डेली मन्ना
दिवस १९ : ४० दिवस उपास व प्रार्थनेचे
Tuesday, 10th of December 2024
26
23
255
Categories :
उपास व प्रार्थना
विध्वंसक सवयींवर मात करणे
"ते त्यांना स्वतंत्रतेचे वचन देतात आणि स्वतः तर भ्रष्टतेचे दास आहेत; कारण मनुष्य ज्याच्या कह्यांत जातो त्याचा तो दासही बनतो." (२ पेत्र २:१९)सवयी तटस्थ असतात; त्या चांगल्या किंवा वाईट असू शकतात. चांगल्या सवयी आपल्याला अपेक्षित आणि सातत्यपूर्ण परिणाम साध्य करण्यात मदत करू शकतात. वाईट सवयी, त्या उलट, आपल्या महानतेस मर्यादित करू शकतात आणि विनाशाकडे नेऊ शकतात.
मी वाईट सवयींना कसे मोडू शकतो?
"मला ते थांबविणे कठीण वाटते." "मला ते पुन्हा करण्याची इच्छा नाही, परंतु मी अडकलो आहे, म्हणून मी ते करीत राहतो." विध्वंसक सवयी असणाऱ्या लोकांना ज्या अडचणींना सामोरे जावे लागते त्यापैकी या काही अडचणी आहेत. आज, येशूच्या नावाने परमेश्वर तुम्हांला, त्या विध्वंसक सवयींवर विजय देईल.
विध्वंसक सवयींनी पुढील गोष्टींकडे नेले आहे
- तुटलेली घरे आणि विवाह
- अकाली मृत्यु
- मध्यपान आणि नशा
- दरोडा
- अपयश
- आरोग्याची आवाहने
- तुरुंग
- दु:ख आणि वेदना
- लैंगिक विकृती
तुम्ही विनाशकारी सवयी मोडू शकतात, परंतु तुम्हांला पवित्र आत्म्याच्या साहाय्याची गरज आहे. त्या विनाशकारी सवयी पूर्वी देहाची कार्ये होती, परंतु तुम्ही जेव्हा फार काळ देहामध्ये चालत राहता, राक्षसी अस्तित्वासाठी दार उघडले जाईल. भुते देहाच्या कार्यावर सहज मात करू शकता, त्यामुळेच तुम्हांला सावधान राहण्याची गरज आहे.
विध्वंसक सवयींची काही उदाहरणे
१. अत्यंत राग (क्रोध)
काही लोक, जेव्हा ते रागात असतात, तेव्हा ते वस्तूंना मोडतात. ते शांत झाल्यावर, ते एकतर नवीन वस्तू विकत आणतात किंवा तुटलेल्या वस्तूला दुरुस्त करतात. कधी कधी ते टेलीव्हिजन तोडतात आणि इतर काहीही जे त्यांच्या हातात येईल. हे राक्षसी आणि विध्वंसक आहे, आणि देवाच्या साहाय्यावाचून, ते त्यास थांबवू शकत नाही.
२. अत्याधिक लैंगिक विचार
असे काही लोक आहेत जे दिवसभर लैंगिक, अनैतिक विचारांनी ग्रासलेले असतात. रात्री देखील, त्यांच्यावर अनैतिक स्वप्नांद्वारे हल्ला होतो. जर प्रकरण असे असेल, तर मग स्पष्ट होते की या व्यक्तीवर भुतांनी हल्ला केला आहे. अशी भुतें व्यक्तीची भावना व देहावर नियंत्रण करते, त्यास तसे सतत करावयास लावते जोपर्यंत तो तुरुंगात किंवा शवपेटीत जात नाही.
यापैंकी काही लोक ते थांबविण्याची इच्छा करतात, परंतु ते त्यांच्या भावनांचे दास बनलेले असतात. त्यांच्या मनातील आणि त्यांच्या भावनांमधील त्या भुताटकी साखळ्या तोडण्यासाठी त्यांना देवाच्या सामर्थ्याची गरज आहे.
३. धूम्रपान
जर तुम्ही टीव्ही वर जाहिराती पाहिल्या, तेथे इशारा असतो की धूम्रपान करणारे तरुण असताना मरण पावू शकतात आणि धूम्रपान करणे हे आरोग्यास धोक्याचे आहे, पण लोक तरीही त्यास विकत घेत राहतात. ते इतके व्यसनाधीन होतात की ते त्यास थांबवू शकत नाही. आपण देवासंबंधी व्यसनाधीन झाले पाहिजे, वस्तूंच्या नाही. वस्तूंचे व्यसन आपले तर्क करणे थांबवू शकते.
मद्य आणि नशा हे त्वरित तर्कशुद्ध मन बंद करू शकतात आणि व्यक्ति विचार न करता कार्य करू शकतात. ज्या क्षणी मन बंद केले जाते, तेव्हा भुतें त्वरित ताबा मिळवितात आणि अत्याचार करण्यासाठी मानवी शरीर व मनाचा वापर करतात. जेव्हा व्यक्ति हा मद्याच्या प्रभावाखाली नसतो आणि त्यास दोषी ठरविले जाते, तेव्हा तो दयेसाठी विनंती करतो, आणि म्हणतो, "मला धक्का देणारा भूत होता."
तुमच्या जीवनाचे परीक्षण करा, आणि तुमच्या नशिबावर आता किंवा नंतर परिणाम करू शकणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या व्यसनापासून दूर राहा.
सवयी हया वारंवार केल्याने होतात, आणि दररोज ज्या गोष्टी तुम्ही करता त्याकडे लक्ष दिल्यावाचून, तुम्ही कदाचित नकळतपणे नकारात्मक सवयी विकसित करू शकता.
विध्वंसक सवयींना कसे मोडावे?
- तुम्हांला पवित्र आत्म्याच्या मदतीची गरज आहे.
पवित्र आत्मा आपला साहाय्यक आहे, आणि तो तुम्हांला त्या विध्वंसक सवयींवर मात करण्यास साहाय्य करू शकतो. एक गोष्ट जी तुम्ही करू शकता ते आत्म्यामध्ये प्रार्थना करणे आहे. अन्य भाषेमध्ये प्रार्थना करणे हे पवित्र आत्म्यास त्या परिस्थितीमध्ये प्रवेश देते.
- प्रार्थनेच्या ठिकाणी त्या सवयींना मोडा.
- सवयीमागील आत्म्याला संबोधित करा.
अनेक विश्वासू लोक या विध्वंसक सवयींना गुप्तपणे लपवीत आहेत, पण अनेक जण हे मान्य करतील की येथे कमीत कमी एक विध्वंसक सवय आहे ज्याबरोबर ते संघर्ष करीत आहेत.
- तुमची नवीन स्थिती कबुली करा.
"तू संकल्प केला तर तो सिद्धीस जाईल;
तुझ्या मार्गावर प्रकाश पडेल." (ईयोब २२:२८)
"जिव्हेच्या हाती मृत्यु व जीवन ही आहेत;
तिची आवड धरणारे तिचे फळ भोगितात." (नीतिसूत्रे १८:२१)
चुकीची कबुली नेहमीच चुकीच्या सवयींना बळ देईल.
- तुमचे विचार बदला
प्रथम ठिकाण जेथे बदल सुरु करावा ते तुमचे मन आहे. जर तुमचे मन हे योग्य ज्ञानाने सशक्त झाले नाही, तर ते तुमच्या कबुलीजबाब व आचरणावर परिणाम करील. तुमचे मन वचनाने नवीन करा म्हणजे तुमचे मन हे मात करण्यासाठी सशक्त केले जाऊ शकते.
- एका नवीन सवयीची निवड करा, आणि त्यामध्ये वाढत राहा.
" १७ त्याप्रमाणे प्रत्येक चांगल्या झाडाला चांगले फळ येते आणि वाईट झाडाला वाईट फळ येते. १८ चांगल्या झाडाला वाईट फळे येणे शक्य नाही, आणि वाईट झाडाला चांगली फळे येणे शक्य नाही." (मत्तय ७:१७-१८)
Bible Reading Plan : Act 5-9
प्रार्थना
१. येशूच्या रक्ताने, मी येशूच्या नावाने माझे नशीब नष्ट करू इच्छित असलेल्या प्रत्येक विध्वंसक सवयींपासून दूर आहे.
२. कोणत्याही विध्वंसक सवयी ज्या मला अकाली मारू इच्छितात त्या येशूच्या नावाने नष्ट केल्या जातील.
३. देवाची शक्ती, येशूच्या नावाने मला विध्वंसक सवयींपासून दूर कर.
४. पवित्र आत्म्याचा अग्नि, माझा आत्मा, जीव आणि शरीरामधून जा; आणि येशूच्या नावाने माझ्या जीवनातील राक्षशी ठेवा बाहेर काढून टाक.
५. माझ्या मनावरील अंधाराचा कोणताही बालेकिल्ला, येशूच्या नावाने तोडून टाक.
६. मी येशूच्या नावाने माझ्या जीवनातून अंधाराची कोणतीही लागवड उखडून टाकली आहे.
७. पित्या, येशूच्या नावाने माझ्या जीवनाच्या पायास दुरुस्त कर.
८. येशूच्या नावाने, येशूच्या रक्ताने माझ्या रक्तातील अशुद्धता बाहेर काढून टाकली जावो.
९. येशूच्या नावाने, माझ्या जीवनातील कोणत्याही नकारात्मक वर्तणूक आणि भावना सुधारण्यासाठी मला कृपा प्राप्त झाली आहे.
१०. विध्वंसक सवयींद्वारे बांधून ठेवलेल्या अंधाराच्या कोणत्याही साखळीतून मी येशूच्या नावाने स्वतःला मोकळे करतो.
Join our WhatsApp Channel
Most Read
● तणावाला नियंत्रणात ठेवण्याचे ३ सामर्थ्यशाली मार्ग● येशूने गाढवावर स्वारी का केली?
● एका उद्देशाने जन्म घेणे
● अडथळ्यांपासून ते पुनरागमनापर्यंत
● एक घुंगरू व एक डाळिंब
● जीवनाचे मोठे खडक ओळखणे आणि प्राथमिकता देणे
● काही अतिरिक्त भार घेऊ नये
टिप्पण्या