तुम्ही आपणांसाठी धार्मिकतेची कापणी करा म्हणजे प्रेमाची कापणी कराल;
पडीत जमीन नांगरून काढा;
कारण परमेश्वराने येऊन तुम्हांवर धार्मिकतेची वृष्टि करावी याकरिता त्याला शरण जाण्याचा हा समय आहे.
तुम्ही दुष्टतेच्या पेरणीसाठी नांगरिले;
अधर्माची कापणी केली, तुम्ही लबाडीचे फळ खाल्ले;
कारण तूं आपल्या मार्गावर भिस्त ठेविली, आपल्या पराक्रमी वीरसमूहावर भाव ठेविला.
तुझ्या लोकांमध्ये कलह माजेल;
युद्धसमयी शल्मनाने बेथेआर्बेलास उध्वस्त केले तेव्हा आईला मुलांसह आपटून मारिले, तशी सर्व तटबंदीची नगरे नाश पावतील.
तुमच्या दुष्टतेच्या अघोरतेमुळे बेथेल येथे तुम्हांस असे होईल; प्रभातकाळी इस्राएलाचा राजा नाश पावेल. (होशेय १०:१२-१५)
वरील वचने जीवनातील दोन प्रकारच्या शेतकऱ्यांमध्ये विरोधाभास दाखविते. एकाने देवाच्या राज्यात पेरणी केली आणि दुसऱ्याने सैतानाच्या राज्यात पेरणी केली.
इस्राएली लोक दुष्टतेचे बी पेरीत होते, आणिदेवाच्या विरुद्ध त्यांच्या बंडखोरपणाचा परिणाम आपण स्पष्टपणे पाहू शकतो –नाश आणि उध्वस्त. शत्रू हा लोकांना देवाच्या मार्गातून बहकवून दुसऱ्या मार्गावर न्यावेआणि मग त्यांचा नाश करावायात कुशल आहे. एकदाकी आपण देवाच्या मार्गावरून भटकतो, आपण शत्रूला आक्रमण करू देण्यासाठी केवळ बसलेले बदक आहोत.
आपल्या जीवनात धार्मिकतेचे बी पेरणे हे भूतकाळाच्या जीवनातील नाश व उध्वस्तपणाला स्वस्थता आणेल. मग याची पर्वा नाही की आपण शत्रूच्या छावणीमध्ये किती आतपर्यंत गेलो आहोत-तेथे आपणांसाठी आशा आहे-आपण नेहमीच परमेश्वराकडे वळू शकतो.
जसे उधळ्या पुत्राच्या पित्याप्रमाणे, लूक १५:११-३२, परमेश्वर नेहमीच उघडया हाताने आपले स्वागत करण्यास वाट पाहत आहे. तेथेकदाचित आपल्या पापाचे परिणाम असतील, जे काढले जाऊ शकत नाही, परंतु परमेश्वर खात्रीने साहाय्य करेल की आपल्या जीवनासाठी त्याच्या योजनेमध्ये चालावे. (यिर्मया २९:११)
आपण धार्मिकतेचे बी कसे पेरावे?
येथे अनेक मार्ग आहेत की धार्मिकतेचे बी पेरावे
उदाहरण: प्रार्थना आणि उपास, देवाच्या कार्याला देणे, इतरांना वाटणे, चांगली कार्ये करणे, आपल्या शत्रूबरोबर प्रेमाने व्यवहार करणे, इतरांची उन्नति करण्यासाठी आपले शब्द वापरावे, आपल्या देशाच्या नियमात राहणे, आपले आध्यात्मिक दान वापरणे की ख्रिस्ताच्या शरीराला आशीर्वादित करावे वगैरे.
परमेश्वर आपल्याला आज्ञा देत आहे की आपल्या जीवनातील "पडीक जमिनीला नांगरावे". पडीक जमीन ही जेथे नांगरणी केलेली नाही आणि हे सवयीनुसार पाप किंवा कमकुवतपणाचे चिन्ह आहे, ज्याच्या आहारी आपण वारंवार जातो.
जर आपण पडीक जमिनीच्या नांगरणीविषयी विचार केला नाही, आपण देवा विरुद्ध कठीण होण्याच्या धोक्यामध्ये आहोत, पापाच्या मोहकतेमुळे आंधळे झाले आहोत. (इब्री ३:१३)
पडीक जमीन आपण कशी नांगरावी?
ते आपण आपल्या पापाचा पश्चाताप करून व देवाचा धावा करण्याद्वारे करूशकतो. (वचन १२)
जेव्हा परमेश्वराबरोबर सतत चालत राहतो आणि धार्मिकतेचे बीज पेरतो, तेव्हा परमेश्वराचा आशीर्वाद पाऊसाप्रमाणे येतो आणि आपण धार्मिकतेची विपुल कापणी कर.