हे कधीही नाकारले जाऊ शकत नाही की परमेश्वराने अनेक प्रसंगी आपल्यावर त्याची अद्भुत कृपा केली आहे. म्हणून, त्याबदल्यात, आपल्याला सांगण्यात येत आहे की आपण जे आपल्या सभोवती आहेत त्यांच्यावर कृपा करावी. इतरांवर कृपा करणे म्हणजे दया करणे जरी जेव्हा ते त्यास पात्र नसतील. येथे काही मार्ग आहे की आपण कृपा करावी जी आपण मुक्तपणे प्राप्त केली आहे.
१. शब्द
जे तुम्ही बोलता व ते तुम्ही कसे बोलता याबद्दल दयाळू व सौम्य असा.
पौलाने म्हटले, "तुमचे बोलणे सर्वदा कृपायुक्त, मिठाने रुचकर केल्यासारखे असावे" (कलस्सै ४:६). प्रेषितास चांगल्यासाठी जिभेचे सामर्थ्य ठाऊक होते आणि तसे शब्द वापरण्यास प्रोत्साहन दिले की इतरांवर येशू साठी प्रभाव करावा व छाप पाडावी.
मी प्रामाणिकपणे विश्वास ठेवतो की आपल्या प्रार्थना अधिक सामर्थ्य व त्याची उपस्थिती घेऊन राहतात जेव्हा आपले दररोजचे जीवन हे त्या शब्दांनी भरलेले राहते जे इतरांना धैर्य देतात व त्यांच्यावर कृपा आणतात. (इफिस ४:२९ वाचा)
२. सर्व देवावर सोडून दया
अशी वेळ असेन जेव्हा लोकांचा दिवस वाईट असेन आणि मग ते त्यांचा राग तुमची काही चूक नसताना तुमच्यावर व्यक्त करतील. अशा वेळी, स्वाभाविक प्रतिक्रिया ही की तुमची दुसरी बाजू त्यांना दाखवावी. त्यास जशास तसे प्रत्युत्तर देण्याऐवजी, शांत राहा व त्यांना जाऊ दया. तुम्हांवर जी कृपा झाली आहे जी तुम्ही मुक्तपणे प्राप्त केली आहे ती तुम्ही त्या व्यक्तीला देत आहात. काही वेळा ते कठीण असू शकते परंतु तसे करणे हे तुम्हाला एका नवीन स्तरावर जाण्याच्या स्थितीत आणेल.
"भांडणापासून दूर राहणे हे मनुष्याला भूषणावह आहे, पण प्रत्येक मूर्ख इसम कलह करीत राहतो" (नीतिसूत्रे २०:३).
३. तेथे राहा
विशेषतः वेळ जशी की आपण ज्यातून सध्या जात आहोत, एक फोनकॉल, एक मेसेज याचीच केवळ गरज असते की त्यांच्यावर तेवढीच प्रीति आहे व त्यांना विसरलेले नाही हे दाखवावे. व्यक्तीला त्याच्या वाढदिवशी किंवा त्यांच्या विवाहाच्या वाढदिवशी फोन करा. पाहा की तेथे काही गरज आहे काय आणि जर तुम्ही ती लहानशी गरज भागवू शकता-तर तुम्ही ते करा. बायबल आपल्याला स्पष्टपणे सांगते की, जो व्यक्ति आनंदी आहे त्याच्याबरोबर आनंद करा, व जो व्यक्ति दु:खी आहे त्याच्याबरोबर दु:ख व्यक्त करा.
"आनंद करणाऱ्यांबरोबर आनंद करा आणि शोक करणाऱ्यांबरोबर शोक करा." (रोम १२:१५)
देवाच्या दृष्टित हे केवळ प्रसन्न करणारे असे नाही परंतु जगाला हे राहण्याचे एक उत्तम स्थान असे करेल. लक्षात ठेवा, हया केवळ लहानसहान गोष्टीच आहेत ज्याची अधिक आवश्यकता असते.
प्रार्थना
पित्या, मी तुझ्या अद्भुत कृपे बद्दल धन्यवाद देतो. मी त्यास पात्र नाही, तरीसुद्धा तूं इतक्या त्वरेने माझ्यावर ओतले आहे. परमेश्वरा, मला समर्थ कर की ही कृपा इतरांवर करावी. येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel

Most Read
● संपन्नतेसाठी विसरलेली किल्ली● पावित्रीकरण स्पष्टपणे सांगितले आहे
● इतरांवर सकारात्मक प्रभाव कसा टाकावा
● २१ दिवस उपवासः दिवस ०६
● परमेश्वराकडून सल्ल्याची गरज
● दयाळूपणाचे मोल आहे.
● दिवस ०२:४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
टिप्पण्या