डेली मन्ना
दिवस ०४ : ४० दिवस उपास व प्रार्थनेचे
Monday, 25th of November 2024
32
27
293
Categories :
उपास व प्रार्थना
चांगल्या गोष्टींची पुनर्स्थापना
"ईयोबाने आपल्या मित्रांसाठी प्रार्थना केली तेव्हा परमेश्वराने ईयोबाच्या दु:खाचा परिहार केला पूर्वी ईयोबाची मालमत्ता होती तिच्या दुप्पट परमेश्वराने त्याला दिली." (ईयोब ४२:१०)
पुनर्स्थापना, हे विश्वाच्या सामान्य भाषेत' काहीतरी बदलण्याच्या प्रक्रियेस संबोधते जे आता अप्रचलित, झिजले किंवा जीर्ण झाले आहे किंवा जसे भूतकाळात होते त्याप्रमाणे मोडलेले आहे. तथापि, देवाच्या वचनानुसार पुनर्स्थापनेचा अर्थ, हा जागतिक पुनर्स्थापनेपासून वेगळा आहे. बायबलनुसार, "पुनर्स्थापना" हे काहीतरी त्याच्या पूर्वीच्या अवस्थेत पुनर्स्थापित करण्याच्या प्रक्रीयेस संबोधते परंतु त्यावर अशा प्रकारे सुधारणा केली जाते की ते आता पूर्वी होते त्यापेक्षा अधिक उत्तम असे होते.
ईयोबाच्या कथेपेक्षा हे इतरत्र कोठेही इतके स्पष्ट नाही. ईयोब ४२:१२ म्हणते, "परमेश्वराने ईयोबाचे उत्तरवय पूर्ववयाहून अधिक सुखसंपन्न केले; ........"
जे काही शत्रूने हिरावून घेतले आहे- मग ते तुमचे आरोग्य, तुमची आर्थिक सुरक्षा, तुमच्या मनाची शांति किंवा इतर काहीही असो, जे तुम्हांला प्रिय असे होते- परमेश्वर अभिवचन देतो की ते पुनर्स्थापित करेल. शत्रू काय बोलतो याची पर्वा केल्याविना, प्रभु येशूकडे शेवटचे उत्तर असेल कारण देवाची आपल्यासाठी इच्छा ही पुनर्स्थापित करण्याची आहे.
आध्यात्मिक सिद्धांतानुसार जे देवाने निश्चित केले आहे, जेव्हा एक चोर पकडला जातो, तेव्हा त्याने जे आपल्यापासून घेतले आहे त्याचे सात पटींनी त्यास देण्याची गरज असते (नीतिसूत्रे ६:३१ वाचा). चोर या हेतूने येतो की जिवंत मारावे, हिरावून घ्यावे व नाश करावा, परंतु देव पूर्ण पुनर्स्थापना करतो या स्थितीपर्यंत की जेथे आपली जीवने ओतप्रोत भरलेली असतात. तो सर्व काही पूर्वी होते त्यापेक्षा उत्तम असे करतो.
सैतान विश्वासणाऱ्यांकडून हिरावून घेऊ शकतो काय?
होय. सैतान परवानगी घेऊन कार्य करतो; प्रवेश नसता, तो विश्वासणाऱ्यांकडून हिरावून घेऊ शकत नाही (इफिस. ४:२७). येथे काही मार्ग आहेत ज्याद्वारे सैतान हा विश्वासणाऱ्यांकडून हिरावून घेऊ शकतो.
१. दैवी आज्ञांचे उल्लंघन
सैतानाने आदामाचा पृथ्वीवरील अधिकार त्यास देवाच्या आज्ञांचे उल्लंघन करविण्याद्वारे हिरावून घेतला. कोणत्याही वेळी जेव्हा तुम्ही देवाची आज्ञा मोडता तुम्ही सैतानाला जागा देता की तुमच्याकडून हिरावून घ्यावे.
२. चुकीचे विचार
सैतान हा चोरणे, जिवंत मारण्यासाठी आणि तुमचा नाश करण्यासाठी प्रयत्न करण्यास घुसण्यास पाहील जर तुमचे विचार हे देवाच्या वचनानुसार नसतील. तुम्ही ती कल्पना, विचार व ज्ञान काढून टाकिले पाहिजे जे देवाच्या वचनाविरुद्ध असतील (२ करिंथ. १०:५). जेव्हा लोक चुकीच्या गोष्टींबद्दल विचार करतात, तेव्हा ते त्यांची कबुली व कार्यावर परिणाम करते.
३. चुकीची कबुली
सैतानाने प्रयत्न केला की देवाला शाप देण्यास चुकीच्या गोष्टी ईयोबाकडून बोलावून घ्याव्या, परंतु ईयोबाने नकार दिला. वायफळ शब्द व नकारात्मक कबुली सैतानाला प्रवेश देते की तुमच्याकडून हिरावून घ्यावे. "तर तूं आपल्या तोंडच्या वचनांना गुंतला आहेस; तूं आपल्या तोंडच्या शब्दांनी बद्ध झाला आहेस." (नीतिसूत्रे ६:२)
४. चुकीचे संबंध
जेव्हा देवाला तुम्हांस आशीर्वाद देण्याची इच्छा असते, तेव्हा तो एका मनुष्याला पाठवितो. जेव्हा सैतानाला देखील तुम्हांला नष्ट करावयाचे असते, तेव्हा तो एका मनुष्याला पाठवितो. तुम्ही जे मित्र बनविता व ज्या लोकांच्या समवेत तुम्ही राहता त्याविषयी काळजी केली पाहिजे. अनेक लोकांनी चुकीच्या संबंधांमुळे अनेक गोष्टी गमाविल्या आहेत.
फसू नका, कुसंगतीने (एकत्र भेटणे, संबंध ठेवणे) नीति बिघडते. (१ करिंथ. १५:३३)
तुम्ही जे पराजय, नुकसान, संकटे, चुका, व हानी अनुभविल्या आहेत तरीसुद्धा पुनर्स्थापना शक्य आहे. सैतान कदाचित अनेक गोष्टी काढून नेऊ शकतो, परंतु परमेश्वर सर्व काही पुनर्स्थापित करण्याचे अभिवचन देतो, आणि सर्व काही पुनर्स्थापित करण्यास तो सक्षम आहे.
पुनर्स्थापनेचे मुख्य क्षेत्र
- देवाबरोबर आपल्या संबंधाची पुनर्स्थापना
"तुझी कृत्ये मला ठाऊक आहेत; तूं शीत नाहीस, उष्ण नाहीस. तूं शीत किंवा उष्ण असतास तर बरे होते; पण तू तसा नाहीस, कोमट आहेस; म्हणजे उष्ण नाहीस, शीत नाहीस, म्हणून मी तुला आपल्या तोंडातून ओकून टाकणार आहे." (प्रकटीकरण ३;१५-१६)
जगाची काळजी व श्रीमंतांच्या फसवणुकीने अनेकांची अंत:करणे देवापासून हिरावून घेतली आहेत. देवाची इच्छा आहे की आपण त्याच्यामध्ये पुनर्स्थापित केले जावे कारण त्याच्यावाचून आपण काहीही करू शकत नाही. (योहान १५:५)
- आपले गौरव व चांगल्या गोष्टींची पुनर्स्थापना
एसावने त्याचा जन्मसिद्ध हक्क गमाविला, आणि तो त्यास पुन्हा पुनर्स्थापित होऊ शकला नाही. अनेक लोक आजही त्यांचे गौरव अन्न, लैंगिक सहवास आणि तात्पुरत्या लाभाच्या कारणामुळे गमावीत आहेत. "तेव्हा याकोबाने एसावला भाकर व मसुरीचे वरण दिले; तो खाऊनपिऊन उठला व चालता झाला; हयाप्रमाणे एसावाने आपला ज्येष्ठत्वाचा हक्क तुच्छ लेखिला." (उत्पत्ति २५:३४)
तुम्हांला ठाऊक आहे की त्यानंतर जेव्हा त्यास त्याच्या पित्याचा आशीर्वाद पाहिजे होता, तेव्हा त्याचा नकार करण्यात आला. पश्चाताप करण्यासाठी आता फार उशीर झाला होता, जरी त्याने मनापासून अश्रू ढाळले होते. (इब्री. १२:१७)
- वाया घालविलेली वर्षे व संधींची पुनर्स्थापना
"मी तुम्हांवर पाठविलेले आपले महासैन्य म्हणजे झुंडींनी येणारे टोळ, चाटून खाणारे टोळ, अधाशी टोळ व कुरतुडणारे टोळ यांनी ज्या वर्षांचे उत्पन्न खाल्ले त्यांची तुम्हांस भरपाई करून देईन." (योएल २:२५)
जेव्हा देव तुमची वाया गेलेली वर्षे पुनर्स्थापित करतो, तेव्हा त्या वर्षात जो लाभ तुम्ही मिळविला असता, जो तुम्हाला दिला गेला नाही, त्यामध्ये आणखी भर करून वाढविला जाईल, आणि तुम्हांला दिला जाईल. तुमची स्मरणशक्ती देखील तल्लख होईल. १२० वर्षाचा असताना, देखील मोशे हा एका तरुणासारखा होता, तरी त्याची दृष्टि मंद झाली नव्हती व त्याची प्रकृतीही क्षीण झाली नव्हती (अनुवाद ३४:७). तुमची देखील तशीच साक्ष असेल!
- आनंदाची पुनर्स्थापना
ज्या सर्व गोष्टींनी ईयोबाला आनंद आणला होता त्या काढून घेतल्या गेल्या होत्या, परंतु देवाने सर्व काही त्यास पुनर्स्थापित केले. "तू केलेल्या उद्धाराचा आनंद मला पुन्हा होऊ दे; आणि उत्सुकतेच्या आत्म्याने मला सावरून धर." (स्तोत्र. ५१:१२)
प्रार्थना
१. पित्या, असे होवो की येशूच्या नावात माझ्या जीवनाच्या सभोवती सर्व चांगल्या गोष्टींची पुनर्स्थापना होवो.
२. माझ्या जीवनाच्या विरोधात कार्य करणाऱ्या आध्यात्मिक लुटारू व नाश करणाऱ्या कार्यांस येशूच्या नावात मी उधळून लावतो व त्यास संपुष्टात आणतो.
३. माझ्या जीवनात चांगल्या गोष्टींना नष्ट करणाऱ्या सैतानाच्या हस्तकांना येशूच्या नावात मी निष्कामी करीत आहे.
४. हे परमेश्वरा, येशूच्या नावात कृपा करून माझे गमाविलेले सर्व आशीर्वाद, नियतीचे साहाय्यक, आणि गुणधर्में यांस पुनर्स्थापित कर.
५. पित्या, माझे शरीर व जीवनात जी काही हानी झाली आहे त्यास येशूच्या नावात दुरुस्त कर.
६. पित्या, मला समर्थ कर की, येशूच्या नावात गमाविलेल्या सर्व आशीर्वादाचा मागोवा घ्यावा, त्यावर वर्चस्व मिळवावे आणि ते प्राप्त करावे.
७. प्रत्येक बंद द्वार हे येशूच्या नावात पुन्हा उघडले जावे.
८. पित्या, माझ्या नियतीच्या साहाय्यकांबरोबर येशूच्या नावात माझा संबंध पुन्हा जोड जे मजपासून वेगळे झाले आहेत.
९. मी आज्ञा देत आहे, येशूच्या नावात माझ्या जीवनात संपत्ति, आशीर्वाद व गौरवाची सात पटीने पुनर्स्थापना व्हावी.
१०. पित्या, येशूच्या नावात तुझ्या पवित्रस्थानातून मला साहाय्य पाठिव.
२. माझ्या जीवनाच्या विरोधात कार्य करणाऱ्या आध्यात्मिक लुटारू व नाश करणाऱ्या कार्यांस येशूच्या नावात मी उधळून लावतो व त्यास संपुष्टात आणतो.
३. माझ्या जीवनात चांगल्या गोष्टींना नष्ट करणाऱ्या सैतानाच्या हस्तकांना येशूच्या नावात मी निष्कामी करीत आहे.
४. हे परमेश्वरा, येशूच्या नावात कृपा करून माझे गमाविलेले सर्व आशीर्वाद, नियतीचे साहाय्यक, आणि गुणधर्में यांस पुनर्स्थापित कर.
५. पित्या, माझे शरीर व जीवनात जी काही हानी झाली आहे त्यास येशूच्या नावात दुरुस्त कर.
६. पित्या, मला समर्थ कर की, येशूच्या नावात गमाविलेल्या सर्व आशीर्वादाचा मागोवा घ्यावा, त्यावर वर्चस्व मिळवावे आणि ते प्राप्त करावे.
७. प्रत्येक बंद द्वार हे येशूच्या नावात पुन्हा उघडले जावे.
८. पित्या, माझ्या नियतीच्या साहाय्यकांबरोबर येशूच्या नावात माझा संबंध पुन्हा जोड जे मजपासून वेगळे झाले आहेत.
९. मी आज्ञा देत आहे, येशूच्या नावात माझ्या जीवनात संपत्ति, आशीर्वाद व गौरवाची सात पटीने पुनर्स्थापना व्हावी.
१०. पित्या, येशूच्या नावात तुझ्या पवित्रस्थानातून मला साहाय्य पाठिव.
Join our WhatsApp Channel
Most Read
● आध्यात्मिक नियम: संबंधाचा नियम● २१ दिवस उपवासः दिवस १८
● नरक हे खरे स्थान आहे
● शेवटच्या समयाची 7 मुख्य भविष्यात्मक चिन्हे #1
● स्वतःची-फसवणूक म्हणजे काय?-१
● ख्रिस्ताबरोबर बसलेले
● वासनेवर विजय मिळवावा
टिप्पण्या