नहेम्या ला राजा द्वारे यरुशलेम ची भिंत पुन्हा बांधण्यास परवानगी मिळाली होती. जेव्हा त्याने यरुशलेम ची पडलेली भिंत पुन्हा बांधण्याचे कार्य हाती घेतले, त्याला मोठया विरोधाचा सामना करावा लागला. त्याने ते सांभाळले व भिंत बांधण्याचे कार्य ५२ दिवसांत पूर्ण केले. (नहेम्या ४ वाचा.)
देवाने ज्यासाठी तुम्हाला पाचारण केले आहे ते जेव्हा तुम्ही विश्वासपूर्वक पूर्ण करीत असता, तेव्हा विरोधाची अपेक्षा करा.
विरोध हा होईल, परंतु आपला परमेश्वर हा विरोधा पेक्षा मोठा आहे. "आमचा प्रभु थोर व महासमर्थ आहे; त्याची बुद्धी अमर्याद आहे." (स्तोत्र १४७:५)
केवळ विरोध होत आहे याचा अर्थ हा नाही की तुम्ही देवाच्या इच्छे मध्ये नाहीत. प्रेषित पौलाने इफिस नगरातील त्याच्या कार्या बद्दल म्हटले आहे, "कारण मोठे व कार्य साधण्याजोगे द्वार माझ्यासाठी उघडले आहे; आणि विरोध करणारे पुष्कळच आहेत" (१ करिंथ १६:९). कोणत्याही वेळी तुम्हाला संधी आहे, कोणत्याही वेळी तुम्हीं पुढच्या स्तरावर जात आहात, तेथे विरोध असेल.
अनेक व्यक्तिगत लोक व संपूर्ण समाज प्रेषित पौलाच्या विरोधात आले. त्यास काठीने मारहाण करण्यात आली, त्यास उलटे टांगून त्याच्या पायाच्या तळव्यावर मारण्यात आले, नौकाभंग (एकापेक्षा अधिक वेळा), प्राण्यांद्वारे आक्रमण, तुरुंगवास, दगडमार सुद्धा झाली आणि मरणप्राय असे सोडण्यात आले! परंतु येथे पौला मध्ये चिकाटीचा आत्मा होता, जो त्यास थांबू देत नव्हता. (२ करिंथ ११:२३-२७ वाचा)
विपत्तीच्या परिस्थितीत आपल्याला निर्णय करण्याची गरज आहे; एकतर आपण शांत राहावे किंवा तो मार्ग सोडून दयावा किंवा आपण निर्णय करावा की पौला सारखा स्वभाव धारण करावा जेव्हा आपण दुसऱ्या बाजूने विरोधाचा सामना करीत असतो.
कोणीतरी म्हटले आहे की जे तुम्ही प्राप्त करता त्याद्वारे यशाचे मोजमाप करत नाही, परंतु विरोध, ज्यावर तुम्ही वर्चस्व मिळविले आहे. यात काही आश्चर्य आहे काय की बायबल वर्चस्व मिळविणाऱ्यांसाठी पुरस्कार बद्दल बोलते.
प्रार्थना
पित्या, मला तुझे सामर्थ्य दे की प्रत्येक बलाढय, प्रत्येक महाकाय प्रसंग जे माझ्या विरोधात आहेत त्यावर वर्चस्व मिळवावे. मी तुला धन्यवाद देतो की तूं मला प्रभावाच्या उच्च स्तरावर नेत आहे. मला समर्थ कर की तुझ्या वचनावर स्थिर राहावे. येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel

Most Read
● पवित्र आत्म्या विरुद्ध निंदा म्हणजे काय आहे?● आध्यात्मिक अभिमानावर मात करण्याचे ४ मार्ग
● पवित्र शास्त्राच्या संपन्नतेचे रहस्य
● पवित्रतेचे दुहेरी पैलू
● सापांना रोखणे
● अनुकरण करा
● आध्यात्मिक दरवाजे बंद करणे
टिप्पण्या