अंजिराचे झाड न फुलले,
द्राक्षीच्या वेलीस फळ न आले,
जैतुनाचे उत्पन्न बुडाले,
शेतांतधान्य न पिकले,
मेंढवाड्यातील कळप नाहीतसे झाले,
व गोठ्यांत गुरेढोरे न उरली,
तरी मी परमेश्वराच्या ठायी हर्ष पावेन,
मला तारण देणाऱ्या देवाविषयी मी उल्लास करीन. (हबक्कूक ३:१७-१८)
परमेश्वरामध्ये आनंद करणे ही तुमची निवड आहे. इतर कोणीही ही निवड तुमच्यासाठी करू शकत नाही. मलाही पक्की खात्री आहे की हबक्कूक ने जेव्हा परमेश्वराची स्तुतिसुरु केली असेन तेव्हा त्याच्या अंत:करणात काही आनंदाच्या उकळ्या फुटल्या नसतील. परंतु ह्या निराशाजनक परिस्थितीत, त्याने परमेश्वरामध्ये आनंद करण्याचे निवडले आणि असे होवो कीदेव जो परमेश्वर याने त्याचे सामर्थ्य व्हावे.
प्रेषित पौल लिहितो:
प्रभु मध्ये आनंद करा, पुन्हा म्हणेन आनंद करा. (फिलीपै ४:४)
अविश्वसनीयविपत्तीला तोंड देत असताना सुद्धा हा मनुष्य इतका आशावादी का आहे? उत्तर हे पुढील वचनात आहे.
परमेश्वर, प्रभु, माझे सामर्थ्य आहे, तो माझे पाय हरणाच्या पायांसारखे करितो, तो मला माझ्या उच्च स्थानांवरून चालू देतो. (हबक्कूक ३:१९)
हबक्कूक प्रमाणे, तुम्हाला याची खात्री करावयाची आहे की, तुमचा आत्मविश्वास हा तुमच्या सभोवतालच्या परिस्थितीवर अवलंबून नाही राहिला पाहिजे. तुम्हाला तुमचा देव परमेश्वर यास तुमचा आत्मविश्वास असा केले पाहिजे.