डेली मन्ना
24
18
154
परमेश्वराची महती वर्णा व तुमच्या विश्वासाला प्रेरणा दया
Monday, 30th of June 2025
Categories :
वेगवेगळ्या भाषांमध्ये बोलणे
कारण त्यांनी त्यांना अनेक भाषांतून बोलतांना व देवाची थोरवी गाताना ऐकले. (प्रेषित १०:४६)
आपण जेव्हा कशाची तरी थोरवी गातो आपण त्यास बढावा देत असतो. तरीही, आपल्या सर्वाना हे ठाऊक आहे की, परमेश्वर कधी बदलत नाही, परमेश्वर हा काही अधिक वाढणार नाही. परमेश्वरा विषयी हा आपला जो दृष्टीकोन आहे तो बदलतो, परमेश्वर तोच राहतो. तथापि, अन्य भाषे मध्ये बोलणे हे परमेश्वरा विषयी आपला दृष्टीकोन बदलते जे आपल्यासाठी चांगले आहे.
जेव्हा ह्या जीवनाची काळजी व संकटे त्यांच्यावर कोसळत असतात तेव्हा ते समस्यांना मोठे करू लागतात. परिस्थिती किती मोठी, किती वाईट, व किती निराशाजनक दिसत आहे याविषयी ते बोलू लागतात. परमेश्वराला मोठे करण्याऐवजी ते समस्यांना मोठे करू लागतात. आपण जेव्हा अन्य भाषे मध्ये बोलतो, तेव्हा परमेश्वराला त्याऐवजी थोर केले जाते.
१ तीमथ्यी ४:८ म्हणते, "शारीरिक कसरत थोडक्या बाबतीत उपयोगी आहे"
आपल्या शरीराला योग्यरीत्या व प्रभावीपणे कार्य करण्यासाठी व्यायामाची गरज लागते, आपल्या विश्वासाला सुद्धा दररोज कार्य करण्याची गरज आहे. व्यायामा द्वारे कोणी त्याचे किंवा तिचे शरीर बळकट करू शकतात. त्याप्रमाणेच, तुमच्या विश्वासाला कार्यरत करण्याने ते विकसित होते व वाढते.
प्रियजनहो, तुम्ही तर आपल्या परमपवित्र विश्वासावर स्वतःचीत रचना करा; पवित्र आत्म्याने प्रार्थना करा. (यहूदा १:२०)
आपण जेव्हा अन्य भाषे मध्ये प्रार्थना करतो, तेव्हा आपण आपल्या स्वतःला विश्वासाच्या उच्च स्तरावर वाढवीत असतो त्यामुळे आपल्या विश्वासाला प्रेरणा देतो व कार्यरत करीत असतो.
Bible Reading: Psalms 48-55
अंगीकार
मी पूर्णपणे आत्मविश्वासी आहे की परमेश्वर ज्याने मजमध्ये चांगले कार्य आरंभ केले आहे ते तो येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत पूर्ण करेल. जेव्हा मी अन्य भाषे मध्ये प्रार्थना करतो, मी त्या परमेश्वराची थोरवी गातो जो महान व स्तुतीस पात्र आहे.
Join our WhatsApp Channel

Most Read
● परमेश्वर वेगळ्या प्रकारे पाहतो● बुद्धिमान व्हा
● पतनापासून ते मुक्तीपर्यंतचा प्रवास
● देवाचे मुख होणे
● लोक बहाणे करण्यासाठी कारणे देतात -भाग 2
● धन्यवाद आणि स्तुतिचा दिवस (दिवस १९)
● भविष्यात्मक गीत
टिप्पण्या