डेली मन्ना
41
15
1590
सर्वशक्तिमान परमेश्वराबरोबर भेट
Friday, 1st of April 2022
Categories :
परमेश्वराबरोबर घनिष्ठता
परंतु त्याने मला म्हटले आहे, माझी कृपा तुला पुरे आहे; कारण अशक्तपणातच शक्ति पूर्णतेस येते. म्हणून ख्रिस्ताच्या सामर्थ्याची छाया माझ्यावर राहावी म्हणून मी विशेषेकरून आपल्या अशक्तपणाची प्रौढी फार आनंदाने मिरवीन. (२ करिंथ १२:९)
दानीएलाने एक दृष्टांत पाहिला ज्याने त्याला अत्यंत कष्टी केले.
त्यास तो दृष्टांत समजून घ्यावयाचा होता म्हणून तीन आठवडे उपास करण्याद्वारे तो दृष्टांत समजण्याचा विचार केला. त्याच्या तीन आठवडयाच्या उपास नंतर तीन दिवसांनी, देवाचा एक दूत दानीएलास प्रगट झाला. दूताने हे स्पष्ट केले की स्वर्गाने त्याची प्रार्थना पहिल्या दिवसापासूनचऐकलीपरंतु दुताला तात्पुरते पारसाचा राजकुमार, एक भुताटकी दूत द्वारे येण्यासाठी अडखळण केले गेले, ज्याने देवाच्या दुताला दानीएल कडे येण्यापासून रोखण्याचा व प्रतिरोध करण्याचा प्रयत्न केला होता.
येथे आपल्या जीवनात कधी अशी वेळ येते जेव्हा आपण आपल्या संपूर्ण अंत:करणाने परमेश्वराचाधावा करण्याचा विचार केला पाहिजे. हे अशा वेळा दरम्यान आपण स्वर्गाकडून ऐकतो त्या मार्गाद्वारे ज्याचा आपण पूर्वी कधीही अनुभव केलेला नसतो.दानीएलाची प्रार्थनेमध्ये चिकाटी यास स्वर्गा द्वारे वैयक्तिक भेटी द्वारे पुरस्कृत करण्यात आले.
तथापि, परमेश्वराकडून प्राप्त करण्यासाठी, दानीएलाला एकटेच राहावे लागले,त्याचे सामर्थ्य काढून टाकण्यात आले व त्यास असहाय्य स्थितीत ठेवण्यात आले.जेव्हा आपल्याला आपल्या स्वतःच्या शक्ति द्वारे समर्थता नसते की स्वर्गाला गवसणी घालावे किंवा आपल्या भोवतालच्या घटनांना स्पर्श करावा, आपण परमेश्वराकडून ऐकण्याच्या स्थितीत आहोत. हे आपली मानवता व आपला कमकुवतपणाचा स्वीकार जे आपल्याला त्या स्थितीत ठेवते की जिवंत परमेश्वराबरोबर वैयक्तिक भेट घ्यावी.
पौल जो प्रेषित हा एक बुद्धिमान मनुष्य होता, तरीसुद्धा तो हे रहस्य समजला की ही देवाची क्षमता जी त्याच्यामध्ये जिने ते केले जे त्याच्याद्वारे केले गेले. यात काही आश्चर्य नाही की त्याने संकटे व छळाबद्दलतक्रार केली नाही ज्यामध्ये तो सतत संघर्ष करीत राहिला परंतु याच गोष्टी केवळ त्याने परमेश्वरासाठी त्याच्या आवेगाला चालना देण्यास वापरल्या.
परमेश्वराबरोबर तुम्हाला आज वैयक्तिक भेट हवी आहे काय? परमेश्वराने तुमच्या वतीने मध्यस्थी करावी याची तुम्हाला गरज आहे काय? तुमच्या संपूर्ण अंत:करणाने त्याचा शोध करा.
त्यास हे प्रदर्शित करा की तुम्ही गंभीर आहात. ह्या जीवनाच्या दबावाला तुम्हाला देवापासून दूर नेऊ देऊ नका परंतु त्यांना त्याच्या अधिक घनिष्ठतेमध्ये येण्यास वापरा. परमेश्वराबरोबर एकटेच राहा व त्याच्यासमोर तुमची असहाय्य स्थिती स्वीकारा.
तो तुम्हाला त्याच्या सामर्थी उपस्थिती द्वारे पुरस्कृत करेल. तुमचे अश्रू हे तुमच्या चमत्कार साठी बी असतील.
प्रार्थना
पित्या, मला तुझ्याबरोबर भेट पाहिजे. मला तुझा नवीन दृष्टांत पाहिजे की मी कायमचा बदलावे. माझे साहाय्य हे तुझ्या नांवात आहे. जीवनाच्यादबावामुळे मला तुझ्यापासून दूर जाऊ देऊ नको, परंतु मला तुला अधिक प्रेमाने जडून राहू दे, येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel

Most Read
● आपल्या आध्यात्मिक सामर्थ्याचे नूतनीकरण कसे करावे -१● वातावरणावर महत्वाची समज- ४
● तो शब्द पाळ
● अभिषेकाचा एक नंबरचा शत्रू
● तुमची नवीन वाटचाल थांबविली जाऊ शकत नाही
● विश्वासाने चालणे
● वाईटपद्धतींनानष्ट करणे
टिप्पण्या