योहान, सात चर्च ला जे आशिया मध्ये आहेत: आशियातील सात मंडळ्यांस योहानाकडून जो आहे, जो होता व जो येणार त्याच्यापासून त्याच्या राजसानासमोर जे सात आत्मे आहेत त्यांच्यापासून. (प्रकटीकरण १: ४)
एक विशेष वाक्यरचने कडे पाहा........"सात आत्मे जे त्याच्या राजसानासमोर आहेत"
येथे केवळ एक आत्मा आहे-पवित्र आत्मा.
पवित्र शास्त्राच्या चिन्हात्मक दृष्टीकोनात सात हा आंकडा नेहमीच सिद्धता आणि पूर्णतेसाठी स्थिर आहे.
आकडा'सात' हा ख्रिस्ती लोकांसाठी पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याची परिपूर्णता आणि त्याचे विभिन्न कार्ये किंवा सेवाकार्ये याचा संदर्भ देते.
बायबल म्हणते, "योसेफ कडे एक अनेक रंगांचा झगा होता", जो त्याच्या पित्याने त्यास दिला होता (उत्पत्ति ३७: ३). बायबल चे विज्ञानी सहमत आहेत की हा झगा हा पवित्र आत्म्याच्या आच्छादनाचेप्रतीक असे आहे. योसेफ हा जुन्या करारात ख्रिस्ताच्या प्रकारा सारखा आहे. आता प्रभु येशू आहे जो अनेक रंगांचा झगा घालून आहे, त्याच्या स्वर्गातील पित्याने पवित्र आत्म्याच्या आच्छादनाचे प्रतीक असे ते त्यास दिले आहे.
आता संदेष्टा यशया भविष्यात्मक दृष्टीने यशया ११: २ मध्ये ख्रिस्ता विषयी बोलत आहे, जे स्पष्टपणे पवित्र आत्म्याच्या साते विभिन्न कार्याविषयी बोलत आहे.
परमेश्वराचा आत्मा, सुज्ञानाचा व समंजसपणाचा आत्मा, सुसंकल्पाचा व सामर्थ्याचा आत्मा, परमेश्वराच्या ज्ञानाचा व भयाचा आत्मा त्याजवर राहील. (यशया ११: २)
१.देवाचा आत्मा
२. सुज्ञानाचा आत्मा
३.समंजसपणाचा आत्मा
४.सुसंकल्पाचा आत्मा
५.सामर्थ्याचा आत्मा
६.ज्ञानाचा आत्मा
७.भयाचा आत्मा
देवाचे सात आत्मे हे पवित्र आत्म्याचे 'गुणविशेष' आहेत. पवित्र आत्म्याने भरण्यास सुद्धा याचा संदर्भ दिला जातो. पवित्र आत्म्याने भरणे हे प्रभु येशूवर राहिला. जसे प्रीजम सात विभिन्न रंग प्रदर्शित करतो जो प्रकाश बनवितो, तशा प्रकारेच आपल्या प्रभु येशूने ह्या आत्म्याचे विभिन्न तरीही संयुक्त कार्य प्रदर्शित केले आहे.
ह्या देशात जेथेकोठे आणि जगाच्या काही भागात मी जातो, मी पाहतो तोच पवित्र आत्मा वेगवेगळ्या प्रकारे विभिन्न व्यक्तींना प्रचार करतो. काहींसाठी तो मोठया सामर्थ्याने कार्य करतो-ते स्वस्थ होतात, सुटका प्राप्त करतात वगैरे. काहींना तो ज्ञान, काहींना समज देतो. जर तुम्हाला "देवाच्या सात आत्म्यांनी भरावयास" पाहिजे, तुम्हांला केवळ हेच करावयाचे आहे की मागावे. (लूक ११: १३ वाचा)
Bible Reading: Jeremiah 19-22
अंगीकार
येशूच्या नांवात, देवाचा आत्मा माझ्यावर राहत आहे,सुज्ञानाचा व समंजसपणाचा आत्मा, सुसंकल्पाचा व सामर्थ्याचा आत्मा, परमेश्वराच्या ज्ञानाचा व भयाचा आत्मा माझ्यामध्ये आहे. माझा हर्ष हा देवाच्या भयात आहे आणि मी केवळ जे पाहत आहे त्याद्वारे न्याय करणार नाही आणि ना ही जे माझ्या कानांनी ऐकले आहे त्यावर निर्णय घेईन. (यशया ११: २-३)
Join our WhatsApp Channel

Most Read
● त्याच्या ध्वनिलहरींच्या कंपनासह लयबद्ध होणे● त्या विश्वासांना मर्यादित करणे जे तुम्हाला अडखळण करते
● परमेश्वराचा आनंद
● मध्यस्थीचे महत्वाचे घटक
● भविष्यात्मक मध्यस्थी
● आध्यात्मिक आहार जो तुमचे भवितव्य ठरवतो
● उपासनेच्या दोन मुख्य गोष्टी
टिप्पण्या