डेली मन्ना
२१ दिवस उपवासः दिवस १५
Sunday, 26th of December 2021
39
9
1937
Categories :
उपास व प्रार्थना
इस्राएल, यरुशलेम व मध्य पूर्व
आपल्याला इस्राएल साठी प्रार्थना करण्याची गरज आहे याचे एक मुख्य कारण हे आहे कारण ते देवाचे लोक आहेत. परमेश्वर इस्राएल ला "डोळ्यातील बाहुली" असे म्हणतो, जो प्रेमळपणाचा शब्द आहे (अनुवाद ३२:१०; जखऱ्या २:८).
परमेश्वर त्यांना आशीर्वाद देतो जे इस्राएल ला आशीर्वाद देतील आणि जे इस्राएल ला शाप देतील त्यांना शाप देईन (उत्पत्ति १२:२-३). पवित्र शास्त्रातून खरी संपन्नता ही पैशा पेशा अधिक आहे, हे जीवनाच्या सर्व क्षेत्रात कल्याण होणे आहे.
परमेश्वर इस्राएल चा कधीही त्याग करणार नाही, आणि शेवटी इस्राएल हा सर्व सामर्थी परमेश्वरा द्वारे वाचविला जाईल. (मलाखी ३:६, रोम ११:१)
प्रार्थना
प्रत्येक प्रार्थना अस्त्र जोपर्यंत तुमच्या हृदयातून येत नाही तोपर्यंत ते वारंवार म्हणा. केवळ तेव्हाच पुढच्या प्रार्थना अस्त्रा कडे वळा. (ते वारंवार म्हणा, व्यक्तिगत करा, आणि प्रत्येक प्रार्थना मुद्द्यासह ते कमीत कमी १ मिनीट करा.)
१. पित्या, येशूच्या नांवात, यरुशलेमच्या शांति साठी मी प्रार्थना करतो. मी प्रार्थना करतो की तिच्या भिंतीच्या आत शांति राहील व तिच्या राजवाडयात संपन्नता राहील. मी अशी सुद्धा प्रार्थना करतो की यरुशलेम हे इस्राएल चे अविभाज्य राजधानी असे राहील.
२. परमेश्वरा, मी मध्यपूर्व राष्ट्रांसाठी प्रार्थना करतो की त्यांचे तारण व्हावे आणि असे होवो की त्यांचा आवेश हा सत्याच्या ज्ञानानुसार असावा.
३. इस्राएलचा त्यांच्या सर्व संकटातून उद्धार कर, हे परमेश्वरा. त्यांच्यासाठी तुझ्या कराराचे स्मरण कर, हे परमेश्वरा, आणि त्यास शाश्वत करार असे निश्चित कर. इस्राएल व मध्य पूर्व राष्ट्रांत मी तुझ्या शांति साठी प्रार्थना करतो.
४. पित्या परमेश्वरा, येशूच्या नांवात, इस्राएल लोकांची मने व अंत:करणातून प्रत्येक पडदा काढून टाक की त्यांनी प्रभु येशूला खरा मशीहा असे स्वीकारावे.
५. पित्या, धार्मिक व धर्मनिरपेक्ष यहूद्यांमध्ये एकता व शांति साठी मी प्रार्थना करतो, की मशीहाची वाट पाहणाऱ्या यहूद्यांमध्ये व त्या देशातील इतर लोकांमध्ये शांति प्रवाहित होवो, येशूच्या नांवात.
६. पित्या, येशूच्या नांवात, इस्राएल साठी मध्यस्थी करणारे उभे कर. यरुशलेमच्या भिंतीवर अधिक पहारेकरी ठेव जे तुला दिवसरात्र शांति देणार नाही जोपर्यंत तूं यरुशलेम स्थापित करीत नाही व तिला पृथ्वीचे स्तवन करीत नाही.
७. दयाळू पित्या, इस्राएल लोकांची मने सुटका होण्यासाठी त्यांचे रथ व घोड्यांच्या सामर्थ्यात नाही तर तुझ्या नामात विश्वास ठेवण्यास वळीव.
८. पित्या, येशूच्या नांवात, मी प्रार्थना करतो की यरुशलेमच्या रस्त्यावर ना ही कण्हणे ना रडणे ऐकू यावे, परंतु तिने आनंद करावा व तिचे लोक राष्ट्रांसाठी आनंद व्हावेत.
९. पित्या, येशूच्या नांवात, ते जे इस्राएल विरुद्ध हिंसा उत्पन्न करतात त्यांची जीभ नष्ट कर व त्यास विभाजित कर.
१०. पित्या, मी प्रार्थना करतो की भारत (तुमच्या देशाचे नाव घ्या) व इस्राएल हे मित्र व्हावेत. मी विनंती करतो की भारतातील (तुमच्या देशाचे नाव घ्या) लोकांनी इस्राएली लोकांना प्रेम करावे व मशीहाच्या-प्रभु येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची वाट पाहात तयारी करावी.
अंगीकार
पापकबुली (हे मोठयाने म्हणा)
तूं उठून सीयोनेवर दया करिशील; कारण तिच्यावर कृपा करण्याचा समय आला आहे;
नेमिलेला समय येऊन ठेपला आहे; तुझ्या सेवकांना तिचे दगडही प्रिय आहेत;
तिची धूळधाण पाहून ते हळहळतात. (स्तोत्र १०२:१३-१४)
Join our WhatsApp Channel
Most Read
● सैतान तुमच्या कार्यात कसे अडथळे आणतो● चमत्कारीक कार्य करणे: मुख्य बाब #२
● तुम्ही किती मोठ्याने बोलू शकता?
● सर्वांसाठी कृपा
● शर्यत धावण्यासाठी योजना
● २१ दिवस उपवासः दिवस ०२
● एक क्षेत्र ज्यामध्ये सैतान तुम्हांला अधिक अडथळा आणतो
टिप्पण्या