डेली मन्ना
दिवस ३१:४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
Sunday, 22nd of December 2024
12
14
69
Categories :
उपास व प्रार्थना
रक्ताद्वारे विजय
“आणि ज्या घरात तुम्ही असाल त्या घरात ते रक्त तुमच्याकरता खूण असे होईल. आणि जेव्हा मी रक्त पाहीन तेव्हा मी तुम्हांला ओलांडून जाईन. मिसर देशाच्या लोकांना मी मारीन तेव्हा तुमच्यावर अनर्थ येणार नाही, तुमचा नाश होणार नाही.” (निर्गम १२:१३)
वल्हांदणा दरम्यान, प्राण्याचे रक्त ख्रिस्ताच्या रक्ताचा प्रकार म्हणून वापरले जात होते. प्राण्याचे ते रक्त ख्रिस्ताच्या रक्ताकडे इशारा करत होते. देवाने इस्राएली लोकांना सांगितले होते की जेव्हा तो रक्त पाहील, तेव्हा तो त्यांना ओलांडून जाईल. ही ती वेळ होती जेव्हा एक शक्तिशाली मरी संपूर्ण राष्ट्रावर, मिसर राष्ट्रावर येणार होती. देव त्याच्या लोकांना रक्ताद्वारे मुक्ती प्रदान करत होता.
यावरून, येशूच्या रक्तामधील शक्तीबद्दल आपण शिकू शकतो. येशूच्या रक्तामध्ये येथे विजय आहे जेव्हा आपण ते केवळ आपल्या स्वतःलाच लावत नाही पण आपल्या संपूर्ण घराण्याला देखील लावतो. ते आपल्याला वाईटापासून वाचवू शकते.
अनेकदा, जेव्हा अचानकपणे हल्ला होतो, अविश्वासू आणि काही विश्वासात कमकुवत ख्रिस्ती लोक हे केवळ ओरडतात आणि म्हणतात, “आहा! परंतु जेव्हा तुम्ही समजता की येशूचे रक्त, त्या अचानक हल्ल्याच्या वेळी काय करू शकते, तेव्हाच तुम्हांला रक्तासाठी मागणी आणि आक्रोश करायचा आहे. हे त्या वेळेमध्ये, तुम्ही येशूच्या रक्तासाठी आक्रोश कराल कारण ते अचानक हल्ले, मरी, अपघात आणि दुष्टाला काढून टाकू शकते.
निर्गम २४, वचन ८ म्हणते,
“नंतर मोशेने रक्त घेऊन लोकांवर टाकले, आणि म्हटले, ‘पाहा, परमेश्वराने ह्या सर्व वचनांप्रमाणे तुमच्याशी जो करार केला आहे त्याचे हे रक्त होय.”
हा करार जुन्या कराराशी संबंधित होता, परंतु नवीन कराराशी तेच तत्व लागू होते. जेव्हा येशूने वधस्तंभावर त्याचे रक्त वाहिले, तेव्हा आध्यात्मिक क्षेत्रात रक्त हे आपल्यावर ओतले गेले की आपल्याला शुद्ध करावे, आपल्याला पवित्र करावे आणि आपल्याला धार्मिक ठरवावे आणि आपल्याला देवाच्या करारामध्ये शिक्कामोर्तब करावे.
येशूचे रक्त एकदाच आणि सर्वांसाठी वाहिले गेले आहे, आणि ते अजूनही आजपर्यंत बोलत आहे. ते हाबेलाच्या रक्तापेक्षा उत्तम असे बोलते (इब्री. १२:२४). काही रक्त सूड बोलते. जर कोणाला अन्यायीपणे मारले आहे, तर ते रक्त बोलू शकते. म्हणूनच जेव्हा काइनाने हाबेलाला ठार केले, तेव्हा हाबेलाचे रक्त जमिनीतून तरीही बोलत होते (उत्पत्ती ४:१०). म्हणून, जेव्हा लोकांना अन्यायीपणे मारले जाते, तेव्हा त्यांचा आवाज बोलू शकतो आणि ते आवाज ज्या व्यक्तीने त्यांना मारले आहे आणि त्याच्या पिढीच्या विरोधात न्याय बोलत असते. परंतु येशूचे रक्त आपल्यासाठी उत्तम गोष्टी बोलत आहे. येशूचे रक्त आपल्यासाठी दोषमुक्त होण्यासाठी बोलत आहे. येशूचे रक्त आपल्यासाठी शुद्धता आणि मुक्तीसाठी बोलत आहे.
रक्त बोलू शकते कारण एखाद्या जिवाचे जीवन रक्तात असते (लेवीय १७;११); ख्रिस्ताचे जीवन देखील त्याच्या रक्तात आहे. म्हणून, जेव्हा त्याने त्याचे रक्त वाहिले, तेव्हा हे दाखवण्याचा हा एक मार्ग आहे की त्याने आपले जीवन आमच्यासाठी दिले.
स्तोत्र. १०६, वचन ३८ म्हणते,
“त्यांनी निरपराध्यांचा रक्तपात केला, ....”
या जगात येथे दुष्ट लोक आहेत जे आजही निष्पाप रक्त वाहवत आहेत. जेव्हा लोक मरत आहेत तेव्हा ते हर्ष करतात. जेव्हा लोक पडतात तेव्हा ते आनंदी होतात. जर तुम्ही त्यांच्यावर ताबा मिळवला नाही आणि त्यांच्यावर मात केली नाही, तर ते तुमचे जीवन नष्ट करण्यास तयार आहेत. पवित्र शास्त्र म्हणते की संपूर्ण जग हे दुष्टतेमध्ये पडलेले आहे (१ योहान. ५:१९).
येथे सर्वत्र दुष्ट लोक आहेत जे लोकांवर हल्ले करण्याचा प्रयत्न करत आहेत. आध्यात्मिक क्षेत्रात देखील येथे आध्यत्मिक शक्ती आहेत ज्या देखील लोकांवर हल्ले करत आहेत. येशूच्या रक्ताद्वारे, तुम्हांला या सर्व शक्ती आणि सामर्थ्यावर विजय आहे, कारण पवित्र शास्त्र म्हणते की ज्याने आपल्यावर प्रेम केले त्याच्या द्वारे आपण विजय मिळवणाऱ्यापेक्षा अधिक आहोत. (रोम. ८;३७)
प्रकटीकरण अध्याय १२, वचन ११ म्हणते,
“त्याला त्यांनी कोकऱ्याच्या रक्तामुळे व आपल्या साक्षीच्या वचनामुळे जिंकले; आणि त्यांच्यावर मरायची पाळी आली तरी त्यांनी आपल्या जीवावर प्रीती केली नाही.”
येशूच्या रक्ताद्वारे, आपण प्रत्येक शक्ती, आणि युद्धात विजय मिळवतो जे आपल्या मार्गात येऊ शकते. येशूच्या रक्तात पुरेशी शक्ती आहे की आपल्याला दुष्टावर विजय द्यावा.
येशूच्या रक्ताद्वारे आपल्या मार्गात येणारा सैतान आणि कोणतीही प्रणाली आणि शक्तींवर आपण विजय मिळवू शकतो. परंतु रक्त काय करू शकते हे तुम्ही समजले पाहिजे आणि येशूच्या रक्ताच्या शक्तीमध्ये आत्मविश्वास असला पाहिजे. आज, जेव्हा आपण प्रार्थना करतो, आणि येशूच्या रक्ताद्वारे विजय प्राप्त करतो, तेव्हा माझी इच्छा आहे की येशूचे रक्त तुमच्यासाठी काय करू शकते त्यासाठी तुम्ही सतत प्रार्थना करावी, चिंतन करावे आणि अध्ययन करत राहावे जेणेकरून तुमचा विजय रात्रंदिवस सांभाळला जाऊ शकतो.
प्रार्थना
तुमच्या मनापासून येईपर्यंत प्रत्येक प्रार्थना अस्त्र वारंवार म्हणत राहा. केवळ तेव्हाच पुढील प्रार्थना अस्त्राकडे वळा. घाई करू नका.
१. येशूच्या नावाने, माझ्या प्रगतीच्या आणि माझ्या गौरवाच्या विरोधात लढा देणाऱ्या आध्यात्मिक क्षेत्रातील आणि भौतिक क्षेत्रातील प्रत्येक शक्तींवर मी विजय मिळवतो. (रोम. ८:३७)
२. प्रत्येक घराण्यावरील शक्ती, माझ्या गौरवी नशिबाच्या विरोधात लढा देत आहे त्यांच्यावर येशूच्या नावाने मी विजय मिळवतो. येशूच्या रक्ताद्वारे मी तुझ्यावर मात करतो. (प्रकटीकरण १२:११)
३. माझ्या आयुष्यावर लटकत असलेला प्रत्त्येक न्याय, येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे मी तुझा नाश करत आहे. (इब्री. १२:२४)
४. माझ्या नशिबाच्या विरोधात दोष लावणारी प्रत्येक वाणी, अपराधी ठरवणे आणि न्याय बोलणाऱ्या प्रत्येक वाणीला मी गप्प करत आहे. येशूच्या रक्ताद्वारे, मी येशूच्या नावाने तुला गप्प करत आहे. (कलस्सै. २:१४)
५. येशूच्या रक्ताद्वारे, माझ्या विरोधात रचलेल्या प्रत्येक शस्त्राला मी नष्ट करतो. येशूच्या नावाने ते यशस्वी होणार नाही. (यशया ५४:१७)
६. येशूच्या रक्ताद्वारे, येशूच्या नावाने मी उत्सव करण्याच्या क्षेत्रात चालत आहे. कोणतीही शक्ती जी माझ्या साक्षीला रोखत आहे, तिचे पतन व्हावे आणि येशूच्या नावाने वाया जावी. (स्तोत्र. ११८:१५)
७. येशूचे रक्त, प्रत्येक घराण्याच्या दुष्टाईवर माझ्यासाठी येशू ख्रिस्ताच्या नावाने लढा दे. (इफिस. ६:१२)
८. माझ्या स्वतःला, माझ्या जोडीदाराला, माझ्या मुलांना, माझ्या व्यवसायाला आणि जे सर्व माझ्या आणि माझ्या प्रियजनांसंबंधी आहे त्या सर्वांना येशूच्या रक्ताने मी आच्छादित करतो. (स्तोत्र. ९१:४)
९. येशूच्या रक्ताद्वारे, अंधाराच्या प्रत्येक लिखाणास मी उलट करतो आणि पुसून टाकतो. कोणत्याही महिन्यासाठी रचलेला अंधाराचा राहून गेलेला प्रत्येक हल्ला जो माझ्या जीवनात प्रकट होण्याची वाट पाहत आहे, तो येशूच्या नावाने पुसून टाकला जावा आणि रद्द केला जावा. (कलस्सै. २:१५)
१०. येशूचे रक्त, माझ्या जीवनातून जा आणि प्रत्येक प्रदूषण, प्रत्येक विष, जे स्वप्नामध्ये माझ्या जीवनात टाकले आहे ते येशू ख्रिस्ताच्या नावाने काढून टाक. (१ योहान. १:७)
Join our WhatsApp Channel
Most Read
● स्वैराचाराच्या सामर्थ्यास मोडणे-२● एक स्थान ज्यास स्वर्ग म्हणतात
● प्रीतीचे खरे स्वरूप
● बंदिस्त शक्ती: न वापरलेल्या वरदानांचा नाश
● चिंते वर वर्चस्व मिळविण्यासाठी, ह्या गोष्टींवर विचार करा
● आपल्या आध्यात्मिक सामर्थ्याचे नुतनीकरण कसे करावे -२
● काही पुढाऱ्यांचे पतन होते याकारणामुळे आपण माघार घेतली पाहिजे काय?
टिप्पण्या