डेली मन्ना
19
15
148
प्रीति-जिंकण्याची योजना -१
Saturday, 30th of August 2025
Categories :
देवाच्या सान्निध्य
प्रेम.
बायबल म्हणते कीप्रीति कधी अपयशी होत नाही (१ करिंथ १३:८). प्रीति जी ह्या वचनात उल्लेखिली आहे ती दैवी प्रीति, खरीप्रीति चा संदर्भ देते. प्रेषित पौल येथे सांगत आहे की खरी प्रीति, प्रीति जी देवापासून येते ती कधीही अपयशी ठरत नाही.
केवळ त्याच्याविषयी विचार करा, पैसा खरा आनंद आणू शकत नाही, प्रसिद्धी स्वतःची योग्यता कधीही आणत नाही आणि बदला कधीही खरे समाधान आणत नाही. तर मग जिंकण्याची योजना काय आहे?
मदर तेरेसा ने संयुक्त राष्ट्राच्या सर्व नेत्यांना मार्गदर्शन केले. तेथे तिला विचारण्यात आले, "आपल्याला जगभर शांति कशी प्राप्त करता येईल?" तिने प्रत्युत्तर दिले, "घरी जा आणि तुमच्या कुटुंबाला प्रेम करा" हे अगदी सहज वाटते. परंतु त्याच्याबद्दल विचार करा, जर आपण सर्वांनी ते केले असते तर स्वर्ग जो गमाविला होता तो स्वर्ग पुन्हा मिळविला असा होईल.
आजच्या समयामध्ये अनेक संस्था ह्या सत्ता ही सामर्थ्य आणि द्वेषाद्वारे प्राप्त करीत आहेत. परंतु प्रभु येशू ख्रिस्ताने त्याचे राज्य प्रीतीच्या खडकावर स्थापिले आहे. आजच्या दिवसापर्यंत लाखो लोक हे त्याच्यासाठी मरण्यास तयार आहेत.
त्या लोकांना प्रेम करणे ज्यांस देवाने तुमच्या जीवनात जवळ ठेवले आहेत हे इतके सोपे कार्य नाही. कारण मी असे बोलत आहे हे ह्या कारणासाठी की त्यांना प्रेम करावे यासाठी तुमच्या स्वतःला असुरक्षित असे करणे आहे. अनेक जण स्वतःला असुरक्षित करणे हे कमकुवतपणाचे चिन्ह असे पाहतात. तुमचा असुरक्षितपणा पाहून अनेक हे तुम्हाला सहज असे समजू शकतात.
मग ते तुमचे जोडीदार, तुमचे आई-वडील, तुमची लेकरे, किंवा लोक ज्यांचे नेतृत्व तुम्ही करीत आहात कोणीही असों, तुम्ही स्वतःला त्यांना पूर्णपणे देऊन टाकावे. हा धोका आहे जो अनेकजण हे घेण्यास तयारनाहीत आणि ह्यामुळेच लोकांना प्रेम करणे हे इतके सोपे नाही आणि तरीही जिंकण्यासाठी नेहमीच ही योजना आहे- एक योजना जी जीवनाच्या सर्व परिस्थिती मध्ये टिकून राहिली आहे.
याची पर्वा नाही जर तुम्ही चांगले दिसत नसाल, याची पर्वा नाही की जगाच्या कोणत्या भागात तुम्ही आहात, जर तुम्ही प्रामाणिकपणे तुमच्या भोवतालच्या लोकांना प्रेम कराल तेव्हा ते तुम्हांला त्यामार्गाने प्रत्युत्तर देतील जे तुम्हांला आश्चर्यात टाकेल. हिंस्त्र प्राणीप्रेमाला प्रत्युत्तर देतो आणि आपण मानव त्यापेक्षा काही वेगळे नाही. ह्यामुळेचप्रीति ही जिंकण्याची योजना आहे.
प्रभु येशूने म्हटले, "तुमची एकमेकांवर प्रीति असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की, तुम्ही माझे शिष्य आहा." (योहान १३:३५)
Bible Reading: Lamentations 2-4
प्रार्थना
पित्या, येशूच्या नांवात, तुझा आत्मा माझ्यावर ओत. पवित्र आत्म्या ये, माझ्या जीवनाच्या प्रत्येक भागाला स्पर्श कर. आमेन
Join our WhatsApp Channel

Most Read
● तीन महत्वाच्या परीक्षा● आज्ञाधारकपणा हा आध्यात्मिक गुण आहे
● देवाला प्रथम स्थान देणे # 1
● याबेस ची प्रार्थना
● आपल्या निवडींचा प्रभाव
● विश्वासाचे जीवन
● देवाच्या सान्निध्यासह ओळखीत होणे
टिप्पण्या