अनेकदा, आपल्या प्रार्थना ह्या मागणींची यादी आहे असे दिसते. “परमेश्वरा हे ठीक कर”, “परमेश्वरा मला आशीर्वादित कर”, “परमेश्वरा ही समस्या काढून टाक.” आपण आपल्या गरजा देवाजवळ आणाव्यात असे देवाला वाटत असले तरी (फिलिप्पै. 4:6), येथे प्रार्थनेसाठी अधिक गहन आणि परिपक्व दृष्टीकोन आहे : देवाला विचारणे, मी काय करावे अशी तुझी इच्छा आहे? हा प्रश्न आपल्यापासून त्याच्याकडे लक्ष केंद्रित करतो. ते आपल्या प्रार्थनांना मुख्य ठेवण्यापासून आपल्याला देवाच्या इच्छेवर लक्ष केंद्रित करण्याकडे नेते.
ह्याचा विचार करा : जेव्हा शौलाची दमास्कसच्या रस्त्यावर येशूशी भेट झाली, त्याचा प्रथम प्रतिसाद हा नव्हता, “परमेश्वरा, मला ह्या आंधळेपणापासून सोडीव, किंवा “ परमेश्वरा स्वतःला स्पष्ट कर.” त्याऐवजी, शौल जो नंतर पौल झाला त्याने विचारले, “परमेश्वरा, मी काय करावे अशी तुझी इच्छा आहे”? (प्रेषित 9:6). त्या प्रश्नाने त्याच्या जीवनात आमुलाग्र परिवर्तनास सुरुवात केली.
देवाच्या वाणीला ऐकणे
आपण काय करावे अशी त्याची इच्छा आहे असे देवाला विचारण्यात ऐकणे हे आवश्यक आहे, ज्याविषयी आपल्यापैकी अनेक जण अडथळ्यांनी भरलेल्या जगात संघर्ष करीत असतो. यशया 30:21 मध्ये देव अभिवचन देतो, “हाच मार्ग आहे, ह्याने चला, अशी वाणी तुमच्या मागून कानी पडेल; मग तुम्हांला उजवीकडे जायचे असो किंवा डावीकडे जायचे असो.” परंतु ती वाणी ऐकण्यासाठी, आपण आपली अंत:करणे स्थिरचित्त केली पाहिजेत, आणि देवाने बोलण्यासाठी जागा केली पाहिजे.
मी एकदा स्वतःला अत्यंत भारावून गेलेले असे अनुभविले, सेवाकार्याची जबाबदारी आणि वैयक्तिक आव्हाहनांशी संघर्ष करीत होतो. माझ्या प्रार्थना ह्या देवासाठी निर्देशांनी भरलेल्या होत्या : “परमेश्वरा, असे घडून येऊ दे!” “परमेश्वरा, ही परिस्थिती बदलून टाक!” एके दिवशी, मी थांबावे आणि विचारावे असा मला माझ्या आत्म्यात भास झाला, “परमेश्वरा, मी काय करावे अशी तुझी इच्छा आहे?” प्रतिसाद हा सौम्यपणे आणि सामर्थ्याने आला : “हे मला समर्पित कर. माझ्या वेळेवर भरवसा ठेव.” त्या क्षणाच्या आज्ञाधारकपणाने मला स्पष्टता आणि शांती दिली जी मी काही आठवडे अनुभविली नव्हती.
पवित्र शास्त्रातील आज्ञाधारकपणाची उदाहरणे
बायबल हे लोकांच्या उदाहरणांनी भरलेले आहे ज्यांनी त्यांच्या योजना देवाला सांगण्यापेक्षा देवाच्या निर्देशाची मागणी केली किंवा त्याचे अनुसरण केले. मरीयेचे उदाहरण लक्षात घ्या, जी येशूची आई होती. जेव्हा देवदूताने तिला सांगितले की ती देवाच्या पुत्राला जन्म देणार आहे, तेव्हा तिचा प्रतिसाद असा नव्हता की, “पण माझ्या योजनांविषयी काय?” त्याऐवजी, तिने नम्रपणे म्हटले, “पाहा, मी प्रभूची दासी; आपण सांगितल्याप्रमाणे मला होवो” (लूक 1:38). देवाच्या इच्छेशी तिचे जीवन समरूप करण्याच्या तिच्या तयारीने इतिहासाला वळण दिले.
त्याच्या उलट, योनाने देवाच्या मार्गदर्शनास प्रतिकार केला, त्याच्या पाचारणाच्या उलट दिशेने धावला. योना जोपर्यंत शरण गेला नाही आणि आज्ञा पाळली नाही तोपर्यंत देवाची योजना उघड झाली नाही, हे सर्वकाही दोन्हीही म्हणजे त्याच्या जीवनात आणि निनवे येथील लोकांच्या जीवनात घडले नाही. (योना 3:1-3)
शरण जाण्याचे अंत:करण
“परमेश्वरा, मी काय करावे अशी तुझी इच्छा आहे?” असे विचारणे हे नेहमी इतके कठीण का आहे? त्याच्या मुख्य ठिकाणी, ह्या प्रश्नासाठी नम्रता आणि शरण जाण्याची आवश्यकता असते. ते स्वीकारते की आपल्या मार्गांपेक्षा देवाचे मार्ग हे महान आहेत (यशया 55:8-9). ते भरवशाचे कृत्य आहे. हा विश्वास ठेवणे की त्याची योजना ही केवळ उत्तम अशी नाही पण आपल्या अंतिम भल्यासाठी आहे. (रोम. 8:28)
एका महान व्यक्तीने एकदा लिहिले होते, “देवाबद्दल एक उल्लेखनीय गोष्ट ही जेव्हा तुम्ही देवाचे भय धरता, तेव्हा तुम्हाला इतर कोणत्याही गोष्टीची भीती वाटत नाही, याउलट जर तुम्ही देवाचे भय धरत नाही, तर तुम्ही सर्वकाही गोष्टींविषयी भीती बाळगता.” जेव्हा आपण देवाच्या इच्छेला शरण जातो, तेव्हा आपण त्याच्या शांतीत पाऊल ठेवतो, हा विश्वास ठेवून की त्याच्या योजना ह्या परिपूर्ण आहेत जरी त्या आपल्याला समजत नाहीत.
देवाच्या इच्छेशी समरूप होण्याची व्यवहारिक पाऊले
1.थांबा आणि प्रार्थना करा
“परमेश्वरा, मी काय करावे अशी तुझी इच्छा आहे?” असे विचारत प्रत्येक दिवसाची सुरुवात करा. ही साधी प्रार्थना तुमच्या हृदयाला त्याच्या निर्देशानासाठी उघडे करते.
2.पवित्र शास्त्रावर मनन करा
देव अनेकदा त्याच्या वचनातून बोलतो. पवित्र शास्त्रातील वचन वाचणे आणि त्यावर मनन करण्यात वेळ व्यतीत करा जे तुमच्या निर्णय करण्यास मार्गदर्शन करते. उदाहरणार्थ, नीतिसूत्रे 3:5-6 म्हणते, “तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नकोस; तू आपल्या सर्व मार्गांत त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल.”
3.ऐका आणि वाट पाहा
शांत राहणे हे शक्तिशाली आहे. शांततेचे क्षण तयार करा जेथे तुम्ही देवाच्या मार्गदर्शनाला ऐकू शकता. स्तोत्र. 46:10 आपल्याला स्मरण देते, “शांत व्हा, आणि लक्षात ठेवा की मीच देव आहे.”
आपल्या स्वतःला हे प्रश्न विचारा :
- मागे कोणती वेळ होती जेव्हा मी काय करावे असे देवाला विचारले होते?
- माझ्या जीवनात असे काही क्षेत्र आहेत का जेथे मी देवाच्या इच्छेला शरण जाण्यापेक्षा आपल्या स्वतःवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे?
- देवाची वाणी ऐकण्यासाठी मी माझ्या जीवनात अधिक जागा कशी निर्माण करू शकतो?
प्रार्थना
पित्या, मी तुझ्यासमोर नम्र अंत:करणाने येतो. बऱ्याचदा, मी तुझ्याकडे माझ्या योजनेनुसार चालण्यासाठी प्रार्थना केली आहे. आज, मी विचारत आहे, “मी काय करावे अशी तुझी इच्छा आहे?” तुझ्या मार्गांमध्ये माझे नेतृत्व कर, तुझ्या आत्म्याने मला मार्गदर्शन कर, आणि आज्ञा पाळण्यास मला धैर्य प्रदान कर. माझ्या योजना, माझ्या भीती आणि माझी नियती मी तुला समर्पित करीत आहे. तुझी इच्छा माझ्या जीवनात पूर्ण होऊ दे, जसे ती स्वर्गात पूर्ण होते. येशूच्या नावात. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● पावित्रीकरण स्पष्टपणे सांगितले आहे● चिकाटीची शक्ती
● अभिषेकाचा एक नंबरचा शत्रू
● एस्तेरचे रहस्य काय होते?
● दिवस ०५:४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
● सात-पदरी आशीर्वाद
● शब्दांचे सामर्थ्य
टिप्पण्या