ह्यास्तव पाहा, मी तुझ्या मार्गावर कांटेरी कुंपण घालीन; तिला वाट सापडणार नाही अशी आडभिंत तिच्यापुढे घालीन. (होशेय २:६)
इस्राएल ला पश्चाताप करावयास लावण्यासाठी, परमेश्वराने तिच्या वाटेवर कांटेरी कुंपण घालण्याचे आश्वासन दिले, म्हणजे जेव्हाजेव्हा इस्राएल योग्य मार्गावरून वळतील तेव्हा त्यांस दुखेल आणि म्हणून चुकीचे मार्ग मिळणे हे कठीण होईल.
तिला धान्य, द्राक्षारस व तेल पुरविणारा व जे सोने रूपे त्यांना बआलमूर्तींसाठीवेचिले त्याची रेलचेल करून देणारा तो मीच, हे तिला माहीत नाही. (होशेय २:८)
आपल्यापैंकी बरेच हे समजत नाहीत की जे काही आज आपल्याकडे आहे हे परमेश्वराच्याआशीर्वादाच्या कारणामुळे आहे. तोच आशीर्वाद देवाची उपासना करण्यास वापरण्याऐवजी, आपण ह्या जगाच्या दैवतांची उपासना करण्यास त्याचा उपयोग करतो.
यास्तव मी तिला मोह घालूनवनांत आणीन,
तिच्या मनाला धीर येईल असे बोलेन.
तेथून मी तिचे द्राक्षीचे मळे तिला देईन;
आशेचे द्वार व्हावे म्हणून मी तिला अखोर खिंड देईन;
ती आपल्या तारुण्याच्या दिवसातल्याप्रमाणे,
ती मिसर देशातून निघून आली त्या दिवसांतल्याप्रमाणे, माझे बोलणे त्या ठिकाणी ऐकेल.
मी तिला मोह घालूनवनांत आणीन.
लक्षात घ्या परमेश्वर त्याच्या लोकांना वनांत आणण्यासाठी मोहात टाकेन. वनाच्या शांततेमध्येच परमेश्वर त्याच्या लोकांना बोलेल. वन हे ठिकाण आहे जेथे तुम्ही केवळ एकटेच आहात; एक ठिकाण जेथे तुम्ही सर्व संस्कृतीपासून दूर आहात; मनुष्यांपासून दूर आहात. हे ते ठिकाण आहे जेथे परमेश्वराने तुम्हांला आणले आहे म्हणजे तो तुम्हाला समाधान बोलेल आणि तुम्ही ते ऐकाल.
तुमच्यापैंकी किती लोक वनातील अनुभवातून जात आहात?
जरतुम्ही, तर निश्चितच हा संदेश तुमच्यासाठी आहे.
अखोर चे खोरे हे आशेचे द्वार आहे.
अखोर चा अर्थ "संकट" , म्हणजेअखोरचे खोरे म्हणजे "संकटाचे खोरे" आहे. हे ते संकटाचे ठिकाण होते, जेथे आखानाचे पाप शोधले आणि त्याचा न्याय केला गेला (यहोशवा ७:२६). परमेश्वराची पुनर्स्थापना इतकी महान आहे कीतो"संकटाच्या खोऱ्याला" आशेचे द्वार असे परिवर्तीत करेल.
"परमेश्वर म्हणतो, त्या दिवशी असे होईल की मी ऐकेन, मी आकाशाचे ऐकेन, आणि आकाशपृथ्वीचे ऐकेल; पृथ्वी, धान्य, द्राक्षारस व तेल यांचे ऐकेल व ती इज्रेलाचे ऐकतील. मी तिला आपणांसाठी देशांत पेरीन; मी लो-रुहामेवर (दया न पावलेलीवर) दया करीन व लो-अम्मी (माझे लोक नव्हत) यांस तूं अम्मी(माझे लोक) आहेस असे म्हणेन व तूं माझा देव आहेस असे ते मला म्हणतील.(होशेय २:२१-२३)
ते इज्रेलीस उत्तर देतील
नाव इज्रेल म्हणजे "विखरलेले' आणि ते नकारात्मक अर्थाने सुद्धा वापरता येऊ शकते (जसे होशेय १:४-५). परंतु हा तो शब्द सुद्धा बी "पेरले" चांगले विखरलेगेले आहे याचे वर्णन करण्यासाठी वापरला होता. येथे परमेश्वर नाव इज्रेल च्या गौरवी उद्धाराचे आश्वासन देतो, जे अगोदर न्यायामध्ये विखरल्याचीएक सौम्य आठवण असे दिले गेले होते. आत ते आश्वासनाची भविष्यवाणी होते "मी तिला आपणांसाठी देशांत पेरीन". परमेश्वर त्याच्या लोकांना संपन्नता आणि आशीर्वाद साठी पुनर्स्थापित करेल. विखरणे हे पेरण्या मध्ये परिवर्तीत होईल.
मी तिच्यावर दया करीन जिच्यावर दया केली नव्हती
होशेय चे दुसरे मुल, एक मुलगी, तिचे नाव लो-रुहामा असे ठेवले होते, याचा अर्थ 'दया नाही' (होशेय १:६). तेनाव, मूळतः, न्यायाचे चिन्ह असे दिले गेले होते ते आता पुनर्स्थापनेचे चिन्ह असे परिवर्तीत झाले होते.
जे माझे लोक नाहीत त्यांस मी म्हणेन
होशेय चा तिसरा पुत्र, एकमुलगा, त्याचे नाव लो-अम्मी ठेवले, याचा अर्थ "माझे लोक नव्हत" (होशेय १:९).तेनाव, मूळतः, न्यायाचे चिन्ह असे दिले गेले होते ते आता पुनर्स्थापनेचे चिन्ह असे परिवर्तीत झाले होते.