डेली मन्ना
44
13
1633
अन्य भाषे मध्ये बोलणे हे आंतरिक आरोग्य आणते
Sunday, 10th of April 2022
Categories :
पवित्र आत्म्याची भेट
तो जो अन्य [अनोळखी] भाषे मध्ये बोलतो तो स्वतःचीच उन्नति व सुधारणूक करतो (१ करिंथ १४:४ ऐम्पलीफाईड).
बायबल चे ऐम्पलीफाईड भाषांतर "सुधारणूक" हा शब्द जोडते. याचा अर्थ जेव्हा तुम्ही अन्य भाषे मध्ये प्रार्थना करता, तुम्ही सुधारणूक होण्याची अपेक्षा करू शकता! देवाचा एक माणूस त्यास असे म्हणतो: तुमच्यासाठी पवित्र आत्म्याचा स्वयं-सुधारणूक कार्यक्रम! तर मग आता, येथे काही मर्यादा नाही, की तुम्ही किती सुधारणा करावी. तुमच्यावर काहीही किंवा कोणीही मर्यादा ठेवू शकत नाही.
बायबल म्हणते, "ही आमची संपत्ति मातीच्या भांडयात आहे, अशा हेतूने की, सामर्थ्याची पराकोटी देवाची आहे, आमच्यापासून होत नाही, हे समजावे." (२ करिंथ ४:७)
परमेश्वराने त्याची संपत्ति मातीच्या भांडयात [म्हणजे आपल्यात] ठेवली आहे. तथापि, संपत्ति असण्याचा काय अर्थ आहे, जर तुम्ही त्यातून घेऊ शकला नाही? तुम्ही जेव्हा अन्य भाषे मध्ये प्रार्थना करता तुम्ही ह्या संपत्ति मधून घेता व तुमचे जीवन आणखीन उत्तम करता.
आंतरिक आरोग्य प्राप्त होते जेव्हा तुम्ही अन्य भाषे मध्ये प्रार्थना करता. नेहमी, अनेक जण मला हे बोलतात की अन्य भाषे मध्ये जवळजवळ एक तास प्रार्थना केल्यावर, ते रडतात आणि त्यांना त्याचे कारण माहीत नाही का. हे याकारणासाठी की जखमा व व्रण हे बरे होतात. लक्षात ठेवा, उन्नति ही बनविणे आहे. केवळ जेव्हा तुम्ही आरोग्य प्राप्त केले आहे तेव्हाच तुम्ही ख्रिस्ताच्या शरीराला प्रत्यक्षात प्रोत्साहन देऊ शकाल.
मला आशा आहे की याने तुम्हाला प्रोत्साहन दिले असेन.
अंगीकार
येशू ख्रिस्ताच्या नांवात मी आदेश व घोषणा देतो, जेव्हा मी अन्य भाषे मध्ये प्रार्थना करतो. मी त्या संपत्ति मधून घेईन जे देवाने माझ्या आंतमध्ये जतन करून ठेवले आहे. मी माझे आरोग्य प्राप्त करीत आहे जेव्हा मी अन्य भाषे मध्ये बोलत आहे. येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel

Most Read
● तुम्ही देवाचे पुढील सोडविणारे होऊ शकता● बीज चे सामर्थ्य - ३
● भूतकाळाच्या कबरेत पडून राहू नका
● चला यहूदा ला प्रथम जाऊ दया
● एका उद्देशाने जन्म घेणे
● धार्मिकतेच्या आत्म्याला ओळखावे
● तुम्ही एक खरे उपासक आहां काय?
टिप्पण्या