येशूने तिला म्हटले, मला नवरा नाही हे ठीक बोललीस, कारण तुला पाच नवरे होते आणि आता जो तुझ्याबरोबर आहे तो तुझा नवरा नाही, हे तूं खरे सांगितलेस. (योहान ४: १७-१८)
एके दिवशी प्रभु येशूयहूदा कडून गालील कडे चालला होता.
त्याने हे मनात घेतले की तो शोमरोन मधून जाईल. त्याच्या प्रवासात, तो शोमरोन च्या एका नगरात आला, ज्यास सुखार म्हणतात. तेथे एक शोमरोनी स्त्री (आपल्याला तिचे नाव ठाऊक नाही) दुपारच्या वेळेला विहिरीवरून पाणी काढण्यासाठी आली. त्या दिवसात, स्त्रिया विहिरीवरून पाणी भरण्यास तेव्हाच येत जेव्हा वातावरण थंड होत असे. ही स्त्री तिच्या वाईट जीवना विषयी जाणून होती आणि जाणूनबुजून ज्यावेळीदिवसा अधिक गर्दी नसेल अशी वेळ तिने निवडली, की तिच्या शेजाऱ्याकडून कुजबुज, टोमणे आणि घृणा यास टाळावे याची काळजी घेतली. जीवनातून जाण्याचा किती दु:खद मार्ग होता.
तेथे अगोदरच तिच्या जीवनात सहा मनुष्य तिच्या जीवनात आले होते, परंतुतिला जे पाहिजे होते ते तिला देऊ शकले नाही-खरेप्रेम. हेअसू शकते की त्यांनी केवळ तीचा तिटकारा केला असेन आणि तिला सोडून टाकले असेन. सर्वांत मनोरंजक गोष्ट ही होती की प्रभु येशू हा तिच्या जीवनात येणारा सातवा व्यक्ति होता.
येशू हा सिद्ध मनुष्य होता. त्यास तिला त्याच्या स्वार्थी हेतू साठी वापरावयाचे नव्हते. त्याचीप्रीति ही शुद्ध आणि पवित्र होती. हे ते प्रेम होते ज्याचा ती शोध घेत होती. ती चुकीच्या प्रेमा मुळे थकलेली होती जे इतर मनुष्यांनी तिला दिले होते. तिने येशूचे प्रेम प्राप्त केल्या नंतर, ती समाजाला तोंड देऊ शकली आणि देवाने तिच्यासाठी काय केले हे सांगू शकली. त्याचप्रमाणे, तुम्ही जेव्हा येशूचे मित्र होता, तुम्हीह्या खऱ्या प्रेमाचा अनुभव कराल जे इतर देऊ शकत नाही.
एका तरुण मुलीने मला हे म्हणत लिहिले, "तिच्या अनेक वर्षांच्या प्रेमी ने तिला सोडले आहे आणि ती आता केवळ एकच म्हणजे आत्महत्त्येचा विचार करीत आहे. अनेक विचार करतात की जर ते केवळ विवाह करू शकले, तर ते त्यांच्या सर्व समस्यांना सोडवू शकतील.
विवाह-हा सर्व समस्यांचा उपाय नाही. मी हे सुद्धा नेहमी ऐकतो जेव्हा जोडपे जे विवाहित आहेत ते असे म्हणत अशी इच्छा करतात कीते एकटे असते तर. तो सुद्धा उपाय नाही.
जर तुम्ही समाधान प्राप्त करू शकता-तुमच्या वर्तमान परिस्थितीत, तर तुम्ही खात्रीने तुमच्या विवाहित किंवा एकटे राहण्याच्या जीवनात समाधान प्राप्त करू शकता. हे समाधान केवळ येशू मध्ये प्राप्त करता येते. शोमरोनी स्त्री ने येशू मध्ये समाधान प्राप्त केले आणि म्हणून आपण ह्या प्रिय स्त्रीला आजपर्यंत स्मरण करतो. ही आता तुमची वेळ आहे.
प्रार्थना
स्वर्गातील पित्या,मला सार्वकालिक प्रेमाने प्रेम करण्यासाठी मी तुझा आभारी आहे. तुझीप्रीति ही स्वार्थी नाही. तुझीप्रीति हीबिनशर्त आहे. तू माझ्यावर इतके प्रेम केले की तू तुझा पुत्र, प्रभु येशूलामाझ्यासाठी पाठविले. तुझ्याप्रीति मध्ये वाढण्यास मला साहाय्य कर. येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● तुम्ही प्रार्थना करा, तो ऐकतो● निंदा संबंधाला नष्ट करते
● किंमत मोजणे
● बारा मधील एक
● सैतान तुमच्या कार्यात कसे अडथळे आणतो
● योग्य व्यक्तीबरोबर संबंध ठेवा
● तुमची नवीन वाटचाल थांबविली जाऊ शकत नाही
टिप्पण्या