कारण तुम्हांसाठी, लावदिकीया येथील लोकांसाठी, व ज्या इतरांनी माझे तोंड प्रत्यक्ष पाहिले नाही त्या सर्वांसाठी मी केवढे परिश्रम घेत आहे, हे तुम्हांला माहीत व्हावे अशी माझी इच्छा आहे.(कलस्सै २:१)
सर्व भावना ह्या वाईट नाहीत. सकारात्मक भावना ज्या परमेश्वर देतो त्या व्यक्त करण्याची गरज आहे.
त्यामध्ये ज्ञानाचे व बुद्धिचे सर्व निधि गुप्त आहेत. (कलस्सै २:३)
"त्यामध्ये" हेयेथे ख्रिस्ताचा संदर्भ देत आहे.
जसे गुप्त निधि शोध लावण्याच्या स्थितीत आहे-स्वर्गाचे ज्ञान व बुद्धीच्या प्रकटीकरणाचीअमर्याद संपत्ति ही ख्रिस्ता मध्ये आहे. आपण त्या स्त्रोतामधून घेऊ शकतो जेव्हा आपण ख्रिस्ता मध्ये राहतो.
ख्रिस्ताप्रमाणे नसलेले, तर माणसांच्या संप्रदायाप्रमाणे, जगाच्या प्राथमिक शिक्षणाप्रमाणे असलेले तत्वज्ञान व पोकळ भूलथापा ह्यांच्या योगाने तुम्हाला कोणी ताब्यात घेऊन जाऊ नये म्हणून लक्ष दया.
तुम्हाला कोणी फसवू नये म्हणून लक्ष दया.(कलस्सै २:८)
शब्द"लक्ष" म्हणजे संरक्षण (च्या विरोधात)करा किंवा (ची) खबरदारी घ्या.
१.तत्वज्ञान व पोकळ भूलथापा द्वारे
शब्द"तत्वज्ञान" याचा शब्दशः अर्थ हा "ज्ञानाचे प्रेम". ही चांगली गोष्ट आहे की ज्ञाना वर प्रेम करावे. समस्या येते जेव्हा आपण ज्ञानाला चुकीच्या स्त्रोत वरून प्रेम करू लागतो.
देवापासून ज्ञान हे देवाचा अद्भुत स्वभाव ओळखते. (ईयोब २८:२०-२८)
पृथ्वीवरील ज्ञान हे नेहमी "पोकळ भूलथापा" असे आहे. "व्यर्थ", अर्थहीन, अनुपयोगी.
२.माणसांच्या संप्रदायाप्रमाणे (कलस्सै २:८)
३.जगाच्या प्राथमिक शिक्षणाप्रमाणे असलेले (कलस्सै २:८)
जगाकडे पाहत की जग आपल्याला काय देते. जे पाहू शकतो त्याद्वारेजगाच्या उत्पत्ति ला स्पष्ट करण्याचा प्रयत्न हे जसे काही टेलिफोन कडे पाहत अलेक्झांडर ग्राहम बेल ची आत्मकथा लिहिण्यासारखे आहे. समस्या काय आहे? टेलिफोन हे जेव्हा प्रथम बनविले गेले होते त्यापेक्षा आता वेगळे आहेत.
४. ख्रिस्ताप्रमाणे नसलेले (कलस्सै २:८)
कोठेही पाहणे जे ख्रिस्ता कडे पाहत नाही ते देवाने आपल्यासाठी काय ठेवले आहे त्यात फसवणूक करेल.