कारण मृत सिंहापेक्षा जिवंतश्वान बरा. (उपदेशक ९:४)
मृत पदा पेक्षा जीवन हे उत्तम आहे.
तुझी वस्त्रे सदा शुभ्र [शुद्धता]असोत; तुझ्या डोक्याला तेलाची [आनंद]वाण नसो. (उपदेशक ९:८)
पवित्रता आणि अभिषेक हे एकमेकांशी जुळलेले आहे.
जे काही काम तुझ्या हाती पडेल ते आपले सगळे सामर्थ्य खर्च करून कर; कारण ज्या अधोलोकाकडे तूं जावयाचा आहेस तेथे काही उदयोग, युक्ती-प्रयुक्ति, बुद्धि व ज्ञान यांचे नांव नाही. (उपदेशक ९:१०)
जे काही तूं करशील, ते तुझ्या अंत:करणापासून कर, पदा विषयी विचार करू नको.
थिओडोर रसेल ने एकदा म्हटले, "जे तुझ्या कडे आहे, आणि तूं जेथेआहे त्यासहतूं काय करू शकतो ते कर."
एक लहानसे नगर होते, त्यात थोडेसे लोक होते, त्यावर एका मोठया राजाने चढाई करून त्यांस वेढा दिला व त्यांच्यासमोर मोठाले मोरचे लाविले. त्यांत एक गरीब पण बुद्धिमान मनुष्य होता; त्याने आपल्या बुद्धिबळाने त्या नगराचा बचाव केला; पण त्या गरीब मनुष्याचे स्मरणही कोणाला राहिले नाही. (उपदेशक ९:१४-१५)
ज्ञान समस्या सोडवू शकते काय? बायबल एका नगरा विषयी शिकवितेजे संकटात होते. शत्रू सेने ने त्यांना घेराव घातला होता, आणि तेथे कोणालाही काहीही आशा उरली नव्हती. तथापि, एक गरीब पण बुद्धिमान मनुष्या द्वारे त्या नगराला सुटका प्राप्त झाली. अशक्यपरिस्थितीला उपाय हा ज्ञाना द्वारे मिळाला.
तथापि, पवित्र शास्त्र धाडसीपणे सांगते की गरिबांचे कोणी ऐकत नाही.
हे सुद्धा सांगते की त्या मनुष्याची कोणी आठवण केली नाही.
परंतु एकटा पापी बहुत हिताची नासाडी करितो. (उपदेशक ९:१८)
एक सडलेले सफरचंद अनेक चांगल्या फळांना सडवू शकते.