मला आठवते, काही वर्षांपूर्वी, मी एका महत्वाच्या उपासनेला उशिरा पोहचलो आणि घाई मध्ये, मी माझ्या शर्ट चे बटन चुकीने लावले होते. संपूर्ण उपासने दरम्यान, मला त्याबद्दल ठाऊक सुद्धा नव्हते. जेव्हा मी परत घरी आलो, मी ह्या वास्तविकतेला जाणले. मी परमेश्वराला धन्यवाद देतो कि माझ्या शर्ट वर मी कोट घातला होता नाहीतर ते थोडेसे निराशाजनक असे झाले असते.
तुम्ही पाहा, तुमचे केवळ पहिले बटन चुकीचे लागले तर मग पुढील सर्व त्यानुसारच लागतात. तसेचआपल्या प्राथमिकतेबरोबर खरे आहे. जर आपण प्रथम गोष्ट चुकीची केली तर मग पुढील सर्व चुकीच्या होत जातात. याउलट सुद्धा खरे आहे. जर आपण पहिले हे योग्य ठिकाणी लावले तर मग पुढील सर्व योग्य असे होतात.
हे सत्य पुढील वचन सुंदररित्या स्पष्ट करते
तूं आपल्या सर्व मार्गांत त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. (नीतिसूत्रे ३:६)
आपण आपल्या आर्थिकतेमध्ये सुद्धा देवाला प्रथम स्थान दयायला पाहिजे. नीतिसूत्रे ३:९-१० हे स्पष्टपणे उल्लेखते,
"तूं आपल्या द्रव्याने व आपल्या सर्व उत्पन्नाच्या प्रथम फळाने परमेश्वराचा सन्मान कर; म्हणजे तुझी कोठारे समृद्धीने भरतील, तुझी कुंडे नव्या द्राक्षारसाने भरून वाहतील."
आपल्याला देवाला प्रथम दयायचे आहे आणि देवाला ते नाही दिले पाहिजे जे उरलेले आहे. जेव्हा आपण असे करतो, तर मग आपण आपल्या जीवनाच्या प्रत्येक भागामध्ये त्याचे भरणे आणि ओसंडून वाहण्याचा अनुभव कराल.
आपण आपल्या आर्थिकते मध्ये देवाला का प्रथम ठेवले पाहिजे?
# १
पृथ्वी व तिच्यावरील सर्व काही परमेश्वराचे आहे; जग व त्यात राहणारे परमेश्वराचे आहेत. (स्तोत्रसंहिता २४:१)
आपल्या आर्थिकतेने देवाचा आदर करण्यासाठी मुख्य गोष्ट ही त्यावास्तविकतेचे स्मरण करणे की हे सर्व त्याचेच आहे- तुम्ही आणि मी केवळ त्याचे व्यवस्थापन करीत आहोत. जर तुम्ही आठवता, आदाम व हव्वा ला एदेन बागेचा सांभाळ करण्याची जबाबदारी दिली होती. ते त्यांचे स्वतःचे नव्हते परंतु केवळ त्यांना त्याची व्यवस्था ठेवावयाची होती (उत्पत्ति २:१५).
त्याचप्रमाणे, आपण केवळ त्याचे व्यवस्थापन करणारे आहोत जे देवाने आपल्याला सोपविले आहे.
दाविदाने हे सत्य समजले होते जेव्हा त्याने त्याच्या आर्थिकते मध्ये देवाला प्रथम स्थान दिले होते, आणि म्हटले, "सर्व काही तुझ्यापासून प्राप्त होते; तुझ्याच हातून प्राप्त झालेले आम्ही तुला देत आहो." (१ इतिहास २९:१४)
# २
दुसरे म्हणजे, देवाला तुमच्या आर्थिकते मध्ये प्रथम स्थान देणे जरी जेव्हा कठीण परिस्थती आहे हा एक खात्रीशीर मार्ग आहे की तुमच्या विश्वासात वाढ करावी.
मला आठवते देवाला प्रथम देण्याविषयी देवाच्या एक मनुष्य, मॉरीस सेरुलो द्वारे ऐकले होते. मीमाझ्या आत्म्यात पूर्णपणे विश्वास ठेवला आणि प्रेरणा घेतली होती. देवाला देण्या बद्दल मी अवश्य माझी वाटचाल सुरु केली होती. तथापि, मला तुमच्याबरोबर प्रामाणिकपणे कबूल करू दया तसे करणे इतके सोपे नव्हते. अशी वेळ होती जेव्हा चिंता आणि अश्रू होते.
आणिमाझ्या आर्थिकते मध्ये देवाला प्रथम स्थान देण्यासाठी मला फारच त्याग करावा लागत होता. तथापि, चांगली बाजू ही, तेथे माझ्या जीवनात, माझ्या नोकरी मध्ये अनेक चांगल्या गोष्टी घडत होत्या. सर्व बाजूने कृपा मिळत होती आणि सर्वमार्ग उघडले जात होते.
पहिल्या प्रथम मला वाटले, हा केवळ योगायोग असेन, परंतु मगते घडत आणि घडतच गेले. तेथे काहीही नैसर्गिक स्पष्टीकरण नव्हते-मी केवळ हे जाणले की देव हा त्यामार्गाद्वारे माझ्याकडे येत होता.
१ राजे १७ आपल्याला सारफथ येथील विधवे बद्दल सांगते.
तीचा पती अगोदरच मरण पावलेला आहे, आणि आता ती एका गंभीर दुष्काळास तोंड देत आहे. तिच्या पहिल्या दयनीय स्थितीमध्ये भर टाकणे म्हणजे, आता ती दुष्काळा मुळे ती तिच्या मुलाला सुद्धा गमाविण्याच्या परिस्थिती मध्ये आहे, हे अशा दुर्दैवी परिस्थिती मध्ये की देवाने त्याचा संदेष्टा तिच्याकडे पाठविला.
एलीया तिला म्हणाला, भिऊ नको, तूं जा आणिम्हणतेस त्याप्रमाणे कर. पण त्यापूर्वी माझ्यासाठी एक लहानशी भाकर भाजून आण, नंतर आपल्यासाठी व आपल्या मुलासाठी भाज.
इस्राएलाचा देव परमेश्वर म्हणतो, परमेश्वर पृथ्वीवर पर्जन्यवृष्टि करील त्या दिवसापर्यंत तुझे पिठाचे मडके रिकामे होणार नाही आणि तेलाची कूप आटणार नाही." (१ राजे १७:१३-१४)
मला हे विचार-करावयास लावते की देवाने त्याच्या संदेष्ट्याला एका श्रीमंत मनुष्याकडे पाठविले नाही परंतु एका गरीब विधवेकडे जिच्याकडे तिच्या स्वतःसाठी पुरेसे नव्हते.
लक्षात घ्या-संदेष्टा म्हणत आहे, "माझ्यासाठी प्रथम एक लहानशी भाकर भाजून आण." पहिल्या प्रथम ते खूपच त्रासदायक असे दिसते पण तुम्ही पाहा, ही ती विधवा नव्हती जी संदेष्ट्याला साहाय्यदेण्याचा प्रयत्न करीत होती परंतु देव त्या विधवेला साहाय्य देण्याचा प्रयत्न करीत होता. अनेक वेळेला आपण असा विचार करतो की देवाला प्रथम स्थान दिल्याने आपण देवाला खरेच साहाय्य देत आहोत परंतु वास्तविकतेमध्ये परमेश्वर आपल्याला साहाय्य देण्याचा प्रयत्न करीत असतो.
प्रार्थना
पित्या, येशूच्या नांवात,देण्याच्या विषयाबाबतीत माझ्या हृदयाशी बोल. असे होवो की माझ्या हृदयात असे काहीही राहू नये जे तुझ्याशी स्पर्धा करीत आहे.
Most Read
● तुमचा दिवस तुमची व्याख्या देतो● तुम्हांला एकासदुपदेशकाची का गरज लागते
● परमेश्वराकडे तुमच्यासाठी योजना आहे
● अन्य भाषे मध्ये बोला व आध्यात्मिकदृष्टया ताजेतवाने व्हा
● तुमच्या विश्वासाची तडजोड करू नका
● भविष्यात्मक मध्यस्थी
● सुटकेचा दिवस (दिवस १०)
टिप्पण्या