एक शीर्षक हे विस्तृत वाक्य आहे जे व्यक्तीचे स्थान आणि कार्याला स्पष्ट करते. उदाहरणार्थ, जर व्यक्तीला राष्ट्राचे शीर्षक "राष्ट्रपती" हे आहे, ते सरकार मध्ये त्याचे स्थान आणि राष्ट्राचा पुढारी म्हणून त्याचे कार्य स्पष्ट करते.
त्याचप्रमाणे, संपूर्ण पवित्र शास्त्रात, पवित्र आत्म्याला विविध नांवे किंवा शीर्षक आहेत. ही नावे किंवा शीर्षक आपल्याला हे समजण्यास साहाय्य करतात:
१. तो प्रत्यक्षात कोण आहे
२. त्यांचे अनेक प्रकटीकरण-ते सर्व जे तो आपल्यासाठी करतो
पवित्र आत्मा
तूं मला आपल्यापुढून घालवून देऊ नको;
आणि आपला पवित्र आत्मा माझ्यामधून काढून घेऊ नको. (स्तोत्रसंहिता ५१: ११)
कदाचीत सर्वात सामान्य नाव तुम्ही पवित्र आत्म्यासाठी ऐकाल ते हे की-पवित्र आत्मा. तो पवित्र आहे- दूषित किंवा सामान्य नाही, परंतु देवाची संपूर्ण शुद्धता आणि पवित्रता घेऊन आहे.
तो आत्मा सुद्धा आहे-शरीर नाही, जसे मानव आहेत; त्यासशारीरिक शरीर नाही, परंतु देवाचे अदृश्य स्वभाव व तत्व देतो.
पवित्र आत्मा साधारण आणि कमी महत्वाचे असे दिसणारे स्थान घेतो आणि त्यास अगदी परमपवित्र असे परिवर्तीत करतो-स्थान जेथे देवाची उपस्थिती राहते आणि प्रकट होते.
संपूर्ण पवित्र शास्त्रात काही विशेष स्थानात, जेथे त्रैक्यातील तिसऱ्या व्यक्तीला पवित्र आत्मा असे संबोधले आहे:
येशू ख्रिस्ताचा जन्म ह्या प्रकारे झाला. त्याची आई मरीया हिचे योसेफास वाग्दान झाल्यावर त्यांचा सहवास होण्यापूर्वी ती पवित्र आत्म्यापासून गर्भवती झालेली दिसून आली. (मत्तय १: १८)
तुम्ही वाईट असतांही तुम्हांला आपल्या मुलांना चांगल्या देणग्या द्यावयाचे कळते, तर मग स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात त्यांस तो किती विशेषकरून पवित्र आत्मा देईल? (लूक ११: १३)
तुम्हीही सत्याचे वचन म्हणजे तुमच्या तारणाविषयी सुवार्ता ऐकून घेतल्यानंतर त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याने देऊ केलेल्या पवित्र आत्म्याचा तुम्हांवर त्याच्याठायी शिक्का मारण्यात आला आहे. (इफिस १: १३)
देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका; खंडणी भरून पाप्त केलेल्या मुक्तीच्या दिवसापर्यंत तुम्ही त्या आत्म्याच्या योगे मुद्रित झाला आहा. (इफिस ४:३०)
सत्य हे आहे की आपण आपल्या कृत्यांनी पवित्र होऊ शकत नाही. हा तो पवित्र आत्मा आहे जो आपल्याला पवित्र करतो. ईयोबाचे पुस्तक आपल्याला सांगते की, "अशुद्ध वस्तुमधून कोण शुद्ध ते आणू शकतो?" (ईयोब १४: ४)
जसे आपण पवित्र आत्म्याच्या नांवावर मनन करतो, आपण त्यास अधिक उत्तमपणे जाणू शकतो जो आपल्यामध्ये वास करतो आणि त्याच्या वचनानुसार चालण्यास आपल्याला समर्थ करतो.
प्रार्थना
धन्यवादित पवित्र आत्म्या, कृपा करून तुझ्या पवित्र स्वभावाची गहनसमज मलादे, येशूच्या नांवात.
(ह्या प्रार्थनेला वारंवार म्हणत राहा जोपर्यंत ती तुमच्या अंत:करणापासून येत नाही. तुम्ही त्यामध्ये तुमचे स्वतःचे शब्द सुद्धा जोडू शकता. मगच केवळ पुढे जा.)
(ह्या प्रार्थनेला वारंवार म्हणत राहा जोपर्यंत ती तुमच्या अंत:करणापासून येत नाही. तुम्ही त्यामध्ये तुमचे स्वतःचे शब्द सुद्धा जोडू शकता. मगच केवळ पुढे जा.)
Join our WhatsApp Channel
Most Read
● तुमच्या अंत:करणाचे रक्षण कसे करावे● दिवस २२:४० दिवसांचा उपवास आणि प्रार्थना
● दिवस २०: ४० दिवसांचा उपवास आणि प्रार्थना
● आध्यात्मिक अभिमानावर मात करण्याचे ४ मार्ग
● परिपूर्ण ब्रँड व्यवस्थापक
● शत्रूला तुमच्या परिवर्तनाची भीति वाटते
● उपासने साठी इंधन
टिप्पण्या