मी तुजपासून मोठे राष्ट्र निर्माण करीन; मी तुला आशीर्वाद देईन, तुझे नाव मोठे करीन; तूं आशीर्वादित होशील; तुझे जे अभीष्ट चिंतितील त्यांचे मी अभीष्ट करीन; तुझे जे अनिष्ट चिंतितील त्यांचे मी अनिष्ट करीन; तुझ्या द्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील. (उत्पत्ति १२: २-३)
परमेश्वराचे सात आश्वासन अब्राहामाला जेव्हा तो अजूनही खास्द्यांच्या ऊर देशातच होता; त्याने त्याचे स्वतःचे शहर, त्याचे कुटुंब, त्याच्या सुरक्षित जीवनास सोडण्याअगोदर, आणि कनान कडे हारान च्या मार्गे प्रवास केला.
१) मी तुजपासून मोठे राष्ट्र निर्माण करीन
२)मी तुला आशीर्वाद देईन
ऐम्पलीफाईड बायबल म्हणते, "मी तुला कृपेच्या भरपूर वाढ सहआशीर्वादित करीन." अब्राहामाला भरपूरतेने आशीर्वाद दिला गेला. वास्तवात, उत्पत्ति २४: १ म्हणतेकी, अब्राहामाला सर्व बाबतीत आशीर्वादित केले होते.
३) मीतुझे नाव मोठे करीन
ऐम्पलीफाईड बायबल उत्पत्ति १२: २ मध्येम्हणते, "मी तुझे नाव प्रसिद्ध आणि एकमेव असे करीन." जेथेकोठे अब्राहाम गेला, लोक त्यास ओळखत होते. त्याची प्रसिद्धी त्याच्यापुढे गेली आणि त्याच्यासह होती. तोएक महान राजकुमार होता. तो परमेश्वरा द्वारे त्याच्यावरविपुलकृपा होती.
४)तूं आशीर्वादित होशील
येथूनच ते वाक्य, "आपण आशीर्वादित आहोत की आपण आशीर्वाद व्हावे" हे येते. एक सर्वांत मुख्य कारण की परमेश्वराला पाहिजे की आपल्याकडे प्रमाणापेक्षा अधिक असावे हे यासाठी की आपण इतरांना आशीर्वादित व मदत करावे.
ख्रिस्ती म्हणून जगाच्या रीतीनुसार आपण नाही चालले पाहिजे जे केवळ लाभासाठीच पाहत असावे. त्याऐवजी,देवाचे स्त्रोत ज्या हेतूसाठी ते आहेत त्यासाठीच आपण त्याचा उपयोग केला पाहिजे: की आपल्या सभोवतालच्या जगाला देवाचे गौरव दाखवावे.
परमेश्वराला पाहिजे की आपण उदार असावे. त्यास पाहिजे की आपण इतके आशीर्वादित असावे की जे गरजे मध्ये आहेत त्यांना आपण दयावे. त्यास पाहिजे की आपण आपले आशीर्वाद इतरांना दयावे.
५)तुझे जे अभीष्ट चिंतितील त्यांचे मी अभीष्ट करीन
जेव्हा लोकतुम्हाला आशीर्वाद देतात आणि मदत करतात, परमेश्वर त्यांना आशीर्वादित करेन. तुमच्यावरील कृपा त्यांच्यावर कार्य करेल. प्रत्येकव्यक्ति जो सकारात्मकरित्या तुमच्या जीवनास स्पर्श करतो तो परमेश्वराकडून स्पर्श प्राप्त करेल. तशा प्रकारे आपण आशीर्वादित आहोत.
६)तुझे जे अनिष्ट चिंतितील त्यांचे मी अनिष्ट करीन
जो तुम्हाला विरोध करतो परमेश्वर त्यांना आशीर्वाद देणार नाही. त्याने म्हटले, "मी तुझ्या शत्रूंचा शत्रू होईन आणि जे तुझा विरोध करतात त्यांचा मी विरोध करीन." अनुवाद २८: ७ म्हणते, "तुझ्यावर चढाई करणारे शत्रू तुझ्यापुढे मार खातील असे परमेश्वर करील; ते एका वाटेने तुझ्यावर चालून येतील पण तुझ्या पुढून सात वाटांनी पळून जातील."
७)तुझ्या द्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील
तुम्ही कदाचित हा विचार कराल,जगातील सर्व लोकांना मीकसे काय आशीर्वादित करेन?"
जेव्हा तुम्ही देवाच्या राज्यात सेवा करता,जेव्हा तुम्ही देवाच्या कार्याकरिता दान देता, तुम्ही शुभवर्तमानाला संपूर्ण जगभर पाठविण्यात महत्वाचे वाटेकरी होता.
परमेश्वर गलती ३: ९ मध्ये म्हणतो, "म्हणून जे विश्वासाचे आहेत त्यांना विश्वास ठेवणाऱ्या अब्राहामासहित आशीर्वाद मिळतो." याचा अर्थ प्रत्येक आशीर्वाद जो त्यास होता तो आपल्याला सुद्धा मिळू शकतो.
प्रार्थना
माझा ख्रिस्ता मध्ये बाप्तिस्मा झाला आहे, आणि मी ख्रिस्ताला परिधान केले आहे. ख्रिस्ता मध्ये जे आहेत, त्यांच्यामध्ये यहूदी व हेल्लेणी, गुलाम व स्वतंत्र, पुरुष व स्त्री हा भेदच नाही; कारण तुम्ही सर्व जण ख्रिस्त येशूच्या ठायी एकच आहा.
मी ख्रिस्ताचा आहे म्हणून मी अब्राहामाचे संतान आहे आणि अभिवचनाच्या द्वारे वारीस आहे (गलती ३: २७-२९). अब्राहामाचे आशीर्वाद माझे आहेत येशूच्या नांवात. आमेन.
मी ख्रिस्ताचा आहे म्हणून मी अब्राहामाचे संतान आहे आणि अभिवचनाच्या द्वारे वारीस आहे (गलती ३: २७-२९). अब्राहामाचे आशीर्वाद माझे आहेत येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● दानधर्म करण्याची कृपा-२● देवाचे वचन वाचण्याचे 5 लाभ
● परमेश्वरा, मला अडथळ्यापासून सोडीव
● शांति- देवाचे गुप्त शस्त्र
● बदलण्यासाठी उशीर हा कधीहीझालेला नाही
● २१ दिवस उपवासः दिवस ०२
● ४०वा दिवस: उपास आणि प्रार्थनेचे ४० दिवस
टिप्पण्या