे महत्त्व वैवाहिक संबंधाच्याही पलीकडील आहे, ज्यामध्ये अधिक गहन अर्थ आहे जे संपूर्ण बायबलमध्ये पाहिले जाऊ शकते.
विश्वासणाऱ्याच्या जीवनात, तीन पदरी दोरी विश्वास, आशा आणि प्रीतीद्वारे अभिव्यक्त होते, जसे १ करिंथ १३:१३ मध्ये वर्णन केले आहे. हे गुण आध्यात्मिक वाढ आणि संयमसाठी महत्वाचे आहेत, आणि एकत्रितपणे ते देव व इतरांबरोबर ख्रिस्ती नातेसंबंधाचा गाभा बनविते. या तीन पदरी दोरीचा प्रत्येक पैलू हा एकमेकांशी जुळलेला आहे आणि दुसऱ्यांवर अवलंबून आहे, ज्यामुळे ते यास शक्तिशाली आणि टिकावू बनविते.
विश्वास ठेवणारा सराव
मत्तय ६ मध्ये, देवाचे लेकरू म्हणून जगण्याचे महत्वाचे घटक येशू त्याच्या अनुयायांना शिकवीत आहे, त्यामध्ये दानधर्म, प्रार्थना आणि उपासाच्या महत्वावर जोर देत आहे.
- जेव्हा तुम्ही दानधर्म करता .... (मत्तय ६:२)
- जेव्हा तुम्ही प्रार्थना करता ..... (मत्तय ६:५)
- जेव्हा तुम्ही उपास करता .... (मत्तय ६:१६)
लक्षात घ्या हे "जर" असे म्हणत नाही पण जेव्हा असे म्हणते. प्रभू येशू या आचरणास पर्यायी म्हणून सादर करीत नाही परंतु एका विश्वासणाऱ्याच्या जीवनाचा आंतरिक पैलू म्हणून सादर करतो.
जेव्हा ख्रिस्ती व्यक्ति शुद्ध अंत:करणाने दानधर्म करतात, तेव्हा ते देवाची प्रीती व उदारतेस प्रतिबिंबित करतात, ज्याने त्याच्या एकुलत्या एका पुत्राला दिले की मानवजातीचा उद्धार करावा (योहान ३:१६).
प्रभू येशूने आपल्याला शिकविले आहे की प्रामाणिकपणे आणि नम्रतेने प्रार्थना करावी, इतरांना प्रभावित करण्यास किंवा केवळ पोकळ बडबड करण्यासाठी नाही. प्रार्थनेद्वारे, आपण देवाबरोबर घनिष्ठ संबंध विकसित करतो, आणि आपल्या सर्व गरजांसाठी त्याच्यावर अवलंबून राहण्यास शिकतो.
उपास आपल्याला साहाय्य करते की आपल्या आध्यात्मिक वाढीवर लक्ष केंद्रित करावे, जगिक अडथळ्यांपासून मुक्त राहावे आणि त्याच्या इच्छेची गहन समज प्राप्त करावी.
तीन-पदरीच्या दोरीची शक्ती
जेव्हा एकत्र मिळून आचरणात आणले जाते, तेव्हा दानधर्म, प्रार्थना, व उपास हे एक शक्तिशाली तीन पदरी दोरी निर्माण करते जे देवाबरोबर ख्रिस्ती व्यक्तीचा विश्वास व संबंधाला मजबूत करते. (उपदेशक ४:१२)
मार्क ४:८, २० मध्ये, प्रभू येशू, तीस पट, साठ पट आणि शंभर पट प्राप्तीबद्दल चर्चा करतो, आध्यात्मिक आशीर्वादामध्ये विलक्षण वाढीचे उदाहरण देतो जेव्हा विश्वासणारा प्रार्थना, दानधर्म, आणि उपासामध्ये व्यस्त असतो.
शंभरपट उत्पन्न
मी विश्वास ठेवतो जेव्हा एखादा विश्वासू प्रार्थना करतो, तेव्हा ते त्यांची अंत:करणे देवाचे मार्गदर्शन आणि आशीर्वादासाठी उघडे करतात, संभाव्यतः तीसपट परत प्राप्ती मोकळे करतात. प्रार्थनेला दानधर्मासह जोडणे हे विश्वासणाऱ्याचे देवाच्या पुरवठ्यामध्ये विश्वासाला प्रदर्शित करते आणि त्याचा परिणाम साठ पट आशीर्वादामध्ये होऊ शकतो. तथापि, एखादा ख्रिस्ती व्यक्ति जेव्हा प्रार्थना आणि दानधर्माबरोबर उपासाला त्यात जोडतो, तेव्हा ते एक वातावरण निर्माण करते जे शंभर पट मिळकतीस आमंत्रित करते, जे अतुलनीय आध्यात्मिक विपुलता आणि वाढीस मोकळे करते. मी ऐकतो की आत्मा म्हणतो, "१०० पट मिळकतीसाठी तयार राहा.'
कर्नेल्यची गोष्ट
प्रेषित १०:३०-३१ मध्ये कर्नेल्याची कथा प्रार्थना, दानधर्म आणि उपास एकत्रित करण्याच्या सामर्थ्याचे उदाहरण देते. एक धर्मनिष्ठ माणूस म्हणून, कर्नेल्याने उपास व प्रार्थना केली आणि ते जे गरजवंत आहेत त्यांना उदारपणे दानधर्म केले. या आध्यात्मिक शिस्तीसाठी त्याच्या समर्पणाने देवाचे लक्ष वेधले, ज्यामुळे देवदूत त्यास भेटावयास आले आणि दैवी आज्ञा झाली की प्रेषित पेत्राचा शोध करावा.
कर्नेल्याच्या विश्वासूपणाच्या परिणामामुळे, पेत्राला कर्नेल्याच्या घराकडे मार्गदर्शन करण्यात आले, जेथे त्याने कर्नेल्य व त्याच्या घराण्याला सुवार्ता सांगितली. या भेटीमुळे कर्नेल्याच्या संपूर्ण घराण्यास तारण व बाप्तिस्मा घेण्याकडे नेले, अविश्वसनीय आशीर्वाद आणि आध्यात्मिक प्रभाव दर्शविले जे प्रार्थना, दानधर्म व उपास करण्याच्या जीवनशैलीचे जीवन आत्मसात करण्याकडून प्राप्त होऊ शकते. परमेश्वर पक्षपाती नाही. जर तुम्ही हा सिद्धांत आत्मसात करता, तेव्हा तुम्ही देखील तसेच अविश्वसनीय परिणाम पाहू शकाल.
४० दिवसांच्या उपासासाठी प्रभावी मार्गदर्शिका
उपासाचा कालावधी:
उपास मध्यरात्री (००.०० ताशी) सुरु होतो आणि दररोज दुपारी १४.०० ताशी (दुपारी २ वाजता) संपतो. ते जे आध्यात्मिकदृष्ट्या प्रगत आहेत आणि ज्यांना सक्षम वाटते, त्यांच्यासाठी उपास हा १५.०० तासापर्यंत (दुपारी ३ वाजेपर्यंत) वाढवला जाऊ शकतो.
आहाराचा प्रतिबंध:
उपासाच्या कालावधी दरम्यान (००.००-१४.०० तासापर्यंत), पाणी सोडून चहा, कॉफी, दुध किंवा इतर कोणतेही पेय घेण्याचे टाळा. शरीरात पाणी राहण्यासाठी उपासाच्या संपूर्ण कालावधीत भरपूर पाणी पिण्यास प्रोत्साहित केले आहे.
उपास संपल्यानंतरचा आहार:
उपासाचा कालावधी संपल्यानंतर (००.००-१४.०० तासापर्यंत), तुम्ही तुमचे नेहमीचे भोजन घेण्यास सुरु करू शकता.
आध्यात्मिक लक्ष्य:
या उपासातून पूर्ण लाभ घेण्यासाठी, जगिक अडथळे जसे सामाजिक माध्यमे कमी करण्याचा प्रयत्न करा. हा वेळ मनन, प्रार्थना, किंवा इतर आध्यात्मिक कृत्यांसाठी वापरला पाहिजे.
लक्षात ठेवा, उपास करणे हे आध्यात्मिक पोषणासारखेच आहे कारण ते शारीरिक शिस्तीबद्दल आहे. तुमच्या शरीराचे ऐकणे आणि त्यानुसार व्यवस्था करणे हे महत्वाचे आहे.
या २१ दिवसांच्या प्रार्थना कार्यक्रमा दरम्यान, आपल्या प्रार्थना ह्या मानवाकडे उद्धेशून केलेल्या नाहीत हे समजणे महत्वाचे आहे. त्याऐवजी, इफिस. ६:१२ मध्ये वर्णन केलेल्या आध्यात्मिक घटकांना उद्देशून आहेत. “कारण आपले झगडणे रक्तमांसाबरोबर नव्हे, तर सत्तांबरोबर, अधिकाऱ्यांबरोबर, सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपतींबरोबर, आकाशातल्या दुरात्म्यांबरोबर आहे.” (इफिस. ६:१२)
प्रार्थना करण्यासाठी सर्वात प्रभावी वेळ:
मत्तय. २४:४३ च्या शिकवणीमध्ये, आपल्याला एक गहन रूपक मिळते. “आणखी हे समजा की, कोणत्या प्रहरी चोर येईल हे घरधन्याला कळले असते तर तो जागृत राहिला असता, आणि त्याने आपले घर फोडू दिले नसते.” हा उतारा सतर्कता आणि सज्जतेच्या महत्वावर भर देणारा आध्यात्मिक साधर्म्य म्हणून कार्य करतो.
मध्यरात्रीची वेळ का?
ज्याप्रमाणे चोर रात्रीच्या वेळी येतो, अनपेक्षित आणि अदृश्य, त्याप्रमाणेच आव्हानांना आपण सामोरे जातो (२ पेत्र. ३:१०). या आव्हानांचा सामना करण्यासाठी, मध्यरात्रीची वेळ ही महत्वाची आहे.
००.०० ते १.३० (रात्री १२.०० ते १.३०), प्रार्थनेसाठी वातावरण सर्वात अनुकूल मानले जाते. असा विश्वास आहे की, या वेळा दरम्यान, अंधाराच्या शक्ती ह्या जास्त कार्यरत असतात, त्यामुळे आध्यात्मिक मध्यस्थीसाठी ते निर्णायक वेळ बनवतात.
या उलट, सकाळ ही दिवसाच्या कामाच्या तयारीसाठी घाईची वेळ असते, आणि जगाची काळजी आपल्या विचारांवर प्रभुत्व करू शकते, आणि गहन आध्यात्मिक संबंधाला अडथळा करते.
आरोग्य आणि सुरक्षितता खबरदारी:
या प्रार्थना कार्यक्रमासोबत असणाऱ्या उपासाला सुरुवात करण्यापूर्वी, तुमच्या डॉक्टरचा सल्ला घेणे हे महत्वाचे आहे, विशेषेकरून जर तुम्ही औषधे घेत असाल, कोणताही तीव्र आरोग्य परिस्थिती असेल, किंवा तुम्ही गरोदर किंवा बाळाला दुध पाजणाऱ्या असाल.
तुमच्या शरीराचे ऐकणे आणि त्यानुसार व्यवस्था करणे हे महत्वाचे आहे. तुमचे शारीरिक स्वास्थ्य महत्वाचे आहे आणि तुमच्या आध्यात्मिक आचरणासह त्यांचा देखील विचार केला पाहिजे.
प्रार्थना
तुमच्या अंत;करणातून येई पर्यंत प्रत्येक प्रार्थना अस्त्र वारंवार म्हणा. केवळ तेव्हाच मग पुढील प्रार्थना अस्त्राकडे वळा. घाई करू नका.
१. हा ४० दिवसांचा प्रार्थना आणि उपास कार्यक्रम यशस्वीपणे पूर्ण करण्यापासून मला विरोध करणारी प्रत्येक शक्ती येशूच्या नावाने आणि येशूच्या रक्ताने कापून काढली जावी.
२. पित्या, येशूच्या नावाने, या ४० दिवसांच्या प्रार्थना आणि उपास कार्यक्रमाला माझ्या विश्वासाला दृढ करण्यासाठी आणि तुझ्या अधिक जवळ येण्यासाठी उपयोगात आण. प्रार्थना आणि उपासाचा प्रत्येक दिवस मला तुझ्या अधिक घनिष्ठ संबंधात आणावा, प्रिती, समज आणि भक्तीमध्ये वाढणारा व्हावा.
३. पित्या, येशूच्या नावाने, या उपासाच्या कालावधी दरम्यान कोणताही आध्यात्मिक हल्ला उद्भवण्याच्या विरोधात संरक्षणासाठी मी प्रार्थना करत आहे. तुझ्या देवदूतांद्वारे मला घेरून ठेव आणि तुझी उपस्थिती माझ्या भोवती ढालीप्रमाणे होवो, ज्याने माझे मन, शरीर आणि आत्म्याचे रक्षण करावे.
१. हा ४० दिवसांचा प्रार्थना आणि उपास कार्यक्रम यशस्वीपणे पूर्ण करण्यापासून मला विरोध करणारी प्रत्येक शक्ती येशूच्या नावाने आणि येशूच्या रक्ताने कापून काढली जावी.
२. पित्या, येशूच्या नावाने, या ४० दिवसांच्या प्रार्थना आणि उपास कार्यक्रमाला माझ्या विश्वासाला दृढ करण्यासाठी आणि तुझ्या अधिक जवळ येण्यासाठी उपयोगात आण. प्रार्थना आणि उपासाचा प्रत्येक दिवस मला तुझ्या अधिक घनिष्ठ संबंधात आणावा, प्रिती, समज आणि भक्तीमध्ये वाढणारा व्हावा.
३. पित्या, येशूच्या नावाने, या उपासाच्या कालावधी दरम्यान कोणताही आध्यात्मिक हल्ला उद्भवण्याच्या विरोधात संरक्षणासाठी मी प्रार्थना करत आहे. तुझ्या देवदूतांद्वारे मला घेरून ठेव आणि तुझी उपस्थिती माझ्या भोवती ढालीप्रमाणे होवो, ज्याने माझे मन, शरीर आणि आत्म्याचे रक्षण करावे.
Join our WhatsApp Channel
Most Read
● दिवस ३८ :४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना● तुम्ही कोणाबरोबर चालत आहात?
● देवाच्या प्रेमाचा अनुभव घेणे
● हुशारीने कार्य करा
● परमेश्वर पुरवठा कसा करतो # 1
● प्रतिदिवशीज्ञानीहोत कसे वाढावे?
● अडथळ्यांची भिंत
टिप्पण्या