english हिंदी తెలుగు മലയാളം தமிழ் ಕನ್ನಡ Contact us आमच्याशी संपर्क साधा स्पॉटिफाय वर ऐका स्पॉटिफाय वर ऐका Download on the App StoreIOS अँप डाउनलोड करा Get it on Google Play अँड्रॉइड अँप डाउनलोड करा
 
लॉग इन
ऑनलाइन देणगी
लॉग इन
  • होम
  • कार्यक्रम
  • थेट प्रसारण
  • टी.वी.
  • नोहाट्यूब
  • स्तुती
  • बातमी
  • डेली मन्ना
  • प्रार्थना
  • अंगीकार
  • स्वप्ने
  • ई पुस्तके
  • भाष्य
  • श्रद्धांजली
  • ओएसिस
  1. होम
  2. डेली मन्ना
  3. दिवस १६ : ४० दिवस उपास व प्रार्थनेचे
डेली मन्ना

दिवस १६ : ४० दिवस उपास व प्रार्थनेचे

Saturday, 7th of December 2024
34 26 391
Categories : उपास व प्रार्थना

धन्यवाद द्वारे चमत्कार करणाऱ्या व्यक्तीकडे प्रवेश मिळवावा

"परमेश्वराचे उपकारस्मरण करणे, हे परात्परा, तुझ्या नावाची स्त्रोत्र गाणे चांगले आहे. प्रभातसमयी तुझे वात्सल्य, प्रतीरात्री तुझी सत्यता वाखाणणे, दशतंतुवाद्य, सतार व वीणा ह्यांच्या साथीने, गंभीर स्वराने गाणें चांगले आहे. कारण हे परमेश्वरा, तूं आपल्या कृतीने मला हर्षित केले आहे; तुझ्या हातच्या कृत्यांचा मी जयजयकार करितो." (स्तोत्रसंहिता ९२:१-४)

धन्यवाद देणे हे प्रशंसेचे कृत्य आहे. देवाने आपल्यासाठी जे सर्व काही केले आहे, करत आहे, किंवा करणार आहे त्या सर्वांसाठी हे कृतज्ञता व्यक्त करणे आहे. पवित्रशास्त्रानुसार, देवाला धन्यवाद देणे ही चांगली गोष्ट आहे (स्तोत्र. ९२:१). कोणताही ख्रिस्ती व्यक्ति ज्यास ह्या समजेचा अभाव आहे त्यास नुकसान होते. धन्यवाद, स्तुति आणि उपासनेशी जुडलेले काही आशीर्वाद तुम्हांला दाखविण्याचा मी प्रयत्न करेन.

धन्यवाद, स्तुति आणि उपासना यांस तुम्ही एकमेकांपासून वेगळे करू शकत नाही. जेव्हा तुम्ही धन्यवाद देत आहात, तेव्हा आत्मा तुम्हाला उपासना देखील करण्याकडे नेईल. त्याचवेळी पवित्र आत्मा तुम्हांला धन्यवाद, स्तुति आणि उपासनेमध्ये जाण्यास प्रेरित करील. धन्यवाद देणे हे आध्यात्मिक कृत्य आहे, मानसिक कृत्य नाही, म्हणून पवित्र आत्मा उपासना करण्याच्या वेळी सहज ताबा घेऊ शकतो.

लोक देवाला धन्यवाद का देत नाहीत?
लोकांनी ज्याप्रकारे देवाला धन्यवाद दिला पाहिजे तसे ते देत नाहीत याची अनेक कारणे आहेत. गहन विचाराने गहन उपासनेला चालना मिळू शकते.

विचार करण्यासारख्या काही गोष्टी कोणत्या आहेत?
- देवाने तुमच्यासाठी काय केले आहे याचा विचार करा.
- त्याने तुम्हांला कोठून निवडले याचा विचार करा.
- त्याने तुम्हांला साहाय्य केले त्या कठीण वेळेबद्दल विचार करा.
- त्याने तुम्हांला मृत्यु, अपघात आणि वाईटापासून सोडविले त्यावेळेबद्दल विचार करा.
- तुमच्याप्रती त्याच्या प्रीतीबद्दल विचार करा.
- तुमच्यासाठी सध्या तो काय करीत आहे त्याच्याबद्दल विचार करा.
- तो तुमच्यासाठी लवकरच काय करणार आहे त्याबद्दल विचार करा.

जेव्हा तुम्ही या सर्व गोष्टींबद्दल विचार करता, तेव्हा ते तुम्हांला देवाला धन्यवाद, स्तुति देणे आणि उपासना करण्यास प्रेरित करेल.

येथे अशा अनेक गोष्टी आहेत ज्यासाठी तुम्ही प्रार्थना केली होती, आणि त्यासाठी तुम्ही अगोदरच त्याची स्तुति करावी आणि धन्यवाद दिला पाहिजे.

२. उपलब्धी आणि मालमत्ता
त्यांना वाटते की त्यांची उपलब्धी आणि मालमत्ता हे त्यांच्या मानवी शक्तीने मिळालेले आहे. जेव्हा तुम्ही देवाला तुमच्या शक्तीचे स्त्रोत आणि तुमच्या जीवनाची शक्ती म्हणून पाहता, तेव्हा तुम्हाला उत्तेजन मिळेल की त्याला धन्यवाद दयावा, परंतु जर तुम्हांला वाटते की जे काही तुमच्याजवळ आहे हे तुमच्या कठीण परिश्रमामुळे मिळालेले आहे, तेव्हा कृतज्ञतेचा आत्मा जपणे हे कठीण होईल.

हेच जे नेमके नबूखदनेस्सरला घडले 
"२९ बारा महिने लोटल्यावर तो एकदा बाबेलाच्या राजवाड्याच्या गच्चीवर फिरत होता. ३० त्या वेळी राजा म्हणाला, हे थोर बाबेल नगर राजनिवासासाठी माझ्याच पराक्रमाने व माझ्या प्रतापाच्या वैभवासाठी मी बांधिले आहे ना !

३३ त्याच घटकेस हे नबूखद्नेस्सराच्या प्रत्ययास आले; त्याला मनुष्यातून घालवून दिले व तो बैलांप्रमाणे गावात खाऊ लागला; त्याचे शरीर आकाशांतल्या दहिंवराने भिजू लागले; येथवर की त्याचे केस गरुडाच्या पीसांसारखे वाढले आणि त्याची नखें पक्ष्यांच्या नखांसारखी झाली.
(दानीएल ४: २९-३०, ३३)

३. जीवनाचा श्वास हा त्याच्याकडून आहे याबद्दल ते अनभिज्ञ आहेत
परमेश्वर तुमच्या नाकपुड्यातील श्वासाचा स्त्रोत आहे; त्याच्याशिवाय, तुम्ही ताबडतोब मृत व्हाल. जिवंत आहोत म्हणून आपण देवाशी कृतज्ञ राहिले पाहिजे आणि त्याला धन्यवाद दिला पाहिजे.
"प्रत्येक प्राणी परमेशाचे स्तवन करो. परमेशाचे स्तवन करा." (स्तोत्रसंहिता १५०:६)

४. त्यांना हे ठाऊक नाही की परमेश्वर हा त्यांच्या जीवनातील प्रत्येक चांगल्या गोष्टींचा स्त्रोत आहे
तुमच्या जीवनातील त्या चांगल्या गोष्टी ह्या सरळपणे देवाकडून आहेत. जर देवाने त्या होऊ दिल्या नसत्या, तर त्या तुम्हांला कधीही मिळाल्या नसत्या.

"प्रत्येक उत्तम देणगी व प्रत्येक पूर्ण दान वरून आहे; ज्याला विकार नाही व जो फिरण्याने छायेत जात नाही अशा ज्योतीमंडळाच्या पित्यापासून तें उतरतें." (याकोब १:१७)

५. त्यांना अधिक पाहिजे
देवाची इच्छा आहे की तुम्हाला अधिक दयावे, पण जर तुम्ही धन्यवाद देण्यात चुकला, तर ते तुमच्या प्रवाहास अडथळा करेल. अनेक लोक धन्यवाद देत नाहीत कारण त्यांना अधिक पाहिजे असते.

"६ चित्तसमाधानासह भक्ति हा तर मोठाच लाभ आहे. ७ आपण जगात काही आणिले नाही, आपल्याला त्यातून काही नेता येत नाही; ८ आपल्याला अन्नवस्त्र असल्यास तेवढयात तृप्त असावे." (१ तीमथ्य. ६:६-८)

६. ते स्वतःची इतरांबरोबर तुलना करतात
परंतु ते केवळ स्वतःची एकमेकांशी तुलना करत आहेत, स्वतःला मोजमापाचे मानक म्हणून वापरत आहेत. किती अज्ञानी ! (२ करिंथ. १०:१२)

धन्यवादाशी कोणते चमत्कारिक आशीर्वाद जोडलेले आहेत?
धन्यवाद तुमचे आरोग्य आणि जे काही तुम्हाला देवापासून मिळाले आहे त्यास पूर्ण करू शकते.
(लूक १७:१७-१९; फिलीप्पै. १:६)

  • धन्यवाद तुम्हांला अधिक आशीर्वादासाठी पात्र ठरविते.
  • धन्यवाद दिला जाऊ शकतो जेव्हा अशक्य परिस्थितीत देवाचे सामर्थ्य प्रकट व्हावे अशी तुमची इच्छा असते. (योहान ११:४१-४४)
  • धन्यवाद देवाच्या उपस्थितीला आकर्षित करणे आणि भूतांना दूर घालवू शकते.
  • धन्यवाद तुम्हांला स्वर्गाच्या न्यायालयात प्रवेश देऊ शकते. (स्तोत्र. १००:४)
  • धन्यवाद दैवी कृपेला प्रेरणा देऊ शकते. (प्रेषित. २:४७)
  • धन्यवादशिवाय, तुमची प्रार्थना पूर्ण नाही. अशक्य हे शक्य होण्याअगोदर तुमची प्रार्थना धन्यवादसह असली पाहिजे. योहान ११:४१-४४ मध्ये आपण पाहिले की ख्रिस्त धन्यवादास त्याच्या प्रार्थनेबरोबर एक करीत आहे.
  • धन्यवाद तुम्हांला देवाच्या परिपूर्ण इच्छेमध्ये आणते (१ थेस्सलनीका. ५:१८). जेव्हा जेव्हा आपण धन्यवाद देतो, तेव्हा आपण सरळपणे देवाची इच्छा पूर्ण करीत आहो, आणि हेच जे देवाची इच्छा पूर्ण करतात तेच देवाच्या इच्छेमध्ये असलेल्या आशीर्वादाचा आनंद घेऊ शकतात. (इब्री. १०:३६)
अनेक वेळेला, इस्राएली लोकांना कुरकुर करणे आणि तक्रार करण्यासाठी शिक्षा देण्यात आली. सैतानाची इच्छा आहे की तुम्ही तक्रार करावी म्हणजे तुम्ही देवाच्या इच्छेबाहेर होऊ शकता. मी प्रार्थना करतो की परमेश्वर येशूच्या नावाने धन्यवादाच्या चमत्कारिक आशीर्वादासाठी तुमच्या समजेस उघडेल.

  • धन्यवाद देणे हा परमेश्वरावर तुमचा विश्वास व्यक्त करण्याचा मार्ग आहे. हे तुमच्या विश्वासाला मजबूत करते आणि तुमच्या अपेक्षेच्या जलद प्रकटीकरणाची हमी देते. (रोम. ४:२०-२२)
  • हे प्रतिकूल परिस्थितींना उलट करू शकते. योना माशाच्या पोटात होता जेव्हा त्याने देवाला धन्यवाद दिला, आणि त्याच्या धन्यवादाच्या अर्पणानंतर, देवाने माशाला आज्ञा दिली की त्यास ओकून टाकावे. (योना २:७-१०)
  • हे चमत्कारिक विजयाची हमी देते. (२ इतिहास २०:२२-२४)
  • धन्यवाद देणे वाढ होण्याची हमी देते. (योहान ६:१०-१३)
  • याची पर्वा नाही की तुम्ही कोणत्या परिस्थितीतून जात आहात, देवाच्या सामर्थ्याच्या प्रकटीकरणासाठी धन्यवाद देणे, स्तुति आणि उपासनेच्या शक्तींना कार्यरत करा. (प्रेषित. १६:२५-२६)
पुढील अभ्यासासाठी: स्तोत्रसंहिता १०७:३१; लूक १७:१७-१९; स्तोत्रसंहिता ६७:५-७

Bible Reading Plan : John 10-14
प्रार्थना
१. माझ्या व माझ्या कुटुंबाच्या सदस्यांच्या जीवनातून निराशेच्या प्रत्येक आत्म्यास मी येशूच्या नावाने उखडून टाकतो.

२. ख्रिस्त येशूमध्ये सर्व आशीर्वाद जे तूं मला दिले आहेत त्यासाठी हे पित्या, तुझा धन्यवाद होवो.

३. पित्या, मी तुला धन्यवाद देतो कारण मी विश्वास ठेवतो की येशूच्या नावाने तूं माझ्या सर्व गरजा पूर्ण केल्या.

४. परमेश्वरा, येशूच्या नावाने मला स्तुतीची वस्त्रे परिधान कर. 

५. पित्या, येशूच्या नावाने तुझ्या आत्म्याने माझ्या हृदयातील पवित्र आत्म्याच्या आनंदास परदेशात पसरू दे.

६. पित्या, येशूच्या नावाने तूं जे सर्व काही केले आहे, तूं जे सर्व काही करत आहे, आणि ते सर्व काही तूं अजून करणार आहे त्यासाठी मी तुला धन्यवाद देतो.

७. पित्या, येशूच्या नावाने मी तुला धन्यवाद देतो कारण मला ठाऊक आहे की सर्व काही मिळून माझ्या चांगल्यासाठी कार्य करीत आहे.

८. जे काही योजिले आहे की माझ्या जीवनात शोक आणावा ते माझ्यासाठी येशूच्या नावाने आनंद आणि आशीर्वादामध्ये बदलावे.

९. हे परमेश्वरा, येशूच्या नावाने माझ्या मुखात नवीन गीत घाल.

१०. येशूच्या नावाने असे होवो की माझ्या शिबिरात आणि ते प्रत्येक जण जे या ४०-दिवसांच्या उपास कार्यक्रमात सहभागी झाले आहेत त्यांच्या घरात आनंदाचा आणि उत्सवाचा नाद असावा. 

११. देवाला धन्यवाद देण्यासाठी अन्य भाषेमध्ये प्रार्थना करा.

१२. देवाला योग्य उपासना आणि स्तुति देण्यासाठी चांगला वेळ घालवा.

Join our WhatsApp Channel


Most Read
● तुमच्या अंत:करणाचे परिश्रमपूर्वक रक्षण करा
● दिवस ३५:४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
● परमेश्वर तुमच्या शरीरा विषयी काळजी करतो काय
● यातना-मार्ग बदलणारा
● राग समजून घेणे
● अन्य भाषे मध्ये बोलणे हे आंतरिक आरोग्य आणते
● दुसऱ्यावर दोष लावणे
टिप्पण्या
संपर्क
फ़ोन: +91 8356956746
+91 9137395828
व्हाट्स एप: +91 8356956746
ईमेल: [email protected]
पता :
10/15, First Floor, Behind St. Roque Grotto, Kolivery Village, Kalina, Santacruz East, Mumbai, Maharashtra, 400098
आमच्या सामाजिक नेटवर्कवर सामील व्हा!
Download on the App Store
Get it on Google Play
मेलिंग यादीमध्ये सामील व्हा
अन्वेषण
कार्यक्रम
थेट प्रसारण
नोहाट्यूब
टी.वी.
देणगी
डेली मन्ना
स्तुती
अंगीकार
स्वप्ने
संपर्क
© 2025 Karuna Sadan, India.
➤
लॉग इन
कृपया या साईट वर टिपणी आणि कंमेंट करण्यासाठी आपल्या NOAH खात्यावर प्रवेश करा |
लॉग इन