कारण आकाश जसे पृथ्वीहून उंच आहे तसे माझे मार्ग तुमच्या मार्गाहून आणि माझ्या कल्पना तुमच्या कल्पनांहून उंच आहेत. (गणना ५५:९)
हे वचन सांगते की परमेश्वर मनुष्या पेक्षा वेगळ्या प्रद्धतीने विचार करतो. दुसऱ्या शब्दात, परमेश्वराकडे विचार करण्याची एकमेव पद्धत आहे. सत्य हे आहे की जर आपल्याला परमेश्वराबरोबर चालावयाचे आहे, त्याच्या उपस्थितीची भेट घ्यायची आहे, तर मग आपल्याला त्याच्या प्रमाणास आत्मसात केले पाहिजे आणि परमेश्वराला आपल्या प्रमाणा इतके खाली आणू नये- ती तडजोड आहे.
आपल्यातील अनेकजण हे जे काही आपण आपल्या भोवती पाहतो आणि ऐकतो त्यावर आधारित आपले जीवन जगतो.
आपल्या भोवतालची परिस्थितीकिंवा लोक अनेक वेळेला आपल्या प्रमाणास दिशा देतात, जर तुम्हाला पाहिजे की तुम्ही फरक आणावा, जर तुम्हाला पाहिजे की जे सर्व काही परमेश्वराने तुमच्यासाठी ठेवले आहे त्यात तुम्ही प्रवेश करावा, तर मग तुमच्या जीवनाच्या स्तरास समाजाला दिशा दाखवू देऊ नका.
आपण तर निवडलेला वंश, राजकीय याजकगण, देवाचे स्वतःचे लोक आहोत. आपण केवळ एक सामान्य व्यक्ति नाहीत (१ पेत्र २:९). तुम्हालादेवाचीप्रीति आणि पवित्रतेनुसार प्रगती करावयाची आहे आणि नीतिमानाचे जीवन जगावयाचे आहे. तुमच्या जगण्याचे स्तर उंचवाआणि देवाच्या सामर्थ्याची परिपूर्णता अनुभवा.
जर तुम्हाला खरेच तुमच्या जीवनात बदल हा हवा आहे, तर मग तुम्हाला तुमच्या जगण्याच्यास्तरात वाढ करावयाची आहे.
तुमचे प्रमाण हे उदाहरणा साठी होऊ शकते, की तुमच्या नियोजित भेटी साठी वेळेवर पोहोचावे (त्यात चर्च उपासना सुद्धा आहे) किंवा वातित पेये पिऊ नये किंवा दररोज एका नियमित वेळी झोपणे किंवा उठणे किंवा दररोज एका निश्चित वेळी प्रार्थना करावी आणि इतर बरेच काही.
मग ते स्वास्थ्य, संबंध, परमेश्वराची सेवा करणे काहीही असो, तुम्हाला तुमचे स्तर उंचवायचे आहे. पौलाने कलस्सै ३: १-४ मध्ये लिहिले, "म्हणून तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठविले गेला आहा, तर ख्रिस्त 'देवाच्या उजवीकडे जेथे बसला आहे, तेथल्या वरील गोष्टी मिळविण्याचा प्रयत्न करा. वरील गोष्टींकडे मन लावा. पृथ्वीवरील गोष्टींकडे लावू नका. कारण तुम्ही मृत झाला आहा आणि तुमचे जीवन ख्रिस्ताबरोबर देवामध्ये गुप्त ठेवलेले आहे. आपले जीवन जो ख्रिस्त तो प्रगट केला जाईल तेव्हा तुम्हीही त्याच्याबरोबर गौरवात प्रगट केले जाल."
सरळ शब्दात प्रेषित पौल हे म्हणत आहेकी, एक ख्रिस्ती म्हणून आपल्याला प्रभावीपणे आपले स्तर उंचवायचे आहे, म्हणजे आपण ख्रिस्तासाठी एक जिवंत बातमी होऊ शकतो. हा निर्णय करा की येथूनपुढे तुम्ही खालच्या स्तराचे जीवन जगणार नाही.
तुम्ही तुमच्या जीवनाच्या प्रत्येक भागामध्ये उत्तमतेमध्ये चालणार आहात. परमेश्वर तुमच्या बाजूने असे तुम्ही खात्रीने हे करू शकाल.
प्रार्थना
प्रत्येक प्रार्थना मुद्द्यांसाठी कमीतकमी ३ मिनिटे किंवा जास्त वेळ प्रार्थना केली पाहिजे.
व्यक्तिगत आध्यात्मिक वाढ
येशूच्या नांवात, मला ख्रिस्ताचे मन आहे आणि मी त्याच्या अंत:करणाचे विचार, भावना आणि उद्धेश घेऊन चालतो.
येशूच्या नांवात, देवाचे वचन हे माझ्या जीवनाच्या जगण्याचे प्रमाण आहे.पवित्र आत्मा वचनाच्याद्वारे माझ्या जीवनाच्या प्रत्येक भागामध्ये मार्गदर्शन देतो. आमेन.
कुटुंबाचे तारण
पित्या तुझी दया प्रदिवशी नवीन आहे यासाठी तुझा धन्यवाद. खरोखर आमच्या आयुष्याच्या सर्व दिवस माझ्या व माझ्या कुटुंबाच्या सदस्यांवर तुझा चांगुलपणा व तुझी दया सतत राहिल आणि मी परमेश्वराच्या उपस्थितीत सतत निवास करेन. येशूच्या नांवात. आमेन.
आर्थिकतेचा नवीन मार्ग
मला माझ्या प्रभु येशूची कृपा ठाऊक आहे; तो धनवान असता माझ्याकरिता दरिद्री झाला; अशा हेतूने की त्याच्या दारिद्र्याने मी आणि माझ्या कुटुंबाचे सदस्ये त्याच्या राज्याकरिता धनवान व्हावीत. (२ करिंथ ८:९)
केएसएम चर्च
पित्या, येशूच्या नांवात, मी प्रार्थना करतो की पास्टर मायकल व त्याच्या कुटुंबाचे सदस्ये, व त्यांच्या संघातील सर्व सदस्ये चांगल्या स्वास्थ्य मध्ये राहावीत. असे होवो की तुझी शांति त्यांच्या जीवनात व त्यांच्या कुटुंबाच्या जीवनाला घेरून राहो. असे होवो की करुणा सदन सेवाकार्ये प्रत्येक भागामध्ये वाढत जावो.
Join our WhatsApp Channel
Most Read
● वासनेवर विजय मिळवावा● दिवस १२ : ४० दिवस उपास व प्रार्थनेचे
● बीज चे सामर्थ्य-१
● तुम्ही अजूनही का वाट पाहत आहात?
● पाच प्रकारच्या लोकांना येशू दररोज भेटला #3
● मार्गहीन प्रवास
● महान पुरुष व स्त्रियांचे पतन का होते-२
टिप्पण्या