तुझे डोळे इतके पवित्र आहेत की दुष्टता तुझ्याने पाहवत नाही, अनाचाराकडे दृष्टी लाववत नाही, तो तूं या बेईमानी करणाऱ्यांकडे का पाहत राहतोस? जों आपल्याहून धार्मिक त्यांस दुष्ट गिळून टाकितो तेव्हा तूं का उगा राहतोस? (हबक्कूक १:१३)
परमेश्वराचे डोळे इतके पवित्र आहेत की ते पापाकडे पाहत नाही. प्रभु येशू ख्रिस्त जेव्हा वधस्तंभावर होता, परमेश्वर पित्याने त्याचे मुख वधस्तंभावरील येशू कडून वळविले होते कारण संपूर्ण जगाचे पाप त्याच्यावर होते. येशू जो ह्यावेळी पाप असा झाला असल्याने देवाच्या संगतीत राहण्यास दावा करू शकला नाही. तोच तर आध्यात्मिक मृत्यूचा खरा अर्थ आहे-देवापासून वेगळे होणे.
तूं मानवास समुद्रातील माशांप्रमाणे का केले आहे,
कोणी शास्ता नसलेल्या जीवजंतूप्रमाणे त्यांना का केले आहे? तो त्या सर्वांस गळाने उचलितो,
त्यांस आपल्या जाळ्यांत धरितो,
आपला पाग टाकून त्यांस गोळा करितो;
त्यामुळे तो हर्षित व आनंदित होतो;
तो आपल्या जाळ्यापुढे यज्ञ करितो,
आपल्यापागाला धूप दाखवितो;
कारण त्यापासून त्याला विपुल धन व पुष्टीकारक अन्न मिळते. तर मग तो आपले भरलेले जाळे रिकामे करून राष्ट्रांची काहीएक गय न करिता त्यांचा सतत घात करीत राहील काय? (हबक्कूक १:१४-१७)
दुष्टजन हे मनुष्यांना जाळ्यात मासे धरल्याप्रमाणे पकडत आहेत.
जाळ्यास नष्ट करा, जाळे ज्याने तुमच्या प्रियजनांना पकडले आहे आणि त्यास मोकळे करा की शुभवर्तमान स्वीकारावे.
तो आपल्या जाळ्यापुढे यज्ञ करितो, आपल्यापागाला धूप दाखवितो; कारण त्यापासून त्याला विपुल धन व पुष्टीकारक अन्न मिळते.(हबक्कूक १:१६)
खोटया उपासनेचे हे उदाहरण आहे-वस्तूंची उपासना. मूर्तीपूजे चे हे एक आदर्श उदाहरण आहे.