परमेश्वर म्हणाला, मी जे करणार आहे ते अब्राहामापासून लपवून ठेवू काय? कारण त्याचे मोठे व समर्थ राष्ट्र खात्रीने होणार, आणि त्याच्याद्वारे पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे आशीर्वादित होणार. मी त्याची निवड केली आहे ती अशासाठी की त्याने आपल्या लेकरांस व आपल्या पश्चात आपल्या घराण्यास आज्ञा दयावी आणि त्यांनी न्यायनीतीने वागण्यासाठी परमेश्वराचा मार्ग आचरावा आणि हे अशासाठी की परमेश्वर अब्राहामाविषयी जे बोलला ते त्याने त्यास प्राप्त करून दयावे. (उत्पत्ति १८:१७-१९)
मला सांगण्यात आले की जोनाथन एडवर्डस चा उत्कृष्ट संदेश, "क्रोधी परमेश्वराच्या हातात पापी", इतका पटवून देणारा होता की जे लोक त्या संदेशा दरम्यान बसलेले असत ते ओरडत असत व पश्चातापी होऊन जमिनीवर पडत असत.
काही रडत हे म्हणत की नरकाचा अग्नि त्यांच्या पायांना भाजवत आहे असे वाटत आहे. आणि तरीही, जोनाथन एडवर्ड त्याच्या खाजगी जीवनात, हा अति प्रेमळ, दयाळू माणूस होता, ज्यास त्याच्या कुटुंबाबरोबर चांगला वेळ घालविण्यात आनंद वाटत असे. एडवर्ड यांना अकरा मुलेबाळे होती आणि दररोज त्याच्या मुलाबाळांवर आशीर्वाद बोलणे त्यास आवडत होते.
एक अभ्यास केला गेला की जोनाथन एडवर्ड च्या वंशाचा शोध घ्यावा आणि असे दिसून आले की अनेक जण हे लेखक, प्राध्यापक, वकील, शुभवर्तमान प्रसारक आणि काही तर अमेरिका सरकार मध्ये उच्च पदावर सुद्धा होते.
इब्री ७:८-१० हे आपल्याला एक महत्वाचा सिद्धांत सांगते की, पित्या द्वारे त्याची मुलेबाळे तरुण होण्याच्या फार पूर्वी केलेले कार्य हे त्या लेकरांवर जसे कार्य केले गेले होते त्यानुसार सकारात्मक किंवा नकारात्मकपणे प्रभाव करू शकते.
प्रेषित पौलाने अब्राहाम व मलकीसदेक, जो यरुशलेम मध्ये पहिला राजा व याजक होता त्याच्या विषयी लिहिले. प्रेषित पौल उल्लेख करतो की लेवीय हे अब्राहामाच्या ओटीपोट मध्ये दशांश देत होते जेव्हा लेवी चा अजून जन्म झालेला नव्हता हे काहीतरी विशेष आहे ज्याविषयी विचार केला पाहिजे.
मी प्रत्येक आई-वडिलांना आवाहन करीत आहे, तुम्ही झोपायला जाण्याअगोदर, तुमच्या लेकरांवर हात ठेवा आणि त्यांच्यावर आशीर्वाद बोला (याची पर्वा करू नका की ते एक किंवा पन्नास वर्षाचे आहेत). गरोदर स्त्रियांनो, तुम्ही तुमचे हात तुमच्या पोटावर ठेवा आणि तुमच्या लेकरांवर दिवसातून किती वेळा तुम्ही बोलू शकता तितक्या वेळा आशीर्वाद बोला. ते सुद्धा जे लेकरे होण्याची इच्छा करीत आहेत, त्यांनी त्यांच्या पोटावर हात ठेवावे आणि म्हणावे, "माझे लेकरू हे माझ्यासाठी व जे माझ्याभोवती आहेत त्यांच्यासाठी आशीर्वाद होईल." मी भविष्यवाणी करतो की तुमची मुलेबाळे महान होतील व उच्च पदावर जातील की जेथे याअगोदर तुमच्या कुटुंबाचा कोणताही सदस्य अजूनपर्यंत पोहचला नाही.
Bible Reading: Psalms 97-104
अंगीकार
परमेश्वराचा आशीर्वाद मजवर व माझ्या कुटुंबावर आहे म्हणून माझ्या हाताचे कार्य हे आशीर्वादित आहे व ते देवाला गौरव व आदर आणते. आमेन.
Join our WhatsApp Channel

Most Read
● दिवस ३७:४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना● ख्रिस्ती लोक देवदूतांना आज्ञा देऊ शकतात का?
● ते लहान तारणारे आहेत
● पृथ्वीचे मीठ
● भूतकाळाच्या कबरेत पडून राहू नका
● देवाचे 7 आत्मे: देवाच्या भयाचा आत्मा
● जीवनाचे मोठे खडक ओळखणे आणि प्राथमिकता देणे
टिप्पण्या