म्हणून तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठविले गेला आहा, तर ख्रिस्त 'देवाच्या उजवीकडे जेथे बसला आहे, तेथल्या वरील गोष्टी मिळविण्याचा प्रयत्न करा. (कलस्सै ३:१)
येशूने त्याच्या शिष्यांना निराशेच्या विरोधातील एक उपाय म्हणून सुचना दिली की स्वर्गातील त्यांच्या पित्याच्या घरातील राजवाड्याविषयी विचार करा. (योहान १४: २)
वरील गोष्टींकडे मन लावा. पृथ्वीवरील गोष्टींकडे लावू नका. (कलस्सै ३:२)
व्यक्तीच्या मना द्वारे केलेली निवड किंवा निर्णय हेदर्शवितेजे त्याच्या/तिच्या भावने विरहित आहे.
दावीदाने त्याच्या प्रभूची स्तुति करण्याचा निश्चय केला ते इतक्या अंशी कीभयंकर विरोधाच्या मध्य सुद्धा, तो स्थिर राहिला (स्तोत्रसंहिता ५७:७). ते जे त्यांची अंत:करणे देवाच्या गोष्टींवर स्थिर करीत नाहीत ते जेव्हा संकटे येतात तेव्हा ते मोहाला बळी पडतील(२ इतिहास १२:१४).
तर पृथ्वीवरील तुमचे अवयव [ते जनावरासारखा स्वभाव व ते सर्व जे पृथ्वीवरील तुमच्यात आहे जे पापा मध्ये उपयोगात आणले जाते] म्हणजे जारकर्म, अमंगळपणा, कामवासना, कुवासनाव लोभ-ह्याला मूर्तीपूजा [परमेश्वरा ऐवजी स्वतःला व इतर सृष्ट वस्तूंना दे म्हणणे]म्हणावे-हे जिवे मारा (मृत करा किंवा सामर्थ्यहीन करा). (कलस्सै ३:५)
शब्द"जिवे मारा" म्हणजे'त्यास"मृत" करा, ज्याचा अर्थ स्व:नकार द्वारे शिस्तबद्ध [स्वतःचे शरीर व इच्छा] करणे होय.
१. शक्तिहीन करणे –त्या गोष्टींचे पोषण करू नका
त्या गोष्टी पाहणे टाळा व तसा प्रयत्न करा जो तुमच्या इच्छेला ह्या गोष्टींसाठी प्रेरित करेल.
२. मृत करा-जिवे मारा
ह्या बाबतीत उपास व प्रार्थना साहाय्य करतील.
पूर्णता करणारे बंधन अशी जी प्रीति ती ह्या सर्वांवर धारण करा. (कलस्सै ३:१४)
कलस्सै ३:१४ आपल्याला सांगते कीप्रीति ही पूर्णता करणारे बंधन आहे. गुड न्यूज बायबल अशा प्रकारे बोलते, "आणि ह्या सर्व गुणांसह प्रीति जोडा, जे ह्या सर्व गोष्टींना एक सिद्ध एकतेमध्ये बांधते." हीप्रीति आहे जी सर्व गोष्टींना एका सिद्ध एकतेमध्ये बांधते. चर्च साठी देवाची रचना ही प्रीति आहे, जेथे प्रत्येकजण शांतीच्या बंधनात आत्म्याच्या ऐक्यतेत परिपक्वतेमध्ये प्रीतीत चालतात.
ख्रिस्ताचे वचन तुम्हांमध्ये भरपूर राहो; परस्परांस सर्व ज्ञानाने शिकवण दया व बोध करा; आपल्या अंत:करणात देवाला स्तोत्रे, गीते व आध्यात्मिक गायने कृपेच्या प्रेरणेने गा. (कलस्सै ३:१६)
हेउपदेश पेक्षा अधिक आहे की वचन पाठ करावे. परमेश्वराचे वचन आपल्यामध्ये असले पाहिजे "सर्व ज्ञानाने भरपूर." हे तेव्हाच घडते जेव्हा पवित्र आत्मा निर्देशन देतो आणि देवाच्या वचनाची आपली समज व त्यास लागू करण्यास प्रेरणा देतो.