मुलाच्या स्थितीस अनुरूप असे शिक्षण त्याला दे, म्हणजे वृद्धपणीही तो त्यापासून परावृत्त होणार नाही. (नीतिसूत्रे 22:6)
'तरुणच असे त्यांना नियंत्रणात ठेवावेआणि त्यांना वाढत असे पाहावे हे एक चाकोरीबद्ध विधानआहे जे बायबल मधून घेतले आहे. लेकरांना प्रभूच्या गोष्टींमध्ये प्रशिक्षण देणे हे अत्यंत महत्वाचे आहे कारण ते नंतर त्यांना जीवनात एक आधार असे देईल. मुले ही कुंभाराच्या हाती एक नरम माती प्रमाणे आहेत आणि जो काही आकार तुम्ही त्यांना दयाल; ते तो विशेष असा आकार घेतील.
"हे इस्राएलाच्या घराण्या, या कुंभाराप्रमाणे मला तुमचे पाहिजे ते करिता येत नाही काय, असे परमेश्वर म्हणतो. हे इस्राएलाच्या घराण्या, पाहा, कुंभाराच्या हाती माती असते तसे तुम्ही माझ्या हाती आहा." (यिर्मया 18:6)
आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या वेळी सुद्धा, आई-वडिलांनी त्यांच्या लेकरांनात्याच्याकडे आणले की त्याच्याद्वारे आशीर्वादित केले जावे.
वास्तवात, प्रभू शिष्याविषयी क्रोधात आला होता जेव्हा त्यांनी त्यांना अडवले. तुम्हाला वाटते का प्रभू हा बदलला आहे? तो आजही ही इच्छा करीत आहे की लेकरांनी उपासना आणि प्रार्थना करीत त्याच्याकडे यावे.
लेकरांना शिकविणे कीअनेकख्रिस्ती गीतांवर टाळ्या वाजवाव्या, गावे आणि नृत्य करावे हे त्यांच्या मध्ये प्रभूची उपासना करण्यास इच्छा निर्माण करेन.
वयस्करयांच्या उलट, लेकरे ही अत्यंत ताजेतवाने असतात जेव्हा ते सकाळी उठतात. त्यांना त्यांच्या आणि कुटुंबाच्या गरजा बद्दल एक ओळीची प्रार्थना शिकवा. तुम्हाला ठाऊक आहे काय तुम्ही एका तरुण सैनिकाला प्रशिक्षण देत आहात. ते जेव्हा उठतात तेव्हा टीव्ही ऑन करू नका. असे होवो की तुमच्या घरातील वातावरण हे उपासनेचे असावे. मग तुम्ही याची खात्री करू शकता की प्रभू त्यांना त्याच्या हातात घेईल आणि त्यांना आशीर्वाद देईल.
येथे आणखी एक महत्वाची गोष्ट आहे ज्याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. तुम्ही तुमच्या लेकरांना प्रशिक्षण कसे देऊ शकता जर तुम्ही स्वतःला प्रशिक्षण देत नाहीत? याची खात्री करा की तुम्ही रविवार च्या उपासनेला नियमितपणे हजर राहत आहात आणि प्रभू बरोबर व्यक्तिगत वेळ घालवीत आहात.
Bible Reading: Amos 3-7
अंगीकार
माझ्या सर्व लेकरांना प्रभू द्वारे शिकविले जाईल आणि त्यांची शांती ही महान असेन येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel

Most Read
● गुणधर्म ज्याने दावीद ला राजासमोर उभे राहण्यास समर्थ केले● जीवन हे रक्तात आहे
● महान पुरस्कार देणारा
● चांगले आर्थिक व्यवस्थापन
● दिवस १३:४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
● त्या विश्वासांना मर्यादित करणे जे तुम्हाला अडखळण करते
● मध्यस्थी वर एक भविष्यात्मक शिकवण १
टिप्पण्या