english हिंदी తెలుగు മലയാളം தமிழ் ಕನ್ನಡ Contact us आमच्याशी संपर्क साधा स्पॉटिफाय वर ऐका स्पॉटिफाय वर ऐका Download on the App StoreIOS अँप डाउनलोड करा Get it on Google Play अँड्रॉइड अँप डाउनलोड करा
 
लॉग इन
ऑनलाइन देणगी
लॉग इन
  • होम
  • कार्यक्रम
  • थेट प्रसारण
  • टी.वी.
  • नोहाट्यूब
  • स्तुती
  • बातमी
  • डेली मन्ना
  • प्रार्थना
  • अंगीकार
  • स्वप्ने
  • ई पुस्तके
  • भाष्य
  • श्रद्धांजली
  • ओएसिस
  1. होम
  2. डेली मन्ना
  3. चेतावणीकडे लक्ष दया
डेली मन्ना

चेतावणीकडे लक्ष दया

Thursday, 17th of April 2025
19 16 257
Categories : आध्यात्मिक चालणे शिस्त
जेव्हा इस्राएलींनी आश्वासित देशात प्रवेश केला, त्यांना देवाने आज्ञा दिली होती की तो प्रदेश ताब्यात घ्यावा आणि त्या देशावर नियंत्रण करावे. तथापि, हे सोपे कार्य नव्हते कारण देशात अनेक मूर्तिपूजक वंश राहत होते ज्यांचा काहीही हेतू नव्हता की तो देश सोडावा.

१"जो देश वतन करून घेण्यासाठी तू जात आहेस तेथे तुझा देव परमेश्वर तुला नेईल आणि तुमच्यापेक्षा मोठी आणि समर्थ अशी पुष्कळ राष्ट्रे म्हणजे हित्ती, गिर्गाशी, अमोरी, कनानी, परिज्जी, हिव्वी आणि यबूसी ही सात राष्ट्रे तुमच्यासमोरून घालवून देईल; २आणि तुझा देव परमेश्वर त्यांना तुझ्या हवाली करील व तू त्यांचा पराभव करशील, तेव्हा त्यांचा समूळ नाश कर; त्यांच्याशी करारमदार करू नकोस व त्यांच्यावर दया करू नकोस." (अनुवाद ७:१-२)

सात मूर्तिपूजक राष्ट्रे ज्यांस इस्राएली लोकांना पराभूत करण्याचे कार्य दिले होते:
१. हित्ती
२. गिर्गाशी
३. अमोरी
४. कनानी
५. परिज्जी
६. हिव्वी
७. यबूसी

हे वंशज मूर्तीपूजा, अनैतिकता आणि क्रूर पद्धती, जसे मानव बळी देणारे म्हणून ओळखले जात होते. देवाने इस्राएली लोकांना चेतावणी दिली होती की जर त्यांनी या विरोधक राष्ट्रांना हाताळले नाही, तर ते त्यांच्या व्यवहार पद्धतींद्वारे भ्रष्ट होतील आणि शेवटी त्यांना स्वतःला त्या देशातून हाकलून दिले जाईल.

"पण तुम्ही त्या देशातल्या रहिवाशांना तुमच्यासमोरून घालवून न दिल्यास ज्यांना तुम्ही तेथे राहू द्याल ते तुमच्या डोळ्यांना कुसळासारखे आणि तुमच्या कुशीला काट्यांसारखे होतील, आणि तुम्ही वस्ती कराल त्या देशात तुम्हांला त्रास देतील." (गणना ३३:५५)

आज आपल्याला, आध्यात्मिक आणि भौतिक दोन्हीही दृष्टीने ही चेतावणी व्यवहारिकदृष्टया लागू आहे. व्यवहारिक लागुकरणाकडून, तुमचे आध्यात्मिक नेत्र खोटयापासून सत्याची पारख करण्यासाठी वापरले जातात आणि चुकीची शिकवण व विश्वास आपल्या जीवनात राहू देणे हे आपल्या आध्यात्मिक वाढीसाठी अडथळा होऊ शकते.

शास्तेच्या पुस्तकातील शेवटचे वचन म्हणते: "त्या काळी इस्राएलाला कोणी राजा नव्हता; ज्याला जसे बरे दिसे तसे तो करी." (शास्ते २१:२५) हे मूर्तिपूजक लोकांविषयी बोलत नाही जे इस्राएल राष्ट्राभोवती होते –हे देवाच्या लोकांविषयी बोलते! ते प्रामाणिकपणे योग्य ते करण्याचा प्रयत्न करीत होते परंतु ते पूर्णपणे ध्येय चुकले होते आणि त्यांना हे देखील हे कळत नव्हते  की ते काहीतरी चुकत आहेत. त्यांनी विचार केला की जे ते करीत आहे ते योग्य आहे!

"परमेश्वराचे विधी सरळ आहेत, ते हृदयाला आनंदित करतात; परमेश्वराची आज्ञा चोख आहे, ती नेत्रांना प्रकाश देते" (स्तोत्र १९:८). केवळ तुमच्या भौतिक नेत्रांवरच भरवसा ठेवू नका- ते कदाचित तुम्हांला भलतीकडे नेऊ शकतात. जे काही देवाच्या वचनाच्या विरोधात जाते असे काहीही काढून टाकण्यासाठी आपण दक्ष असले पाहिजे आणि त्याच्या सत्यावर केंद्रित असले पाहिजे.

शारीरिकदृष्टया, बाजूचा किंवा कमरेचा भाग हा पळणे किंवा चालण्यासाठी महत्वाचा आहे आणि या भागात कोणतीही दुखापत किंवा अशक्तपणा हा मोठया प्रमाणात अडथळा निर्माण करू शकतो. त्याचप्रमाणे, आपल्या जीवनात, अशक्तपणा किंवा दुर्बलतेचा कोणताही भाग आपण ओळखावे आणि त्यावर लक्ष दिले पाहिजे जे कदाचित आपल्या प्रगतीला अडथळा करू शकते. मग ते वाईट सवय, घृणास्पद संबंध किंवा आपल्या दैनंदिन कार्यात शिस्तीचा अभाव काहीही असो, असे अडथळे दूर करण्यासाठी आपण कार्य केले पाहिजे आणि आपल्या ध्येयावर केंद्रित असावे.

Bible Reading: 2 Samuel 14-15
प्रार्थना
मौल्यवान स्वर्गीय पित्या, मी आज तुझ्यासमोर पारख करण्याचे दान मागण्यासाठी येतो.

खोटयापासून सत्य पाहणे आणि समजण्यासाठी माझे नेत्र उघड म्हणजे मी शत्रूच्या योजनेद्वारे फसविला जाऊ नये.

अशक्तपणा किंवा दुर्बलतेचा कोणताही भाग ओळखण्यास मला साहाय्य कर जे कदाचित माझ्या प्रगतीला अडथळा करू शकेल. येशूच्या नावाने. आमेन!


Join our WhatsApp Channel


Most Read
● देवाच्या वचनात बदल करू नका
● दुष्टात्म्यांच्या प्रवेशाची ठिकाणे बंद करणे- २
● तो शब्द पाळ
● परमेश्वरा मध्ये स्वतःला कसे प्रोत्साहित करावे
● दानधर्म करण्याची कृपा-२
● पेंटेकॉस्ट चा उद्देश
● लहान तडजोडी
टिप्पण्या
संपर्क
फ़ोन: +91 8356956746
+91 9137395828
व्हाट्स एप: +91 8356956746
ईमेल: [email protected]
पता :
10/15, First Floor, Behind St. Roque Grotto, Kolivery Village, Kalina, Santacruz East, Mumbai, Maharashtra, 400098
आमच्या सामाजिक नेटवर्कवर सामील व्हा!
Download on the App Store
Get it on Google Play
मेलिंग यादीमध्ये सामील व्हा
अन्वेषण
कार्यक्रम
थेट प्रसारण
नोहाट्यूब
टी.वी.
देणगी
डेली मन्ना
स्तुती
अंगीकार
स्वप्ने
संपर्क
© 2025 Karuna Sadan, India.
➤
लॉग इन
कृपया या साईट वर टिपणी आणि कंमेंट करण्यासाठी आपल्या NOAH खात्यावर प्रवेश करा |
लॉग इन