डेली मन्ना
दिवस २४:४० दिवसांचा उपवास आणि प्रार्थना
Sunday, 15th of December 2024
29
23
187
Categories :
उपास व प्रार्थना
मला खरोखर आशीर्वाद दे
“याबेसाने इस्राएलाच्या देवाजवळ वर मागितला तो असा: ‘तू माझे खरोखर कल्याण करशील, माझ्या मुलखाचा विस्तार वाढवशील आणि माझ्यावर कोणतेही अरिष्ट येऊन मी दु:खी न व्हावे म्हणून तुझा हात माझ्यावर राहील तर किती बरे होईल!’ त्याने मागितलेला हा वर देवाने त्याला दिला.” (१ इतिहास ४:१०)
आशीर्वाद हे स्पष्ट आध्यात्मिक शक्ती आहे जे पृथ्वीवरील कार्ये आणि परिणाम घडवते. विश्वासामधील आपल्या वडिलांनी आशीर्वादांच्या शक्तीला समजले होते. आशीर्वाद त्यांच्या जीवनात प्रमुख प्राथमिकता होते. याकोबासारखे त्यांनी त्याच्यासाठी आतुरता दाखवली, त्यांनी प्रार्थना केली, आणि त्यासाठी लढाई केली. दुर्दैवाने, आपण त्या काळात आहोत, जेथे आशीर्वादाच्या मूर्त स्वरूपावर फारच कमी लक्ष दिले जाते. प्रत्येक जण रिकामीपणाच्या तात्पुरत्या प्रदर्शनाच्या मागेच आहे.
आशीर्वादासाठी प्रार्थना करणे ही प्रार्थनांपैकी एक महत्वाची गोष्ट आहे जी एका विश्वासणाऱ्याने नेहमीच प्रार्थना केली पाहिजे. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यांवर, आपण स्वतः ज्या नवीन पातळींना सामोरे जातो त्यासाठी आपल्याला नवीन आशीर्वादांची आवश्यकता लागते.
कोण आशीर्वाद देऊ शकतो?
येथे वेगवेगळे लोक आहेत जे आशीर्वाद देऊ शकतात.
१. देव.
देवाने सर्वकाही निर्माण केले. त्याने सर्वांवर आशीर्वाद घोषित केला. आजपर्यंत, आशीर्वाद हा अजूनही लागू आहे, जरी पापाने मनुष्याला आशीर्वादाच्या पूर्णतेचा अनुभव करण्यापासून रोखलेले आहे.
“देवाने आपल्या प्रतीरुपाचा मनुष्य निर्माण केला; देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला. नर व नारी अशी ती निर्माण केली. देवाने त्यांना आशीर्वाद दिला....” (उत्पत्ती १:२७-२८)
२. उच्च पदावर असणारा एखादा व्यक्ती.
आध्यात्मिक क्षेत्रात, श्रेष्ठतेचा आदर केला जातो. एक चांगले उदाहरण हे जेव्हा देवाने आज्ञा दिली की आपण आपल्या आईबापाचा सन्मान केला पाहिजे. पाल्य मुलांपेक्षा श्रेष्ठ पदावर आहेत, आणि आशीर्वाद आणि शाप देण्याची त्यांच्याकडे क्षमता आहे. रऊबेनला त्याच्या पित्याकडून शाप मिळाला (उत्पत्ती ४९:३-४). याकोबाने त्याच्याहीअगोदर त्याच्या इतर मुलांना आशीर्वाद दिला. याकोबाला हे समजले होते की, वडील म्हणून, त्याचे पद त्याला त्याच्या मुलांना आशीर्वाद देण्यास समर्थ करते.
“२६ तुझ्या पित्याची वरदाने प्राचीन पर्वतांच्या वरदानांहून श्रेष्ठ आहेत; ती सनातन डोंगरांपासून प्राप्त होणाऱ्या इष्ट वस्तुंहून श्रेष्ठ आहेत; हे आशीर्वाद योसेफाच्या मस्तकी, आपल्या भाऊबंदात जो प्रमुख त्याच्या शिरी येवोत...२८ हे सगळे इस्राएली बारा वंश आहेत. त्यांचा बाप त्यांना आशीर्वाद देताना वचने बोलला ती हीच; प्रत्येकाला ज्याच्या-त्याच्या आशीर्वादाप्रमाणे त्याने आशीर्वाद दिला.” (उत्पत्ती ४९:२६, २८)
३. देवाचा प्रतिनिधी
देवाचा प्रतिनिधी देखील तुम्हांला आशीर्वाद देऊ शकतो. पाच-पदरी सेवाकार्यांमधील, तुमचे पास्टर, संदेष्टा किंवा इतर कोणीही किंवा कोणीतरी जो तुमच्यापेक्षा आध्यात्मिकदृष्ट्या मोठा आहे तो तुम्हांला आशीर्वाद देऊ शकतो. ज्यांच्याकडे आध्यात्मिक अधिकार आहे त्यांच्याकडून आशीर्वाद मोकळा केला जातो.
४. ज्यांना आशीर्वाद मिळालेले आहेत ते देखील इतरांना आशीर्वाद देऊ शकतात.
हे जे तुमच्याजवळ आहे जे तुम्ही इतरांना देऊ शकता. जर एखादा व्यक्ती आशीर्वादित आहे, तर आपोआप त्यांच्याकडे संभावना आहे की इतरांना आशीर्वाद द्यावेत.
“मी तुझ्यापासून मोठे राष्ट्र निर्माण करीन; मी तुला आशीर्वाद देईन, तुझे नाव मोठे करीन; तू आशीर्वादित होशील.” (उत्पत्ती १२:२)
देवाने अब्राहामाला अभिवचन दिले की तो त्याला आशीर्वाद देईल, पण त्याला ही देखील आज्ञा दिली की, “आणि तू आशीर्वादित होशील.”
आपण आशीर्वाद देण्यासाठी आशीर्वादित झालो आहोत. आपण हे नाही विसरले पाहिजे की देवाकडून आपल्याला मिळालेले प्रत्येक आशीर्वाद इतरांना आशीर्वादित करण्यासाठी आहे. जर आपण आशीर्वाद देण्यात चुकलो, तर देवाकडून मिळणाऱ्या आशीर्वादाला ते आपल्यासाठी मर्यादित करेल. आपण देवाच्या आशीर्वादाचे कारभारी आहोत आणि तो ज्या कोणाला आपल्याकडे पाठवतो त्यांना आपण ते काळजीपूर्वक वाटले पाहिजे. आज, आपण आशीर्वाद देण्यासाठी आपल्या स्वतःला योग्य ठिकाणी नेण्यासाठी प्रार्थना आणि उपास करणार आहोत.
Bible Reading Plan : Romans 5-10
प्रार्थना
तुमच्या मनापासून येईपर्यंत प्रत्येक प्रार्थना अस्त्र वारंवार म्हणत राहा. केवळ तेव्हाच पुढील प्रार्थना अस्त्राकडे वळा. घाई करू नका.
१. येशूच्या नावाने, मी जेव्हा बाहेर जातो, मी जेव्हा आत येतो तेव्हा मी आशीर्वादित आहे, आणि ज्या कशाला मी स्पर्श करतो ते येशूच्या नावाने आशीर्वादित होते. (अनुवाद २८:६)
२. माझे प्रत्येक पाप आणि माझ्या आशीर्वादाच्या आड जे काही प्रमुख अडथळा आहे त्यास येशूच्या नावाने येशूच्या रक्ताने धुवावे. (याकोब ५:१६)
३. मला मिळणाऱ्या आशीर्वादाच्या विरोधात केलेले कोणतेही शस्त्र येशूच्या नावाने संपन्न होणार नाही असा मी आदेश देतो. (यशया ५४;१७)
४. माझा व्यवसाय, कुटुंब आणि जे काही माझ्या संबंधात आहे त्यामध्ये येशूच्या नावाने देवाचा आशीर्वाद प्रवाहित होवो. (नीतिसूत्रे १०:२२)
५. पित्या, प्रत्येक शाप जो माझ्या विरोधात बोलला गेला आहे त्याला येशूच्या नावात आशीर्वादात बदल. (नहेम्या १३:२)
६. देवाच्या आशीर्वादाने, मी माझी गुंतवणूक आणि परिश्रमात येशूच्या नावाने प्रगतीचा आनंद घेईन. (स्तोत्र. ९०:१७)
७. माझ्या जीवनाच्या विरोधात कार्य करणारे आशीर्वाद-विरोधी करार, सौदा आणि अंधाराच्या प्रत्येक शक्तीला येशूच्या नावाने मी नष्ट करतो. (कलस्सै. २;१४-१५)
८. माझा आशीर्वाद आणि गौरवाला हिसकावून घेणाऱ्याला येशूच्या नावाने प्रतिबंधित करतो. (मलाखी ३;११)
९. परमेश्वरा, स्वर्गाच्या खिडक्या उघड आणि येशूच्या नावाने माझ्यावर आशीर्वादाचा वर्षाव कर. (मलाखी ३:१०)
१०. पित्या, आशीर्वादात चालणे आणि ते सक्रीय करण्यासाठी मला शहाणपण प्रदान कर जे येशूच्या नावाने ख्रिस्त येशूमध्ये माझेच आहे. (याकोब १:५)
Join our WhatsApp Channel
Most Read
● केव्हा शांत राहावे आणि केव्हा बोलावे?● आत्म्याची फळे कशी विकसित करावी-2
● प्रतिदिवशीज्ञानीहोत कसे वाढावे?
● शहाणपणाची पारख होत आहे
● तुमच्या पीडे मध्ये देवाच्या अधीन होण्यास शिकणे
● जीवन हे रक्तात आहे
● यहूदा च्या जीवनाकडून धडा- १
टिप्पण्या