“आपण नीतिमान आहोत असा जे कित्येक स्वतःविषयी भरवसा धरून इतर सर्वांना तुच्छ मानत होते त्यांनाही त्याने दाखला सांगितला, तो असा: एक परुशी व एक जकातदार असे दोघे जण प्रार्थना करण्यास वर मंदिरात गेले. परुश्याने उभे राहून स्वतःशी अशी प्रार्थना केली, ‘हे देवा, इतर माणसे लुबाडणारी, अन्यायी, व्यभिचारी आहेत, त्यांच्यासारखा किंवा ह्या जकातदारासारखाही मी नाही, म्हणून मी तुझे आभार मानतो. मी आठवड्यातून दोनदा उपास करतो; जे मला मिळते त्या सर्वांचा दशांश देतो.’ जकातदार तर दूर उभा राहून वर स्वर्गाकडे दृष्टी लावण्यासदेखील न धजता आपला ऊर बडवत म्हणाला, ‘हे देवा, मज पाप्यावर दया कर.’ मी तुम्हांला सांगतो, त्या दुसऱ्यापेक्षा हा नीतिमान ठरून खाली आपल्या घरी गेला; कारण जो कोणी स्वतःला उंच करतो तो नमवला जाईल आणि जो कोणी स्वतःला नमवतो तो उंच केला जाईल.” (लूक १८:९-१४)
कधीकधी, आपल्याला वाटते की आपण हे सर्व शोधून काढले आहे. आम्ही आमच्या सकाळच्या भक्तीला जातो, चर्चला नियमित हजर राहतो, आणि प्रभूची आणि त्याच्या लोकांची सेवा करण्यात देखील भाग घेतो. पण आध्यात्मिक अभिमानाच्या सापळ्यात अडकणे सोपे आहे, कृपेची दृष्टी गमावत जी आपल्याला दररोज टिकवून ठेवते. परुशी आणि जकातदाराचा दाखला आध्यात्मिक अभिमानाविरुद्ध कडक इशारा देतो आणि खऱ्या नीतिमत्वासाठी आपल्याला मार्ग दाखवतो.
परुश्यामध्ये आध्यात्मिक अभिमान
१. स्वार्थी-नीतिमत्व:
परुश्याला वाटले की तो इतरांपेक्षा श्रेष्ठ आहे. त्याची प्रार्थना देवाशी नम्र संभाषण करण्यापेक्षा स्वतःचे अभिनंदन करणारे एकपात्री संभाषण होते. रोम. १२:३ आपल्याला सावधगिरीचा इशारा देते, “कारण मला प्राप्त झालेल्या कृपादानांवरून मी तुमच्यापैकी प्रत्येक जणाला असे सांगतो की, आपल्या योग्यतेपेक्षा स्वतःला अधिक मानू नका, तर देवाने प्रत्येकाला वाटून दिलेल्या विश्वासाच्या परिमाणानुसार मर्यादेने स्वतःला माना.”
२. न्याय करण्याची वृत्ती:
परुशी त्याच्या चरित्राचा देवाच्या पवित्र चरित्राद्वारे न्याय करत नाही परंतु इतर माणसांच्या चरित्राद्वारे करतो. जेव्हा जेव्हा तुम्ही तुमच्या चारित्र्याचा देवाच्या पवित्र चरित्राद्वारे न्याय करत नाही परंतु इतर माणसांच्या चरित्राद्वारे करतात, तेव्हा तेव्हा तुम्ही अभिमानात चालत आहात.
त्याने जकातदाराचा द्वेष केला, आणि स्वतःची त्याच्याशी अनुकूल तुलना केली. मत्तय ७:१-२ आपल्याला इशारा देते, “तुमचे दोष काढण्यात येऊ नयेत म्हणून तुम्ही कोणाचे दोष काढू नका. कारण ज्या प्रकारे तुम्ही दोष काढाल त्या प्रकारेच तुमचे दोष काढण्यात येईल आणि ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हांला मापून देण्यात येईल.”
३. कार्यामध्ये चुकीची सुरक्षितता:
परुश्याला त्याच्या कृतीतून खात्री पटली.- आठवड्यातून दोनदा उपास, दशांश अर्पण करणे इत्यादी. इफिस २:८-९ आपल्याला आठवण देते, “कारण कृपेने विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही, तर हे देवाचे दान आहे; कोणी आढ्यता बाळगू नये म्हणून कर्मे केल्याने हे झाले नाही.”
४. पश्चातापाचा अभाव:
परुश्याच्या प्रार्थनेत महत्वाच्या घटकाचा अभाव होता: पश्चाताप. तेथे त्याच्या पापाचा अंगीकार नव्हता किंवा देवाच्या दयेची गरज दिसली नाही. १ योहान १:९ म्हणते, “जर आपण आपली पापे पदरी घेतली, तर तो विश्वसनीय व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करील, व आपल्याला सर्व अनितीपासून शुद्ध करील.”
आध्यात्मिक अभिमानाचे धोके:
अ) आपल्या स्वतःच्या चुकांसाठी आंधळे करते:
परुशी त्याच्या स्वार्थी-नीतिमत्वामध्ये इतका मग्न होता की त्याला स्वतःचे आध्यात्मिक अंधत्व दिसत नव्हते.
ब) समाजाला विभागते:
आध्यात्मिक अभिमान ख्रिस्ताच्या शरीरात अवरोध निर्माण करते, आणि योहान १७:२१ मध्ये ख्रिस्ताने ज्या ऐक्यासाठी प्रार्थना केली त्याचा नाश करते.
क) देवासोबतच्या आपल्या नातेसंबंधाला अडथळा करते:
परुश्याची प्रार्थना देवापर्यंत कधीही पोहचली नाही कारण ती गर्वाने भरलेली होती. याकोब ४:६ आपल्याला सांगते, “.....देव गर्विष्ठांना विरोध करतो, आणि लीनांवर कृपा करतो.”
ड) आपल्याला सैतानाच्या फसवणुकीसाठी दुर्बल करते:
जेव्हा आपण विचार करतो की आपण स्थिर असे उभे आहोत, तेव्हा आपले पतन होण्याकडे अधिक कल असतो. १ पेत्र ५:८ आपल्याला इशारा देते, “सावध असा, जागे राहा, तुमचा शत्रू सैतान हा गर्जणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधत फिरतो.”
Bible Reading: Acts 2-4
प्रार्थना
पित्या, मी नम्रपणे तुझ्यासमोर येतो, आणि सर्व चांगल्या गोष्टी तुझ्यापासून येतात याचा स्वीकार करतो. नम्रतेत चालण्यास, आणि प्रत्येक क्षणी तुझ्या कृपेची मला गरज आहे हे ओळखण्यास मला मदत कर. आध्यात्मिक अभिमानाच्या फसवणुकीपासून मला सांभाळ. येशूच्या नावाने. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● स्वतःची फसवणूक म्हणजे काय?-२● संबंधामध्ये राहण्याद्वारे अभिषेक
● आध्यात्मिकदृष्टया तुम्ही योग्य आहात काय?
● बहाणा करण्याची कला
● प्रीतीचे खरे स्वरूप
● येशू द्राक्षारस (आंब) प्याला
● आध्यात्मिक प्रवेश द्वारांचे रहस्य
टिप्पण्या
