एके दिवशी प्रभु येशूने त्याच्या दोन शिष्यांना पाठविलेआणि म्हटले, "तुम्ही समोरच्या गावात जा; म्हणजे तेथे जाताच ज्याच्यावर कोणी कधीही बसले नाही असे एक शिंगरू बांधलेले तुम्हांस आढळेल, ते सोडून आणा. ते का सोडता असे कोणी तुम्हांस विचारलेच तर, प्रभूला ह्याची गरज आहे, असे सांगा. (लूक १९: ३०-३१)
प्रथम गोष्ट जी मला तुम्हाला सांगावयाची आहे ती ही की हे ज्ञानाच्यावचनाचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. लक्षात घ्या, येशूने स्पष्ट सुचना दिली की कोठे जावे, कोणत्या दिशेला, तेथे काय असेल, कोणत्या परिस्थितीत वगैरे. हे सर्व काही येशूने व्यक्तिगतरित्या तेथे न जाता म्हटले किंवा त्याबद्दल अगोदर कोणतीही माहिती नसताना.प्रभूच्या अचूक भविष्यवाणी बाबतमला नेहमी आश्चर्य वाटते.
पुढील गोष्ट जी मला पहावयाची आहे ती ही की शिंगरू हे "बांधलेले" होते. आपल्याला हे ठाऊक नाही की त्यास किती वेळापासून बांधलेले होते. शिष्यांना काम सांगितले होते की त्या शिंगराला सोडवावे; त्या शिंगराला मोकळे करावे. जर तेथे मोकळे करण्यामध्ये काही प्रतिबंध झाला,तर त्यांनी सोडविण्याचा उद्देश सांगावयाचा होता-कारण प्रभूला याची गरज आहे.
मी स्पष्टपणे आठवतो, जेव्हा मी एका स्त्री साठी प्रार्थना केली होती जिला दुष्ट शक्तीपासून सुटका हवी होती. जसे मी येशूच्या नांवात सैतानाला बाहेर येण्याची आज्ञा दिली, एक आवाज आला. हे जसे काही एक मनुष्य बोलत आहे असे होते आणि ते म्हणाले, "ती माझी आहे. मी तिला सोडणार नाही." त्याक्षणी हे वचन माझ्या मनात आले. शिष्यांना कोणालाही जे शिंगराला सोडविताना प्रतिबंध करणार होते त्यांना हे सांगावयाचे होते, "प्रभूला याची गरज आहे." मी पुन्हा म्हटले, "प्रभूला तिची गरज आहे, तिला सोड." ताबडतोब दुष्ट शक्तीने तिला सोडले आणि ती मुक्त झाली.
शिंगरा प्रमाणे, तुम्हालासुद्धा तुमच्या जीवनावर एक दैवी काम आहे आणि ते हे की देवाची सेवा करावी. जरतुम्ही तुमच्या आत्म्यात सखोलतेमध्ये हे सत्य जाणता की तुम्ही ह्या पृथ्वीवर एका दैवी कामानुसारआला आहात जे तुमच्या शिवाय कोणीही पूर्ण करू शकत नाही. तर मग तुम्ही केवळ सुटका प्राप्त करणार नाही परंतु तुम्ही तुमच्या कार्यात चालाल.
तुमची सध्याची परिस्थिती किंवा सध्याचे स्थान ह्याकडे पाहू नका. केवळ हे समजा की तुमच्या जीवनावर एक दैवी काम आहे. गोष्टी ह्या बदलू लागतील.
प्रभूने त्याच गाढवाला वापरले ज्यास सोडविले होते की यरुशलेम मध्ये प्रवेश करावा. परमेश्वर तुमचा उपयोग करेल की त्याचे गौरव घोषित करावे. (लूक १९: ३७-३८)
अंगीकार
प्रभूला माझी गरज आहे.
माझ्या जीवनावर मला एक दैवी काम आहे.
येशूच्या नांवात, मी माझ्या जीवनावर असणाऱ्या कार्याला पूर्ण करेन.
मी देवाच्या गौरवाची जाहिरात आहे.
माझ्या जीवनावर मला एक दैवी काम आहे.
येशूच्या नांवात, मी माझ्या जीवनावर असणाऱ्या कार्याला पूर्ण करेन.
मी देवाच्या गौरवाची जाहिरात आहे.
Join our WhatsApp Channel

Most Read
● देवाने एवढी प्रीती केली की त्याने दिला● आत्म्याची फळे कशी विकसित करावी-2
● सार्वकालिकता मनात ठेवून जगणे
● परिस्थितीच्या दयेखाली कधीही जाऊ नये
● दिवस १५ : ४० दिवस उपास व प्रार्थनेचे
● उपासनेचा सुगंध
● ख्रिस्ता द्वारे विजय मिळवणे
टिप्पण्या