डेली मन्ना
दिवस ३८ :४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
Sunday, 29th of December 2024
20
15
194
Categories :
उपास व प्रार्थना
आजार आणि दुर्बलतांविरुद्ध प्रार्थना
“तुमच्यापैकी कोणी दुखणाईत आहे काय? त्याने मंडळीच्या वडिलांना बोलवावे आणि त्यांनी प्रभूच्या नावाने त्याला तेल लावावे व त्याच्यावर ओणवून प्रार्थना करावी. विश्वासाची प्रार्थना दुखणाइताला वाचवील आणि प्रभू त्याला उठवील आणि त्याने पापे केली असतील तर त्याला क्षमा होईल.” (याकोब ५:१४-१५)
आजार आणि दुर्बलता ह्या चांगल्या गोष्टी नाहीत ज्या त्यांच्या जीवनात असाव्यात अशी कोणीही अपेक्षा ठेवत नाहीत. दुर्दैवाने, येथे काही गोष्टी आहेत जे लोकांच्या जीवनात घडतात. अविश्वासणाऱ्यासाठी येथे काहीही आशा नाही. का? एकच गोष्टी जी व्यक्ती करू शकतो ते अत्यंत धडपड करत राहावी, त्याच्यासाठी पर्याय किंवा बरे होण्यासाठी अपेक्षा बाळगत राहावी. परंतु येथे विश्वासणाऱ्यासाठी, आशा आहे. कारण ख्रिस्तामधील तुमच्या कराराच्या अधिकारामुळे, तुम्ही आजारी राहण्यासाठी नाहीत. परंतु परिस्थितींवर आधारित, जेव्हा सैतान पाण्याच्या लोंढ्याप्रमाणे, तुमच्यावर आजाराचा हल्ला करण्यास येतो, तेव्हा प्रतिकार करणे आणि लढा देण्यासाठी तुमच्याजवळ देवाचे वचन आहे. त्याचा प्रतिकार करण्यासाठी तुमच्याजवळ कराराचा अधिकार आहे (याकोब ४:७). कारण आजार आणि रोग हे तुमच्यासाठी देवाची इच्छा नाहीत, म्हणून तुमच्या शरीरात तुम्ही त्याचा अस्वीकार, त्याचा प्रतिकार, आणि त्याला नष्ट केले पाहिजे.
आजार आणि रोग लज्जा आणते. रक्तस्त्रावी स्त्री देखील अशा प्रकारच्या दुर्बलतेने पिडीत होती, आणि तिला लाज वाटत होती. तिचे मस्तक झुकलेले होते (लूक. ८:४३-४८). सार्वजनिक ठिकाणी, रक्त वाहण्याच्या आजारामुळे तिला स्वतंत्रपणे फिरण्याची मोकळीक नव्हती.
आजार आणि दुर्बलता लोकांच्या नशिबाला मर्यादित करू शकतात. एक प्रदीर्घ जुन्या आजारासह कोणाला प्रगती करताना पाहणे कठीण आहे. कारण आजार व्यक्तीला खिळवून ठेवतो. म्हणून, सैतान, लोकांना त्रास देण्यासाठी आजार आणि ह्या दुर्बलतांचा वापर करतो जेणेकरून त्यांच्या नशिबाला मर्यादित करावे, आणि कधीकधी तो त्याचा वापर नशिबाला अकालीच संपुष्टात आणण्यासाठी करतो.
माझी इच्छा आहे की तुम्ही तुमच्या आत्म्यात क्रोधात यावे. आज तो दिवस आहे जेव्हा आपण प्रत्येक आजार आणि दुर्बलतेला नष्ट करणार आहोत जे तुमच्या शरीराच्या कोणत्याही भागात लपून राहिलेले आहे. कधीकधी लोकांना हे कळत नाही की त्यांच्या शरीरात, सैतानाने तेथे आजार आणि दुर्बलता टाकलेली आहे. ह्या गोष्टी, पहिल्या प्रथम आध्यात्मिक क्षेत्रात केल्या जातात. म्हणूनच कोणाला स्वप्न पडू शकते, आणि स्वप्न कदाचित एक किंवा दोन वर्षांनी प्रकट होते. त्या गोष्टी, पहिल्या प्रथम, आध्यात्मिक क्षेत्रात प्रोग्राम केल्या जातात परंतु भौतिक क्षेत्रात प्रकट होण्यासाठी काही वेळ घेतात.
म्हणून, जे काही तुमच्या शरीरात पेरले आहे, ही एक उत्तम वेळ आहे की त्यास नष्ट करावे जेव्हा तुम्ही अजूनही सुदृढ आहात. आजाराने भौतिक क्षेत्रात तुमच्याकडे यावे आणि तुमच्यावर हल्ला करण्यापर्यंत वाट पाहू नका.
“नासोरी येशूला देवाने पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा अभिषेक केला; तो सत्कर्मे करत व सैतानाच्या सत्तेखाली असलेल्या सर्वांना बरे करत फिरला; कारण देव त्याच्याबरोबर होता.” (प्रेषित. १०:३८)
सैतान लोकांवर आजार आणि दुर्बलतेद्वारे अत्याचार करतो. या उद्देशासाठीच, देवाचा पुत्र प्रकट झाला जेणेकरून तो सैतानाच्या कार्याला नष्ट करावे (१ योहान. ३:८). सैतानाची कृत्ये काय आहेत? आजार आणि दुर्बलता हे त्याचा भाग आहेत. जे सर्व अत्याचारित होते त्या सर्वांना येशू बरे करत होता.
“नंतर येशू यहूदी लोकांच्या सभास्थानांत सुवार्तेची घोषणा करत व राज्याची सुवार्ता गाजवत आणि लोकांचे सर्व प्रकारचे रोग व सर्व प्रकारची दुखणी बरी करत गालीलभर फिरला. आणि त्याची कीर्ती सूरिया देशभर पसरली; तेव्हा जे नाना प्रकारचे रोग आणि व्यथा ह्यांनी पिडलेले होते, जे भूतग्रस्त, फेफरेकरी व पक्षाघाती होते, अशा सर्व दुखणाइतांना त्याच्याकडे आणले, आणि त्याने त्यांना बरे केले.” (मत्तय. ४:२३-२४)
लोक अनेक समस्यांना तोंड देत आहेत. पुष्कळ लोकांचे आरोग्य आक्रमणात आहे. पुष्कळ लोक आध्यात्मिक हल्ल्याचा सामना करत आहेत. येशूच्या काळात, तो सर्वांना बरे करत होता. जर डॉक्टरांनी त्या लोकांना बरे केले असते जे येशूकडे येत होते, तर मला खात्री आहे की त्यांनी त्यांना दवाखाण्यात नेले असते, परंतु ती प्रकरणे ही वैद्यकीय स्पष्टीकरणाच्याही पलीकडची होती.
शत्रू गर्जणाऱ्या सिंहासारखा फिरत आहे, कोणाला गिळावे हे तो पाहत आहे. म्हणजे जेव्हा येथे लहानशी जागा मिळते, तेव्हा तो आजार आणि रोगाने हल्ला करू शकतो. म्हणूनच, माझी इच्छा आहे की तुम्ही आज प्रार्थना करावी की त्या प्रत्येक उघड्या जागेंना बंद करावे.
आजार आणि दुर्बलतेची कारणे काय आहेत?
१. पाप: जेव्हा येशूने त्या माणसाला बरे केले, तेव्हा त्याने त्याला सांगितले, “जा आणि येथून पुढे पाप करू नको, नाहीतर याहून अधिक तुझी दुर्दशा होईल” (योहान. ५:१४-१५). पाप लोकांच्या जीवनात भुते, सैतान आणि आजारांना आकर्षित करते.
२. चुकीचे निर्णय: जीवन आणि मृत्यूचे सामर्थ्य जीभेमध्ये आहे, म्हणून जेव्हा तुम्ही चुकीच्या गोष्टी बोलत आहात, तेव्हा तुम्ही तुमच्या जीवनात चुकीच्या आत्म्याला आकर्षित करत आहात. ते नंतर आजार आणि दुर्बलतेकडे नेऊ शकते. (नीतिसूत्रे. १८:२१)
३. आध्यात्मिक हल्ले: येथे जादूटोण्याचे हल्ले आहेत जे आजार आणि दुर्बलता देखील उत्पन्न करू शकतात. म्हणूनच, त्यांचा नाश करण्यासाठी आपल्याला प्रार्थना करण्याची आवश्यकता आहे.
४. लैंगिक अनैतिकता: येथे पुष्कळ लोक आहेत जे वेगवेगळ्या लोकांसोबत सहवास किंवा लैंगिक संबंध ठेवत आहेत. ते त्यांच्या स्वतःला वेगवेगळ्या प्रकारच्या आत्म्यांसाठी आणि वेगवेगळ्या प्रकारच्या हल्ल्यांसाठी उघडे करत आहेत. हे कदाचित आता मधुर वाटत असेल, पण तेथे त्या कृत्यात यातना आहे. जेव्हा आदाम व हव्वेने बागेत त्या फळाला खाल्ले, ते कडू नव्हते. ते कडू फळ आहे म्हणून त्यांनी तक्रार केली नव्हती. ते तोंडाला गोड वाटत होते, परंतु सार्वकालिक दोषी होण्याकडे नेले.
Bible Reading Plan: Revelation 1-7
प्रार्थना
तुमच्या मनापासून येईपर्यंत प्रत्येक प्रार्थना अस्त्र वारंवार म्हणत राहा. केवळ तेव्हाच पुढील प्रार्थना अस्त्राकडे वळा. घाई करू नका.
१. येशूच्या नावाने, माझ्या जीवनातून प्रत्येक आजार, आणि दुर्बलतेला येशूच्या नावाने मी उपटून टाकतो. (यशया ५३:५)
२. येशूचे रक्त, माझे शरीर आणि माझ्या रक्तातून कोणताही दूषितपणा आणि प्रदूषण येशू ख्रिस्ताच्या नावाने धुवून काढ. (१ योहान. १:७)
३. देवाची अग्नी माझ्या जीवनातून जा आणि माझ्या जीवनातून अंधाराचा प्रत्येक ठेवा येशूच्या नावाने नष्ट कर. (इफिस. ५:११)
४. जिवंतांच्या भूमीत देवाचे गौरव घोषित करण्यासाठी येशूच्या नावाने मी जगेन, पण मरणार नाही. (स्तोत्र. ११८:१७)
५. तू दुर्बलतेचा आत्मा जो माझ्या जीवनाला उद्देशून कार्यान्वित केलेला आहे आणि प्रकट होण्याची वाट पाहत आहे, तो येशूच्या नावाने नष्ट केला जावा. (लूक. १३:११-१३)
६. येशूच्या नावाने मी मरणार नाही. (अनुवाद ३०:१९)
७. हे परमेश्वरा, आजारी लोकांना बरे करण्यासाठी आणि तुझे राज्य पृथ्वीवर वाढवण्यासाठी येशूच्या नावाने मला समर्थ कर. (मार्क. १६:१७-१८)
८. हे परमेश्वरा माझ्या आत्मिक मनुष्याला येशूच्या नावाने समर्थ कर. (इफिस. ३:१६)
९. माझ्या जीवनाच्या विरोधात आजाराचा कोणताही बाण जो सोडला आहे, तो येशूच्या नावाने पाठवणाऱ्याकडे परत जावा. (स्तोत्र. ३५:८)
१०. पित्या, तुझे रक्त माझ्या जीवनाभोवती येशूच्या नावाने ढाल असे होवो. (स्तोत्र. ९१:४)
Join our WhatsApp Channel
Most Read
● देवाचे ७ आत्मे: उपदेशाचाआत्मा● यहूदा च्या जीवनाकडून धडा- १
● महानतेचे बीज
● महान पुरुष व स्त्रिया का पतन पावतात - ४
● आपल्यामध्येच खजिना
● तुमच्या अंत:करणाचे परिश्रमपूर्वक रक्षण करा
● धन्यवादाचे सामर्थ्य
टिप्पण्या