तुम्हीकधी प्रार्थना करण्यासाठी बसलाआहात काय, आणि तुम्ही तसा विचार करण्याअगोदर तुमचे मन हे संपूर्ण शहरभर फेऱ्या मारीत आहे. प्रार्थने दरम्यान अडथळे आणि व्यत्यय हे सामान्य संघर्ष आहेत ज्यास सर्व तोंड देतात. ह्या संघर्षात तुम्ही एकटे नाहीत. तथापि, सुवार्ता ही आहे की, तुम्ही त्यावर मात करू शकता.
बायबल म्हणते, "तो पलिष्टी चाळीस दिवस-पर्यंत नित्य सकाळी व संध्याकाळी जवळ येऊन उभा राहत असे." (१ शमुवेल १७: १६)
तुम्हांला ठाऊक आहे काय गल्याथ येत असे आणि इस्राएली लोकांना अडथळा करण्याचा प्रयत्नकरीत होता ज्यावेळी सकाळ व संध्याकाळचे अर्पण हे दिले जाते होते? सरळ शब्दात म्हटले तर, हा अडथळा प्रार्थनेच्या वेळे दरम्यान होता.
प्रार्थनेच्या दरम्यान स्वतःला शांत ठेवण्यात जर तुम्हाला संघर्ष होत असेल तर,मला तुम्हाला ह्या दोन गोष्टी सांगू दया जे तुम्हाला प्रार्थने मध्ये लक्ष केंद्रित करण्यास साहाय्य करेल.
१. सौम्यवाद्यसंगीत लावा
संगीता मध्ये आपले हृदय आणि मनाला इतरकोणत्याही प्रकारच्या संचारण पेक्षा अद्भुतरित्या स्पर्श करण्याचे सामर्थ्य आहे. संगीत भाषेच्या सर्व अडथळ्यांना पार करते. मी नेहमी सौम्य संगीत चालू ठेवतो जेव्हा मी प्रार्थना करीत असतो.
हे मला प्रार्थने मध्ये अधिक लक्ष देण्यास साहाय्य करते जेव्हाहे सौम्य वाद्यसंगीत गाढपणे माझ्या आत्म्याशी बोलते आणि अडथळ्यांना बुडवून टाकते. मी मग उपासनेमध्ये नेहमी जात असतो. असा प्रयत्न करा! तुम्हीपाहालकी वेळ हा लवकर निघून जातो.
२. आळीपाळीने बायबल वाचन आणि प्रार्थना
अशी वेळ असते जेव्हा माझे मन हे 200 किमी प्रती तासाच्या वेगाने धावत असते कारण त्यावेळेस बरेच काही करायचे असते. अशा वेळी, मीउपासनेचे सौम्य वाद्यसंगीत लावतो आणि देवाचे वचन वाचू लागतो. जेव्हा मी असे करतो, माझे मन इतरत्र भटकणे थांबते आणि त्याच्या वाणी मध्ये लयबद्ध होते.
एका क्षणी, पवित्र शास्त्र माझ्या मनाशी बोलू लागते. त्या क्षणी, मग मी त्या वचनासाठी प्रार्थना करू लागतो जोपर्यंत माझ्या मनावरचे दडपण दूर होत नाही. मी मग पुन्हा वचन वाचू लागतो. वचन आणि प्रार्थना असे आळीपाळीने करणे माझ्या मनाला इतरत्र भटकण्यापासून वाचविते आणि मग त्याच्या उपस्थितीत चांगला वेळ जातो.
नेहमी लक्षात ठेवा, परमेश्वर, प्रत्येक प्रयत्नांची प्रशंसाकरतो की तुम्ही त्याच्या उपस्थितीत वेळ घालविण्यासाठी करता.
ह्यामुळेच तर त्याने त्याचा पवित्र आत्म्याचे आपल्याला आश्वासन दिले आहे की आपल्याला आपल्या अशक्तपणात साहाय्य करावे. (रोम ८: २६)
Bible Reading: Jeremiah 10-12
प्रार्थना
हे परमेश्वरा, मी तुझा धावा करितो; माझ्याकडे सत्वर ये; मी तुझा धावा करितो तेव्हा माझ्या वाणीकडे कान दे. माझी प्रार्थना, तुझ्यासमोर धूपाप्रमाणे माझे हात उभारणे संध्याकाळच्या अर्पणाप्रमाणे, सादर होवो. (स्तोत्रसंहिता १४१: १-२)
Join our WhatsApp Channel

Most Read
● तुमच्या घरातील वातावरण बदलणे-३● ते व्यवस्थित करा
● कृपे द्वारे तारण पावलो
● पैसे कशा साठी नाही
● दोनदा मरू नका
● तुम्ही सहज दुखविले जाता काय?
● वनातील मानसिकतेवर प्रभुत्व करणे
टिप्पण्या