तुम्ही ज्या मिसर देशांत राहत होता तेथील चालीरीतींना अनुसरून चालू नका; तसेच ज्या कनान देशांत मी तुम्हांला घेऊन जातआहे, तेथील चालीरीतींना अनुसरून चालू नका व तेथील विधींप्रमाणे चालू नका. (लेवीय १३: ३)
मोशे ला आदेश दिला होता की देवाच्या लोकांना सांगावे कीत्यांनी त्यांची जीवने वेगळ्या प्रकारे जगली पाहिजे. मिसरी लोक जसे राहतात हे जे त्यांनी पाहिले होते जेव्हा ते तेथे गुलाम होते,तसे त्यांनी जगू नये. ना ही त्यांनी तसे वागण्यास सुरुवात करावी जसे कनान येथील लोक जगत होते, ज्या भूमी मध्ये परमेश्वर त्यांना घेऊन जात होता जी त्यांना कायमची देण्यात येणार होती.
सिद्धांत हा स्पष्ट आहे. ठिकाण जेथे तुम्ही राहता आणि लोक ज्यामध्ये तुम्ही राहता त्यांनी तुमच्यावर प्रभाव टाकू नये परंतु त्याऐवजी तुम्हीं त्यांच्यावर सकारात्मक प्रभाव टाकावा.
प्रभु येशूने म्हटले, "तुम्ही पृथ्वीचे मीठ आहा" (मत्तय५:१३).
मीठ योग्य प्रमाणात चव आणते आणि भोजनाचे मूल्य वाढविते. तुम्हाला तुमच्या भोवतालच्या लोकांवर सकारात्मक प्रभाव टाकला पाहिजे.
दु:खद आहे, की ख्रिस्ती लोक नेहमी त्यांचे आचरण हे जगाच्या आचरणाकडून घेतात, परमेश्वर आणि त्याच्या वचनाकडून नाही. स्पष्टपणे, ख्रिस्ती लोकांनी जगाच्या नैतिकतेपासून भिन्न असले पाहिजे आणि त्यांनी पवित्र शास्त्राची नैतिकता आचरणात आणली पाहिजे.
आपण थर्मोस्टाट झाले पाहिजे, थर्मोमीटर नाही. थर्मोमीटर केवळ त्याच्या भोवतालचे तापमान दर्शविते परंतु थर्मोस्टाट तापमान नोंद करते आणि मग त्यास स्थिरप्रमाणात बदलण्यास पाहते.
परमेश्वराने संदेष्टा यिर्मया ला म्हटले, "तूं त्यांच्यावर प्रभाव टाक, त्यांना तुझ्यावर प्रभाव टाकू देऊ नको." (यिर्मया १५: १९)
प्रारंभीच्या चर्च मध्ये, ख्रिस्ती लोकांद्वारे ख्रिस्ती धर्माच्या सत्यासाठी एकअनुवाद पुढे करण्यात आला "तुम्ही आमच्या जीवनाकडे पाहून हे जाणू शकता की हे सत्य आहे." आज, ख्रिस्ती जग म्हणते, "माझ्याकडे पाहू नका, येशू कडे पाहा."
प्रेषित पौलाने रोम येथील लोकांना लिहिले, "देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे, म्हणून ह्या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्यानवीकरणाने स्वतःचे रुपांतर होऊ दया."(रोम १२: २)
प्रार्थना
पित्या, येशूच्या नांवात, मला साहाय्य कर की ह्या जगाच्या रीतीनुसार चालू नये परंतु तुझ्या प्रमाणानुसार जगावे. पवित्र आत्म्या मला साहाय्य कर की माझ्या सभोवतालच्या लोकांसाठी ख्रिस्ताचा आदर्श व्हावे. आमेन.
Join our WhatsApp Channel

Most Read
● देवाने एवढी प्रीती केली की त्याने दिला● आत्मसमर्पणात स्वातंत्र्य
● देवाचे ७ आत्मे: समज चा आत्मा
● परमेश्वराने आई ला विशेष असे बनविले आहे
● देवाचे वचन काय तुम्हाला अडखळवू शकते?
● मध्यस्थी करणाऱ्यांसाठी एक भविष्यात्मक संदेश
● तुम्ही किती मोठ्याने बोलू शकता?
टिप्पण्या