डेली मन्ना
दिवस ०९ : ४० दिवस उपास व प्रार्थनेचे
Saturday, 30th of November 2024
32
27
281
Categories :
उपास व प्रार्थना
तुमच्या नशिबाला साहाय्य करणाऱ्याशी जुळावे
"आकाशाचा व पृथ्वीचा निर्माणकर्ता जो परमेश्वर त्याच्यापासून मला साहाय्य येते." (स्तोत्र. १२१:२)
तुमचे नशीब तेच आहे जो देवाचा तुमच्यासाठी हेतू आहे जे तुम्हांला सध्या करायचे व तसे बनायचे आहे. तुमच्या अस्तित्वासाठी ही देवाची ब्लू प्रिंट आहे. प्रत्येक व्यक्तीची रचना ही साहाय्य करावे आणि साहाय्य मिळवावे या दोन्हीसाठी केली आहे. एकांतात राहून कोणीही आपले नशीब पूर्ण करू शकत नाही.
देवाने आपल्याला त्याच्यावर अवलंबून राहण्यासाठी निर्माण केले आहे, म्हणून अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपण आपल्या मानवी शक्तीने करू शकत नाही. आपण शक्ती, ज्ञान, शहाणपण आणि क्षमतेमध्ये मर्यादित आहोत. जर आपण देवावर अवलंबून राहिलो, तर आपण पौलासारखे निडरपणे घोषित करू शकतो, आणि म्हणू, "मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही करावयास शक्तिमान आहे" (फिलिप्पै. ४:१३). देव हा आपल्या साहाय्याचा स्त्रोत आहे आणि तो आपल्याला वेगवेगळ्या माध्यमांच्या द्वारे साहाय्य पाठवितो, उदाहरणार्थ, मनुष्य, स्वर्गदूत, निसर्ग वगैरे.
नशीब सहाय्यकांचे सेवाकार्य संपूर्ण पवित्रशास्त्रात आहे, आणि आज आपण त्यापैंकी काहींचा अभ्यास करू.
नशीब सहाय्यकांची पवित्रशास्त्रातील उदाहरणे
१. आदाम
नशीब घडविणाऱ्या सहाय्यकांच्या सेवाकार्याचा आनंद घेणारा आदाम हा पहिला व्यक्ति होता. हव्वेला बनविले होते की आदामास साहाय्य करावे. तिची रचना ही त्याच्यासाठी "साहाय्यक" म्हणून केली होती. (उत्पत्ति २:१८)
२. योसेफ
उत्पत्ति ४०:१४ मध्ये, योसेफाने आचाऱ्यास स्वप्नाचा अर्थ सांगितल्यावर, त्याने साहाय्यासाठी आचाऱ्यास विनंती केली आणि त्याची तुरुंगातून सुटका कशी व्हावी यासाठी प्रयत्न करावे, परंतु आचारी जवळजवळ दोन वर्षे त्यास विसरून गेला होता (उत्पत्ति ४०:२२, ४१:१, ९-१४). जेव्हा देवाने तुम्हांस साहाय्य केले असेल तेव्हाच लोक तुमची आठवण ठेवतील.
३. दावीद
दाविदाने त्याच्या जीवनात वेगवेगळ्या समयी साहाय्याचा आनंद घेतला. साहाय्याचा आनंद घेणे म्हणजे काय हे त्यास समजले, म्हणूनच त्याने वेगवेगळ्या समयी साहाय्याबद्दल लिहिले.
दररोज लोक दाविदाचे साहाय्य करण्यासाठी त्यास येऊन मिळत, शेवटी त्याची देवाच्या सेनेसारखी मोठी सेना बनली. (१ इतिहास १२:२२)
१५ पलिष्ट्यांनी इस्राएल लोकांशी पुनः युद्ध केले, तेव्हा दावीद आपले सैनिक बरोबर घेऊन पलिष्ट्यांशी लढला; त्या प्रसंगी दावीद थकून गेला. १६ तेव्हा रेफाई वंशातला इशबी-बनोब म्हणून एक इसम होता, त्याच्या भाल्याच्या फलकाचे वजन तीनशे शेकेल पितळ भरले; त्याने नवी तरवार कंबरेस बांधिली होती; त्याने दाविदास मारावयाचा बेत केला; १७ पण सरुवेचा पुत्र अबीशय याने दाविदाचा बचाव केला; त्या पलिष्ट्यांस त्याने ठार मारिले. मग दाविदाच्या लोकांनी त्यास शपथ घालून सांगितले की, पुनः आपण आम्हांबरोबर लढाईस येऊ नका; इस्राएलाचा दीप आपण मालवू नये. (२ शमुवेल २१:१५-१७)
नशीब सहाय्यकास निवडणारे तुम्हीच आहात, तो देवच आहे जो तुम्हाला त्याच्याशी जोडेल ज्यास त्याने तुम्हांस साहाय्य करण्यासाठी तयार केले आहे.
माझा ठाम विश्वास आहे की आजच्या प्रार्थनेनंतर, देवाकडून तुम्ही आश्चर्यकारक साहाय्याचा आनंद घेऊ लागाल. बंद दरवाजे पुन्हा उघडले जातील आणि लोक येशूच्या नावाने तुमचे चांगले करू लागतील.
साहाय्याचे प्रकार
- देवाचे साहाय्य
देव हा साहाय्यासाठी मुख्य स्त्रोत आहे. जर देवाने तुम्हांला साहाय्य केले आहे, तर मनुष्याने तुम्हाला साहाय्य केले पाहिजे. लोकांनी तुम्हांला साहाय्य करावे ही विनंती करीत सर्वत्र जाण्याऐवजी, देवाचे साहाय्य मिळविण्यासाठी प्रार्थनेमध्ये वेळ घालवा. देव कोणाच्याही हृदयास स्पर्श करील की तुम्हांला साहाय्य करावे.
"तूं भिऊ नको, कारण मी तुझ्याबरोबर आहे; घाबरू नको, कारण मी तुझा देव आहे; मी तुला शक्ती देतो; मी तुझे साहाय्यही करितो; मी आपल्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने तुला सावरितो." (यशया ४१:१०)
"मनुष्याचे मार्ग परमेश्वराला आवडले म्हणजे तो त्याच्या शत्रूंसही त्याच्याशी समेट करावयास लावितो." (नीतिसूत्रे १६:७)
- माणसांचे साहाय्य
देवाने एलीया संदेष्ट्यास सांगितले की त्याची काळजी घेण्यासाठी त्याने एका विधवेस तयार केले आहे, प्रत्येकाला साहाय्याची गरज लागते आणि जेव्हा तुम्ही देवावर अवलंबून राहता, तेव्हा तो तुमच्याकडे योग्य व्यक्ति पाठवील, जो त्याने तुमच्यासाठी तयार केला आहे. (१ राजे १७:८-९)
१ बंधूंनो, मासेदोनियातील मंडळ्यांवर झालेल्या देवाच्या कृपेविषयी आम्ही तुम्हांला कळवतो; २ ती अशी की, संकटाच्या बिकट परीक्षेत त्यांचा आत्यंतिक आनंद व त्यांचे कमालीचे दारिद्र्य, ह्यांमध्ये त्यांची औदार्यसंपदा विपुल झाली. ३ कारण त्यांनी आपल्या शक्तीप्रमाणे व शक्तीपलीकडेही आपण होऊन दान दिले अशी मी साक्ष देतो. ४ त्यांनी आमच्याजवळ आग्रहपूर्वक मागितले की, पवित्र जनांची सेवा करण्यात आम्हांला सहकार्य करू देण्याची कृपा व्हावी; ५ आम्हांला आशा होती त्याप्रमाणेच केवळ नव्हे, तर त्यांनी प्रथम स्वतःस प्रभूला दिले आणि देवाच्या इच्छेने आपणांस आम्हांलाही दिले. (२ करिंथ ८:१-५)
- देवदूताचे साहाय्य
यहोशवा व इस्राएली लोकांनी यरीहोच्या भिंती उध्वस्त करण्यासाठी देवदूतांच्या साहाय्याचा आनंद घेतला.
१३ यहोशवाने यरीहोजवळ असताना समोर पाहिले तो कोणी पुरुष आपल्या हाती उपसलेली तलवार घेऊन पुढे उभा आहे असे त्याच्या नजरेस पडले. यहोशवाने जवळ जाऊन विचारले, “तू आमच्या पक्षाचा की आमच्या वैर्यांच्या पक्षाचा?”
१४ तो म्हणाला, “नाही; मी येथे परमेश्वराचा सेनापती ह्या नात्याने आलो आहे.” तेव्हा यहोशवाने त्याला दंडवत घालून म्हटले, “स्वामींची आपल्या दासाला काय आज्ञा आहे?”
१५ परमेश्वराचा सेनापती यहोशवाला म्हणाला, “आपल्या पायांतले जोडे काढ; कारण ज्या जागी तू उभा आहेस ती पवित्र आहे.” तेव्हा यहोशवाने तसे केले. (यहोशवा ५:१३-१५)
आज, जेव्हा तुम्ही प्रार्थना कराल, मी भविष्यवाणी करतो की देव तुमच्यासाठी देवदूताचे साहाय्य पुरवेल. जे काही अशक्य, प्राप्त न होण्याजोगे दिसते, ते येशूच्या नावात घडेल.
- पृथ्वीकडून साहाय्य
निसर्ग देवाच्या वाणीला प्रतिसाद देतो आणि जेव्हा गरज पडेल तेव्हा त्याच्या लोकांच्या भल्यासाठी कार्य करेल. पवित्रशास्त्र सांगते सर्व गोष्टी मिळून आपल्या चांगल्यासाठी कार्य करतात. सर्व गोष्टींमध्ये निसर्ग देखील आहे; आपल्याला केवळ विश्वास ठेवण्याची गरज असते, आणि पवित्रशास्त्रात आपल्यासाठी उपलब्ध असलेल्या आशीर्वादांना लागू करावे.
"परंतु स्त्रीला भूमीने साहाय्य केले; तिने 'आपले' तोंड उघडून अजगराने आपल्या तोंडातून सोडलेली नदी गिळून टाकली." (प्रकटीकरण १२:१६)
त्यादिवशी परमेश्वर इस्राएल लोकांना अमोऱ्यांचा पराभव करण्यास साहाय्य करीत होता. म्हणून दुपारच्या वेळी, इस्राएल लोकांनी ऐकावे इतक्या मोठयाने यहोशवाने परमेश्वराकडे प्रार्थना केली: "आमच्या परमेश्वरा, सूर्याला गीबोनावर स्थिर कर, आणि चंद्राला अयालोनाच्या खोऱ्यावर स्थिर कर." तेव्हा सूर्य व चंद्र थांबले आणि इस्राएल त्यांच्या शत्रूंना पराभूत करेपर्यंत स्थिर राहिले. ही कविता याशेरच्या ग्रंथात मिळते. सूर्य आकाशाच्या मधोमध सुमारे एक संपूर्ण दिवस थांबला; त्याने अस्तास जाण्याची घाई केली नाही. (यहोशवा १०:१२-१३)
पुढील अभ्यासासाठी: स्तोत्रसंहिता १२१:१-८; स्तोत्रसंहिता २०:१-९; उपदेशक ४:१०; यशया ४१:१३
Bible Reading Plan: Luke 1- 4
प्रार्थना
१) पित्या, कृपा करून तुझ्या पवित्रस्थानातून येशूच्या नावाने मला साहाय्य पाठव. (स्तोत्र. २०:२)
२) माझ्या जीवनाच्या सभोवतालच्या नशिबाला नष्ट करणाऱ्या कार्याला मी येशूच्या नावाने पक्षघाती करतो. (योहान. १०:१०)
३) काहीही जे मला आणि माझ्या नशिबाला साहाय्य करणाऱ्यास अडथळा करत आहे, ते येशूच्या नावाने पवित्र आत्म्याच्या अग्नीद्वारे नष्ट केले जावे. (यशया ५४:१७)
४) माझ्या नशिबाच्या साहाय्यकांसमोर कोणतीही वाईट वाणी जी मला दोष देत असेल, ती येशूच्या नावाने शांत केली जावी. (प्रकटीकरण १२:१०)
५) हे परमेश्वरा, तुझ्या कृपेने, माझ्या पुढील स्तरासाठी तू तयार केलेल्या माझ्या साहाय्यकांशी येशूच्या नावाने तू मला त्यांच्याशी जोड. (निर्गम ३:२१)
६) परमेश्वरा, माझ्या आयुष्याच्या संबंधात निर्णय घेणाऱ्या ठिकाणी माझ्यासाठी येशूच्या नावाने तू बोल. (नीतिसूत्रे १८:१६)
७) कोणतीही शक्ती माझ्या विरोधात माझ्या साहाय्यकांशी चालाखी करत असेल, त्या शक्तीच्या प्रभावाला मी येशूच्या नावाने नष्ट करतो. (इफिस. ६:१२)
८) माझ्या नशिबाचे साहाय्यक मारले जाणार नाही, आणि येशूच्या नावाने त्यांना काहीही वाईट होऊ देऊ नको. (स्तोत्र. ९१:१०-११)
९) माझ्या जीवनाच्या विरोधात कार्य करण्यापासून तडजोड आणि अपयशाच्या प्रत्येक आत्म्याला येशूच्या नावाने मी प्रतिबंधित करतो. (२ करिंथ. १:२०)
१०) पित्या, मजवर कृपा करण्यासाठी तुझ्या पवित्र देवदूतांना लोकांकडे जाण्यास व त्यांना प्रभावित करण्यास येशूच्या नावाने मोकळे कर. (इब्री. १:१४)
११) करुणा सदन सेवाकार्याच्या नशिबाचे साहाय्यक आता येशूच्या नावाने येवोत. (१ करिंथ. १२:२८)
१२) या २१ दिवसांच्या उपास आणि प्रार्थनेत सहभागी असणाऱ्या प्रत्येक व्यक्ती आणि कुटुंबांवर मी येशूचे रक्त लावतो. (निर्गम १२:१३)
Join our WhatsApp Channel
Most Read
● स्वतःवर लागू केलेल्या शापापासून सुटका● दिवस १२ : ४० दिवस उपास व प्रार्थनेचे
● महान पुरुष व स्त्रिया का पतन पावतात - ४
● कृत्रिम बुद्धिमत्ता ख्रिस्तविरोधक आहे काय?
● शेवटच्या समयाचे गुपित: भविष्यात्मक पहारेकरी
● देवदूताचे साहाय्य कसे सक्रीय करावे
● अविश्वास
टिप्पण्या