धन्यांनो, तुम्हासही स्वर्गात धनी आहे हे लक्षातबाळगून तुम्ही आपल्या दासांबरोबर न्यायाने व समतेने वागा. (कलस्सै ४:१)
१. तुमच्या स्टाफ ला योग्य वेतन दया.वेतन जे न्याय्य व योग्य आहे.
२. त्यांचे वेतन वेळेवर मिळेल याची खात्री करा.
येथे प्रेषित पौल येथे जे लोक आपल्या अधीन होऊन काम करीत आहेत आणि आपला स्वामी, प्रभू येशू ख्रिस्ता द्वारे आपणांस जशीवागणूक दिली जात आहे त्यामधील संबंधाला स्थापित करीत आहे.
जरी आपण नेहमी ह्या संबंधाला पाहण्यास चूक करतो, येथे जसे आपल्याला वागणूक दिली जाते आणि आपण जशी इतरांना वागणूक देतो यांच्यामध्ये निश्चितच संबंध आहे. हे आपल्याला अधिक दयाळू व्हावयास लावते.
प्रार्थनेत तत्पर असा व तिच्यात उपकारस्तुति करीत जागृत राहा. (कलस्सै ४:२)
१. सतत
तुम्ही कधी तुमच्या जीवनात त्या प्रसंगामधून गेला आहात काय जेव्हा ज्यासाठी तुम्ही प्रार्थना करीत होता ते सोडून दयावे कारण उत्तर मिळण्यास फार उशीर लागत होता?
मध्यस्थी करणारे असणे हे धन्यवाद न मिळण्याचे काम आहे असे वाटते. स्तुतिआराधना घेणारा लीडर किंवा प्रचारक शिवाय फार क्वचित की कोणी तुमच्याकडे लक्ष देतात. आणि तरीही, मध्यस्थी करणारे हे देवाच्या अंत:करणा जवळ आहेत. अशी वेळ येते जेव्हा मध्यस्थी करणारे त्या समयामधून जात असतात जेव्हा त्यांस मध्यस्थी करणे सोडून दयावे असा मोह होतो आणि चांगल्या कार्यासाठी पुढे जावे असे वाटते.
सैतानाचे एक सर्वात मोठे खोटेपण हेकी तुमची मध्यस्थी ही काही फळ निर्माण करीत नाही; ती प्रभाव करीत नाही. परंतु सत्य हे अगदी त्याउलट आहे.
पवित्र आत्मा तुम्हाला सांगतो, "सुरु ठेवा, आणि मध्यस्थी करणे सोडू नका. आत्म्याच्या स्तरात तुम्ही एक प्रभावकारी छाप पाडीत आहात." जर तुम्ही थांबलात, तर प्रकरण आणखी वाईट होईल, आणि हाताबाहेर जाऊ शकते.
२. प्रार्थनेत तत्पर राहा.
मध्यस्थी करणारा हा पवित्र शास्त्रात भिंतीवरीलपहारेकरी समान पाहिला जातो (यशया ६२:६ वाचा.). जर पहारेकरी झोपत आहे, तर तो पाहू किंवा ऐकू शकत नाही म्हणून तो ज्यांच्यासाठी पहारा देत आहे त्यांना इशारा देऊ शकत नाही.
एक जागृत मध्यस्थी करणारा हा देवासाठी महत्वाचा आहे.
३. एक जागृत मध्यस्थी करणारा
केवळ मध्यस्थी करण्याच्या वेळेला प्रार्थना करीत नाही परंतु दिवसाच्या सुरुवातीलाच व्यक्तिगत प्रार्थने द्वारे त्याने त्याचे आध्यात्मिक स्नायू अगोदरच बळकट केलेले आहेत. अशामध्यस्थी करणाऱ्याकडे सामर्थ्य आहे की प्रार्थनेच्या भविष्यात्मक परिमाण मध्ये प्रवेश करावा जेथे तो किंवा ती पाहू व ऐकू शकते की परमेश्वर काय बोलत आणि करीत आहे.
४. धन्यवाद
मध्यस्थी करणाऱ्या साठी धन्यवाद हे फार महत्वाचे आहे कारण ते केवळ परमेश्वराच्या अंत:करणाला स्पर्श करीत नाही परंतु ते मध्यस्थी करणाऱ्याच्या अंत:करणावरसुद्धा प्रभाव पाडते जो धन्यवाद देतो. धन्यवादमध्यस्थी करणाऱ्यास गर्वा पासून राखते आणि गौरव परमेश्वराला देते.
आणखी आम्हांसाठीही प्रार्थना करा, अशीकी, ख्रिस्ताच्या ज्या रहस्यामुळे मी बंधनातही आहे ते सांगावयास देवाने आम्हांसाठी वचनाकरिता दार उघडावे.(कलस्सै ४:३)
प्रेषित पौलाने एका मध्यस्थी करणाऱ्यास सांगितले की त्याच्यासाठी आणि त्याच्या संघासाठी प्रार्थना करावी.
प्रिय बंधु तुखिक, प्रभूमधील विश्वासू सेवक व माझ्या सोबतीचा दास, हा माझ्याविषयी सगळे काही तुम्हाला कळवील. (कलस्सै ४:७)
"दंतकथा आहे की आशिया मायनर मध्ये तुखिक हा चाल्सिदोन मध्ये बिशप झाला, आणि एक हुतात्मा असे मरण पावला." (विल्यम बार्कर द्वारे"बायबलमधील प्रत्येकजण", पान ३४६)
"त्याच्याबरोबर विश्वासू व प्रिय बंधु अनेसिम, जो तुमच्यातलाच आहे, त्यालाही पाठविले आहे; ते तेथील सर्व वर्तमान तुम्हांस कळवितील." (कलस्सै ४:९)
फिलेमोन च्या पुस्तकात उल्लेख केलेला परिवर्तीत होऊन पळून गेलेला गुलाम अनेसिम होता. तो प्रेषित पौलाचा एक विश्वासू व एक प्रिय ख्रिस्ती बंधु झाला. तो कलस्सै येथील होता आणि हे पत्र देण्यात व पौलाची माहिती देण्यात तुखिक बरोबर होता.
"अनेसिम" नावाचा अर्थ "लाभदायक, साहाय्यकारी (थायार्स ग्रीक-इंग्रजी शब्दकोश). पौल, फिलेमोन च्या पत्रात, ह्या शब्दाबद्दल अदलाबदल करिताना दिसत होता,जेव्हा त्याने म्हटले, "तो पूर्वी तुला निरुपयोगी होता, तरी आता तुला व मलाही उपयोगी आहे. (फिलेमोन ११ नवीन किंग्ज जेम्स भाषांतर)
पौल कलस्सै येथील लोकांना व्यक्तिगत कधीही भेटला नव्हता. तथापि, त्याने त्यांच्याबरोबर संदेशवाहक (तुखिक व अनेसिम)द्वारे एक संबंध स्थापित केला होता, ज्यांनी त्याच्याकडून सुवार्ता ऐकली होती जी त्यांनी कलस्सै येथील लोकांना सांगितली होती. हे एक महत्वाचे सत्य स्पष्ट करते की संबंधांमध्ये वार्तालाप ठेवणे हे महत्वाचे आहे.
हे पत्र तुमच्यात वाचून [पाहा]झाल्यावर लावदिकीयातील मंडळीतही [चर्च] वाचावयास मिळावे; व लावदिकीयाकडील [जे पत्र तुमच्याकडे येते]पत्र तुम्हीही [पाहा]वाचावे.(कलस्सै ४:१६)
पौलाचाकलस्सै येथील लोकांना उपदेश की लावदिकीयातील लोकांनी हे पत्र वाचावे आणि मग त्यांनी ते पत्र वाचावे जे पौलाने लावदिकीयातील मंडळीला लिहिले होते हे स्पष्ट करते की ह्या पत्रात जे सत्य आहे ते केवळ कलस्सै येथील लोकांसाठीच नाही. ह्या सत्याकडून कोणताही विश्वासू लाभ घेऊ शकतो. हे पत्र सर्व युगांतील सर्व ख्रिस्ती लोकांसाठी आहे.
काही बायबल विज्ञानी ह्या मताचे आहेत की पौलाने लावदिकीयातील मंडळीला लिहिलेले मूळ पत्र हे हरविले आहे.