डेली मन्ना
15
13
98
आत्म्याची फळे कशी विकसित करावी-2
Monday, 15th of September 2025
Categories :
आत्म्याचे फळ
आपणतारे आणि दिव्यासहनाताळाचे झाड नाही! खरे आणि जुळून राहणारे फळ आणण्यासाठीआपणांस बोलाविले गेले आहे. मुळाची काळजी घेतल्या शिवाय हे शक्य नाही.
आपली हृदये ही अदृश्य मुळे आहेत जे दृश्य फळे निर्माण करतात. गोष्टी ज्या आपणांस फळे निर्माण करण्यापासून अडथळे करतात त्या हृदयात उगम पावतात. त्यामुळेच आपणांस ताकीद दिली जात आहे की आपल्या हृदयाकडे सतत लक्ष दयावे.
"सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यात जीवनाचा उगम आहे." (नीतिसूत्रे 4:23). मी हे अनेक वेळेला म्हटले आहे, जेव्हा बायबल हृदया बद्दल बोलते, तेव्हा ते शारीरिक मानवी हृदयाबद्दल बोलत नाही तरमनुष्याच्या आत्म्या बद्दल बोलते.
कारण जीवनातील प्रत्येक अपयशासाठी, येथेएक मूळ कारण आहे. स्वास्थ्य आणि पुनर्स्थापना येणार नाही जोपर्यंत 'मुळाजवळ तरवार ठेवण्यात येणार नाही!" प्रक्रिया ही संथ आणि वेदनामय असू शकते परंतु अशाच प्रकारे आपण जीवनातील प्रत्येक भागात फळे निर्माण करू शकतो-खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रात.
फारच थोडे असा आशीर्वाद रातोरात प्राप्त करतात. आपल्या डोळ्यावरील पडदे एक एक करून पडतात आणि मग आपण खरे चित्र पाहू लागतो.
पुढील गोष्ट फारच लक्षपूर्वक वाचा:
जो पुरुष दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही; पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही; आणि निंदकांच्या बैठकीत बसत नाही, 2 तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रात्रंदिवस रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करितो, तो धन्य. 3 जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लाविलेले असते, जे आपल्या हंगामी फळ देते, ज्यांचीपाने कोमेजत नाहीत, अशा झाडासारखा तो आहे; आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस जाते. (स्तोत्रसंहिता 1:1-3)
लक्षात घ्या की आशीर्वादित मनुष्य ज्या गोष्टी करीत नाही,आणि ज्या गोष्टी तो करतो आणि त्याचे परिणाम.
1. गोष्ठी ज्या आशीर्वादित मनुष्य करीत नाही
...दुर्जनांच्या (दुष्ट लोक) मसलतीने (त्यांच्या उपदेशानुसार)चालत नाही.
... पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही.
.... निंदकांच्या (कपटकारस्थान करणारे)बैठकीत बसत (त्यांच्याबरोबरसंगती करीत नाही) नाही.
2. गोष्टी ज्या आशीर्वादित मनुष्य करतो
.... परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो.
.... त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन (चिंतन, विचार)करितो.
3. परिणाम
... झाड(स्थिरता)जे पाण्याच्या प्रवाहाजवळ (जिवंत झरा)लाविलेले असते.
.... जे आपल्या हंगामी (न चुकता)फळ देते (निर्माण करते).
.... ज्याची पाने कोमेजत नाहीत.
...जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस (यशस्वी होतो)जाते- यश हा पर्याय नाही किंवा अनिश्चितता परंतु एक शाश्वतता जेव्हा दैवी सिद्धांत हे पाळले जातात.
अशा प्रकारे तुम्ही देवाच्या गौरवाकरिता फळे निर्माण करतात.
Bible Reading: Ezekiel 38-39
अंगीकार
1. देवाच्या वचनावर दररोज मनन करण्याद्वारे मी माझ्या जीवनाच्या प्रत्येक भागामध्ये फलदायक व संपन्न असा आहे.
2 . मी आशीर्वादित आहे कारण पवित्र आत्मा मला सामर्थ्यशाली करत आहेकी देवाचे वचन कृतीत आणावे. देवाचे वचन माझ्या आत्म्यात माझ्या शरीराच्या प्रत्येक भागाला येशूच्या नांवात जीवन देत आहे.
2 . मी आशीर्वादित आहे कारण पवित्र आत्मा मला सामर्थ्यशाली करत आहेकी देवाचे वचन कृतीत आणावे. देवाचे वचन माझ्या आत्म्यात माझ्या शरीराच्या प्रत्येक भागाला येशूच्या नांवात जीवन देत आहे.
Join our WhatsApp Channel

Most Read
● राजवाड्याच्या मागील माणूस● सर्वशक्तिमान परमेश्वराबरोबर भेट
● तुम्ही प्रार्थना करा, तो ऐकतो
● कालेबचा आत्मा
● दुर्मिळ गोष्ट जी आज मिळते
● आमचे नको
● वचनाची सात्विकता
टिप्पण्या