देवाची जी कृपा तुमच्यासाठी मला प्राप्त झाली तिच्या व्यवस्थेविषयी तुम्ही ऐकले असेल. (इफिस ३:२)
रीवाईज स्टांडर्ड वर्जन (आरएसवी) मध्ये, शब्द "व्यवस्था" हे "देवाच्या सेवेचे कार्य" असे भाषांतरित केले आहे.
आज जे तुमच्याकडे आहे ते केवळ तुमच्यासाठी नाही परंतु इतरांबरोबर वाटण्यासाठी आहे. कृपा जी तुम्हांला देण्यात आली आहे म्हणजे ती तुम्ही इतरांसोबत वाटावी. क्षमा जी तुम्ही प्राप्त केली आहे म्हणजे ती तुम्ही ती इतरांसोबत वाटावी. देवाची कृपा व वरदाने ही आपल्याला इतरांना वाटण्यासाठी दिली आहेत.
देवाच्या सामर्थ्याच्या करणीने त्याचे जे कृपेचे दान मला देण्यात आले होते तेणेकरून मी त्या सुवार्तेचा सेवक झालो आहे. (इफिस ३:७)
अनेक वेळा सार्वत्रिक बातमीदार संघ देवाचे पुरुष व स्त्रियांना "स्वयं-घोषित" असे संबोधतात. म्हणून मग, प्रश्न उभा राहतो, की देवाच्या पुरुष व स्त्रियांना कोण नियुक्त करतो? हा तो परमेश्वर आहे जो परमेश्वराच्या पुरुष व स्त्रियांना त्याच्या सेवेमध्ये बोलावितो व त्यांना वरदाने व सामर्थ्याने भरतो.
आणि ज्याने सर्व काही निर्माण केले त्या देवाच्या ठायी युगादिकालापासून गुप्त राहिलेल्या रहस्याची व्यवस्था काय हे सर्वांना प्रकाशित करून दाखवावे. (इफिस ३:९)
पौलाचा उद्देश हा "की सर्व पुरुषांनी पाहावे की रहस्याची संगती काय आहे". त्याने हे त्याच्या प्रचार करणे व शिकवण्याच्या सेवाकार्या द्वारे पूर्ण करण्यास पाहिले.
२००० वर्षांपेक्षा अधिक वर्षे, प्रेषित पौलाच्या लिखाणाने लाखो लोकांना प्रेरित केले आहे; तो जेव्हा जिवंत होता व सेवा करीत होता त्यापेक्षा अधिक.
ह्या कारणास्तव स्वर्गातील व पृथ्वीवरील प्रत्येक वंशास नांव देण्यात येते. (इफिस ३:१५)
वचनात हीच वेळ आहे जेथे शब्द "वंश" उपयागत आणले आहे की संतांचे वर्णन करावे.
काही लोक त्यांची मंडळी किंवा पंथ हेच देवाचे खरे कुटुंब आहे असे मानतात. हे कारण प्राप्त करण्यासाठी, ते इतर ख्रिस्ती लोकांबरोबर भांडतात. हे त्याऐवजी मूर्खपणाचे व पूर्णपणे अपरिपक्व होय की देवाच्या कुटुंबाला एका विशेष ख्रिस्ती नांवा बरोबर जोडावे. शेकडो व हजारो वर्षांपूवी देवाच्या कुटुंबाचे अनेक सदस्य आपल्यापुढे गेले आहेत. त्यापैकी अनेकांना आपल्या ख्रिस्ती गटाच्या पंथांचे कदाचित ज्ञान सुद्धा नसेल, तरीही ते देवाच्या कुटुंबाचा निश्चितपणे हिस्सा आहे.
हे तुम्ही सर्व पवित्र जनांसह समजून घ्यावयास व बुद्धीस अगम्य अशी ख्रिस्ताची प्रीति ओळखून घ्यावयास शक्तिमान व्हावे; असे की तुम्ही देवाच्या सर्व पूर्णतेइतके परिपूर्ण व्हावे. (इफिस ३:१९)
ग्रीक शब्द ज्यास "ओळख" असे भाषांतरीत केले आहे याचा अर्थ देवाच्या प्रीतीचा अनुभव करणे जे केवळ मस्तकी ज्ञानापलीकडे आहे.