english हिंदी తెలుగు മലയാളം தமிழ் ಕನ್ನಡ Contact us आमच्याशी संपर्क साधा स्पॉटिफाय वर ऐका स्पॉटिफाय वर ऐका Download on the App StoreIOS अँप डाउनलोड करा Get it on Google Play अँड्रॉइड अँप डाउनलोड करा
 
लॉग इन
ऑनलाइन देणगी
लॉग इन
  • होम
  • कार्यक्रम
  • थेट प्रसारण
  • टी.वी.
  • नोहाट्यूब
  • स्तुती
  • बातमी
  • डेली मन्ना
  • प्रार्थना
  • अंगीकार
  • स्वप्ने
  • ई पुस्तके
  • भाष्य
  • श्रद्धांजली
  • ओएसिस
  1. होम
  2. डेली मन्ना
  3. वाईटपद्धतींनानष्ट करणे
डेली मन्ना

वाईटपद्धतींनानष्ट करणे

Thursday, 19th of September 2024
19 17 432
Categories : वाईट पॅटर्न तोडा
दाविदाच्या कारकीर्दीत लागोपाठ तीन वर्षे दुष्काळ पडला (2 शमुवेल 21:1).

दावीद हा एक नीतिमान राजा होता, देवाच्या मनासारखा मनुष्य होता आणि तरीसुद्धा त्यास दुष्काळातून जावे लागले. काही लोक असा विश्वास ठेवतात कीएकदाकी त्यांनी येशूला त्यांचा प्रभु आणि तारणारा असे स्विकारीले आहे, तर मग आता सर्वकाही सुखासुखी असेन. ते खरे नाही-ते चुकीचे शुभवर्तमान आहे. प्रभु येशूने स्पष्टपणे याकडे लक्ष वेधत हे म्हटले आहे, "जगामध्ये तुम्हाला क्लेश होतील, परंतु धीर धरा, मी जगावर विजय मिळविला आहे" (योहान 16:33).

प्रभूने एकदाही कधी असे म्हटले नाही की आपल्याला समस्यांना तोंड दयावे लागणार नाही परंतु कारण आपण येशूचे आहोत, आपल्याकडे सामर्थ्य आहे त्या समस्यांवर वर्चस्व मिळवावे.

एकदा आमच्या गटाची एक सदस्या माझ्याकडे आली हे म्हणत, "पास्टर मायकल, कृपा करून प्रार्थना करा कीमाझ्या सर्व समस्या ह्या निघून जाव्यात." मी प्रार्थना करण्यास सहमत झालो आणि हात ठेवले आणि म्हणालो, "परमेश्वरा, तिला स्वर्गात घेऊन जा." तिने ताबडतोब तिचे मस्तक माझ्या हाताखालून बाजूला केले आणि माझ्याकडे आश्चर्याने पाहिले आणि म्हणाली, "पास्टर, तुम्ही काय प्रार्थना करीत आहात?" तेव्हा मला वचन योहान 16:33 तिला स्मरण करून दयावे लागले (जे वर उल्लेखिले आहे).

आपल्याला जेव्हा ह्या जीवनात समस्या ह्या असतात, आपल्याला बारकाईने त्या समस्यांकडे पाहण्याची गरज आहे जे आपल्या जीवनात वारंवार घडत राहतात.दाविदाच्या कारकीर्दीत लागोपाठ तीन वर्षे दुष्काळ पडला होता. पवित्र शास्त्र "लागोपाठ तीन वर्षे" यावर भर देत त्याचा उल्लेख करते.

मनोरंजकपणे, दावीद यास केवळ योगायोग किंवा काही वातावरणीय समस्या असे पाहत नाही. तो यास काही घटना यापेक्षा तेअधिक आहे असे समजतो. दावीद समजला की ही वाईट पद्धत आहे.

'वाईट पद्धत' काय आहे?
जेव्हा व्यक्तीच्या जीवनात तशाच घटनेचे वारंवार घडणे होत असते; कुटुंबात, किंवा एखादया ठिकाणी, त्यास वाईट पद्धती म्हणतात. वाईट पद्धत नेहमी बालेकिल्ला बनते.

कधी तुम्ही रस्त्यावर चिन्हाचे फलक पाहिले आहे काय जेथे लिहिलेले असते, "अपघातीक्षेत्र?" काही वाहनचालक जे ह्या फलकाकडे लक्ष देतात ते प्रत्यक्षात वेग कमी करतात. जरतुम्ही काळजीपूर्वक तेथे जवळपास राहणाऱ्या स्थानिक लोकांकडे चौकशी केली तर ते तुम्हाला सांगतील की महिन्याच्या काही निश्चित दिवशी अपघात हे होत असतात. हे त्या ठिकाणी होणाऱ्या वाईट पद्धती चे स्पष्ट प्रकरण आहे.

येथे केवळ काही योगायोग नाहीत. जर तुम्ही त्यास केवळ योगायोग असे पाहाल, तर तुम्ही फसविले गेले आहात. 

सैतानाचे सामर्थ्य त्याच्या फसविण्यामध्ये लपलेले आहे. सैतान हा नेहमीच लपतो तर त्याउलट परमेश्वर नेहमीच स्वतःला प्रकट करतो. मग यात काही आश्चर्य आहे का की बायबल सैतानाला एक चोर आणि लुटारू असे म्हणते (योहान 10:10).

चला आपण व्यक्तिगत जीवनात कार्य करणाऱ्या काही वाईट पद्धतींची उदाहरणे बायबल मधून पाहू या
अब्राहम, त्याचा मुलगा इसहाक, त्याचा नातू याकोब, सर्वांच्या जीवनात वाईट पद्धती होत्या की त्यांच्या जीवनात त्यांना उशिरा मुले झाली. हे तसे होते जसे काही शत्रू काहीतरी धरून ठेवत होता आणि त्यांच्या पत्नींना गरोदर होऊ देत नव्हता. त्या सर्वांनी लेकरांना जन्म देण्यात संघर्ष केला.

प्रत्येक पीढी मध्ये खोटे बोलण्याची वाईट पद्धती:
-अब्राहम सारा बद्दल दोनदा खोटे बोलला.

-इसहाक आणि रिबेका चा विवाह हा खोटयाद्वारे चिन्हित होतो

-याकोब जवळजवळ सर्वांबरोबर खोटे बोलला; त्याच्या नावाचा अर्थ फसविणारा

-याकोबाच्या 10 भावांनी योसेफाच्या मृत्यूबद्दल खोटे बोलले

प्रत्येक पीढी मध्ये कमीत कमी एका पाल्याकडून पसंद ची वाईट पद्धती दिसते
-अब्राहाम इश्माएल ला पसंद करीत होता

-इसहाकएसाव ला पसंद करीत होता

-याकोब ने प्रथम योसेफ व नंतर बन्यामीन ला पसंद केले.

जवळच्या नातेवाईकात विभाजन किंवा त्यांपासून विभक्त होणे याची वाईट पद्धती
-इसहाक आणि इश्माएल

- याकोब त्याचा भाऊ एसाव कडून पळून गेला आणि अनेक वर्षे विभक्त राहिला

-योसेफ त्याच्या 10 भावांपासून जवळजवळ दहा वर्षे वेगळा केला गेला होता

प्रत्येक पीढी मध्ये वैवाहिक जीवनात कमकुवत संबंधाची वाईट पद्धती
- अब्राहाम ला हागार पासून विवाहबाह्य मुलगा झाला

- इसहाक चे रिबेका बरोबर संघर्षमय वैवाहिक संबंध होते 

- याकोबास2 पत्नी आणि 2 उपपत्नी होत्या

तुम्ही हा निषेध करू शकता की हे त्या जुन्या कराराच्या वेळेत झाले होते. चला मला तुम्हाला असे नवीन करारात सुद्धा दाखवू दया.

योहान 4 मध्ये येशू एका सामरी स्त्री ला याकोबाच्या विहिरीपाशी भेटतो, मग तो भविष्यात्मक तिच्या जीवनाबद्दल प्रकट करतो हे म्हणत, "तुला पाच नवरे होतें, आता जो तुझ्याबरोबर आहे तो तुझा नवरा नाही; हे तू खरे सांगितलेस." (योहान 4:18)

हे स्पष्ट आहे की ही स्त्री एक साधारण स्त्री नव्हती. मी विश्वास ठेवतो ती सुंदर स्त्री असेन आणि तरीसुद्धा तिला फार कठीण झाले होते की एक स्थायी संबंध स्थापित करावे. तिच्या जीवनात वाईट पद्धती कार्यरत होती.

वाईट पद्धती जी तुमच्या जीवनात कार्यरत आहे त्यास तुम्ही कसे नष्ट करू शकता?

1. तुमच्या जीवनात वाईट पद्धती कार्यरत आहे हे ओळखण्याची तुम्हाला गरज आहे.

हेफक्त तेव्हाच जेव्हा तुम्ही ती ओळखता तेव्हाच तुम्ही तीचा प्रभावीपणे बंदोबस्त करू शकता.

जोपर्यंत कोणी ह्या वाईट पद्धती ओळखत नाही, काही अधिक बदलणार नाही. तसेच पवित्र आत्मा जोपर्यंत कोणाचे डोळे उघडत नाही की ह्या वाईट पद्धती पाहाव्यात, तर कोणी त्याची पारख करू शकणार नाही.
प्रार्थना
पित्या, येशूच्या नांवात, माझ्या जीवनात आणि कुटुंबात कार्यरत असलेल्या वाईट पद्धतीच्या उपस्थितीची पारख करण्यासाठी माझे डोळे उघड.

Join our WhatsApp Channel


Most Read
● मार्गहीन प्रवास
● येशू द्राक्षारस (आंब) प्याला
● दुरून मागे मागे चालणे
● वचन प्राप्त करा
● देवाचा आरसा
● उदारपणाचा सापळा
● युद्धासाठी प्रशिक्षण-१
टिप्पण्या
संपर्क
फ़ोन: +91 8356956746
+91 9137395828
व्हाट्स एप: +91 8356956746
ईमेल: [email protected]
पता :
10/15, First Floor, Behind St. Roque Grotto, Kolivery Village, Kalina, Santacruz East, Mumbai, Maharashtra, 400098
आमच्या सामाजिक नेटवर्कवर सामील व्हा!
Download on the App Store
Get it on Google Play
मेलिंग यादीमध्ये सामील व्हा
अन्वेषण
कार्यक्रम
थेट प्रसारण
नोहाट्यूब
टी.वी.
देणगी
डेली मन्ना
स्तुती
अंगीकार
स्वप्ने
संपर्क
© 2025 Karuna Sadan, India.
➤
लॉग इन
कृपया या साईट वर टिपणी आणि कंमेंट करण्यासाठी आपल्या NOAH खात्यावर प्रवेश करा |
लॉग इन