तर मग देवाची प्रिय मुले ह्या नात्याने तुम्ही त्याचे [त्याची नकल करा व त्याच्या आदर्शां नुसार चला] अनुकरण करणारे व्हा. (इफिस ५:१)
जे सर्व काही तुम्ही करता त्यामध्ये देवाचे अनुकरण करणारे व्हा; तेव्हा मग तुम्ही तुमच्या पित्याचे प्रिय पुत्र व कन्या असे प्रतिनिधित्व कराल. (५:१ टीपीटी)
मुले सामान्यपणे त्यांच्या पित्याचे अनुकरण करतात. जर आपण देवाची खरी मुले आहोत तर मग आपण सुद्धा देवाचे अनुकरण करू. जसे मुले त्यांच्या पित्याला प्रसन्न करण्यास पाहतात, तसेच देवाच्या लेकरांनी त्यांच्या स्वर्गीय पित्याला प्रसन्न करण्याचे पाहिले पाहिजे.
आणि ख्रिस्ताने तुम्हांवर प्रीति केली, आणि देवाला सुवास मिळावा म्हणून स्वतःला आपल्याकरिता अर्पण व यज्ञ म्हणून दिले, त्याप्रमाणे तुम्हीही प्रीतीने चाला. (इफिस ५:२)
इफिसकरांस पत्रामध्ये सहा वेळा, पौलाने शब्द "चाला" हे वापरले आहे. चांगल्या कामात चाला (इफिस २:१०), जे पाचारण तुम्ही प्राप्त केले आहे त्याच्या आचरणास शोभेल असे चाला (इफिस ४:१), जसे परराष्ट्रीय चालतात तसे तुम्ही चालू नका (इफिस ४:१७), प्रीति मध्ये चाला (हेच वचन), प्रकाशाच्या लेकरांसारखे चाला (इफिस ५:८), सभोवार नजर ठेवून चाला (इफिस ५:१७).
वेळेचा सदुपयोग करा, कारण दिवस वाईट आहेत. (इफिस ५:१६)
कशाचा तरी उद्धार करणे याचा अर्थ ते पुन्हा विकत घेणे, त्याचा पुन्हा ताबा घेणे. वेळ ही देवाकडून बहुमोल दान आहे. निरुपयोगी गोष्टींच्या मागे आपला वेळ घालविण्यापेक्षा, ज्याचा काहीही कायमचा प्रभाव होत नाही, पवित्र शास्त्र आपल्याला उपदेश देते की आपण चांगल्या गोष्टी करण्याविषयी परिश्रम घ्यावे. (तीताला पत्र ३:८)
द्राक्षारसाने मस्त होऊ नका; द्राक्षारसात बेतालपणा आहे; पण आत्म्याने परिपूर्ण व्हा. (इफिस ५:१८)
आणि मद्याने नशेत येऊ नका; जे बंड आहे; त्याऐवजी, पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्हा. (५:१८ टीपीटी)
ज्याप्रमाणे दररोज नियमित अंतराने (वैद्यकीय विज्ञान म्हणते सरासरी पाण्याचे ७-८ ग्लास) पाणी पिणे हे महत्वाचे आहे, जेणेकरून जीवन व स्वास्थ्य सांभाळून ठेवावे, त्याप्रमाणे आपण देवाच्या पवित्र आत्म्याच्या उपस्थिती मध्ये सतत निवास केला पाहिजे.