डेली मन्ना
संदेष्टा अलीशा चे जीवन-आध्यात्मिक-III
Wednesday, 19th of May 2021
21
20
1573
Categories :
जीवनाचे धडे
एलीया त्यास म्हणाला, अलीशा, परमेश्वर मला यरीहोस पाठवीत आहे तर तूं येथे थांब. तो म्हणाला, परमेश्वराच्या व आपल्या जीविताची शपथ, मी आपणांला सोडावयाचा नाही; मग ते यरीहोस गेले. (२ राजे २:४)
यरीहो चे महत्त्व काय आहे?
यरीहोच्या महत्वासंबंधी सगळ्यात स्पष्ट संदर्भ हा यहोशवाचे पुस्तक अध्याय ६ मध्ये सापडतो.
इस्राएल लोकांच्या भीतीमुळे यरीहोच्या वेशी मजबूत लावून घेण्यात आल्या होत्या; कोणी बाहेर गेला नाही की आंत आला नाही. परमेश्वर यहोशवास म्हणाला, पाहा, यरीहो, त्याचा राजा व त्याचे पराक्रमी वीर मी तुझ्या हाती दिले आहेत. तुम्ही सगळे योद्धे ह्या नगराभोवती एक प्रदक्षिणा घाला. असे सहा दिवस करा. (यहोशवा ६:१-३)
यरीहो हे पहिले नगर होते जेव्हा इस्राएली लोक आश्वासित देश, कनान चा ताबा घेण्यासाठी गेले होते तेव्हा त्यांनी त्याचा ताबा घेतला होता. हे काही सहज त्यांच्या हातात आले नाही, त्यांना त्याच्यासाठी युद्ध करावे लागले होते.
ख्रिस्ती म्हणून आपण केवळ आपले शरीर व जगावर ताबा मिळवू नये परंतु आपण शत्रूबरोबर सरळपणे व्यवहार केला पाहिजे व त्याच्यावर ताबा मिळविला पाहिजे. अनेक ख्रिस्ती लोकांना शरीर व आत्म्याच्या युद्धाची जाणीव आहे; परंतु ते आध्यात्मिक युद्धा संबंधी अजाण आहेत जे आपण विश्वासणारे व अंधाराच्या शक्तीबरोबर संघर्ष करते.
प्रेषित पौल यास इफिस ६:१२ मध्ये ठळकपणे स्पष्ट करतो:
कारण आपले झगडणे [लढा] रक्तमांसाबरोबर नव्हे [शत्रू] , तर सत्तांबरोबर, अधिकाऱ्यांबरोबर, सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपतींबरोबर, आकाशातल्या दुरात्म्यांबरोबर [दुष्ट आत्मे] आहे. (इफिस ६:१२)
शत्रूला ठाऊक आहे की त्याची वेळ ही थोडी आहे आणि त्यास त्याच्या कुटील योजना पूर्ण करण्यापासून काय थांबविते ते देवाची लेकरे आहेत आणि म्हणून तो प्रयत्न करतो व त्याच्याकडून शक्य त्या गोष्टी करतो की त्यांच्यावर त्याच्या दुष्ट आत्म्याद्वारे आक्रमण करावे.
ख्रिस्ती लोक असे आक्रमण नेहमी त्यांच्या वातावरणावर (ठिकाणे जेथे ते राहतात किंवा काम करतात) पाहतात, कधी कधी त्यांच्या शारीरिक शरीरावर आजार किंवा अपघात द्वारे. काही ख्रिस्ती त्यांचे विचार व भावना मध्ये दुर्व्यसनी आक्रमणास तोंड देतात जे त्यांच्या नातेसंबंधात गोंधळ निर्माण करते. काही ख्रिस्ती त्यांच्या आध्यात्मिक जीवनात अशा दुर्व्यसनी आक्रमणास तोंड देतात जे त्यांस परमेश्वराची प्रभावीपणे सेवा करण्यापासून अडथळा करते.
अनेक जण हे सरळपणे हे समजत नाही की सर्व काही व सर्व जण का त्यांच्या विरोधात आहेत, जे त्यांच्या जीवनात भयानक संभ्रम व निराशा निर्माण करतात. अनेक वेळेला, काही जण यास केवळ स्वाभाविक घटना आहेत असे पाहतात, हे जाणत नाही की अंधाराच्या शक्तीद्वारे अद्भूतपणे त्यांना पिडीत केले जात आहे.
येथे एक पत्र आहे एका ख्रिस्ती आई कडून जी फारच हताश झालेली होती. "पास्टर, मी माझ्या मुला बरोबर हताश झाले आहे.
मी सर्व काही प्रयत्न केले आहे. विश्वासा विषयी मी त्याच्याबरोबर चर्चा केली आहे. त्याने बायबल वाचावे व प्रार्थना करावी म्हणून मी प्रयत्न केला आहे. ख्रिस्ती विडीओ व संदेश मी त्यास दिले आहेत. मी त्याच्याबरोबर अधिक चांगले राहण्याचा प्रयत्न केला आहे परंतु असे दिसते की मी काहीही करू शकलेले नाही. हे जसे काही, मी भिंती पर्यंत आलेले आहे. तुम्ही माझी मदत करू शकाल काय?"
मला तुम्हाला सांगू दया, अशा प्रकारचे युद्ध हे तुम्ही तुमचे तर्क, बुद्धिमत्ता किंवा पटवून सांगण्याद्वारे जिंकू शकत नाही. हे वेगळ्या प्रकारचे युद्ध आहे-आध्यात्मिक युद्ध. ह्या आध्यात्मिक युद्धात, ज्या भिंतीला तुम्ही तोंड देत आहात त्यास तुमच्यावर वर्चस्व करू देऊ नका.
आध्यात्मिकदृष्टया प्रगती करण्यासाठी, एका ख्रिस्ती व्यक्तीला शत्रूच्या कामावर सुद्धा वर्चस्व केले पाहिजे.
कसे? यहोशवा ६ मध्ये तीन रत्ने लपलेली आहेत:
ते दुसऱ्या दिवशीही नगराला एक प्रदक्षिणा घालून छावणीत परत आले; असे त्यांनी सहा दिवस केले. सातव्या दिवशी अगदी पहाटेस उठून त्यांनी अशाच प्रकारे त्या नगराला सात प्रदक्षिणा घातल्या; त्या दिवशी मात्र त्यांनी त्या नगराला सात प्रदक्षिणा घातल्या. (यहोशवा ६:१४-१५)
१. पुढे जात राहा: ही दररोजची जीवनाची शिस्त आहे. धैर्य सोडू नका. आठवड्याच्या सात दिवसाच्या सात वेळा.
यहोशवा मोठया पहाटेस उठला आणि याजकांनी परमेश्वराचा कोश उचलून घेतला. सात याजक रणशिंगे घेऊन परमेश्वराच्या कोशापुढे ती एकसारखी फुंकीत निघाले आणि सशस्त्र लोक त्यांच्यापुढे चालले; रणशिंगे फुंकली जात असतांना पीछाडीचे लोक परमेश्वराच्या कोशामागे चालत होते. (यहोशवा ६:१२-१३)
२. रणशिंग: ते म्हणजे घोषणा देणे. तुम्ही विजय पाहण्याअगोदर तो साजरा करण्यासारखे हे आहे. दुष्ट बालेकिल्ले ज्याचा तुम्ही सामना करीत आहात त्याचा पहिला दगड सुद्धा पडण्याअगोदर विजय साजरे करणे आहे.
तुम्ही नियमितपणे घोषणा देत राहिले पाहिजे. जगात जो आहे त्याच्यापेक्षा तुम्हांत जो आहे तो मोठा आहे. "ख्रिस्ता द्वारे मी सर्व काही करू शकतो जो मला सामर्थ्य देतो." "त्यास बसलेल्या फटक्यांनी मला आरोग्य मिळाले आहे." "येशू ख्रिस्ता द्वारे मी विजय मिळविणाऱ्यापेक्षा मोठा आहे." "परमेश्वर सर्व परिस्थिती मध्ये मला विजयाचे आश्वासन देतो."येशूच्या ठायी गौरवाच्या द्वारे परमेश्वराच्या संपत्यनुरूप माझ्या सर्व गरजांची पूर्तता झाली आहे."
(१ योहान ४:४; फिलिप्पै. ४:१३; १ पेत्र २:२४; रोम. ८:३७; २ करिंथ २:१४; फिलिप्पै. ४:१९)
यरीहोच्या ठिकाणी, तुम्ही वेगळ्या प्रकारे बोलू लागता. तुम्ही समस्या विषयी बोलत नाही, तुम्ही उपाय ची घोषणा करता. तुम्ही शेवटास सुरुवातीपासून घोषित करता.
सातव्या वेळी याजक रणशिंगे फुंकीत असतांना यहोशवा लोकांना म्हणाला, जयघोष करा, कारण परमेश्वराने हे नगर तुमच्या हाती दिले आहे. (यहोशवा ६:१६)
३. जयघोष करा: ती उपासना आहे. आत्म्या व सत्या मध्ये केलेल्या उपासने पेक्षा असे दुसरे काहीही नाही जे अंधाराला त्वरित बाजूला करते.
जर तुम्ही अगोदरच यरीहो मध्ये असाल, तर ती मोठी गोष्ट आहे. जर नाही, तर तुम्हाला गिलगाल ला जाण्याची गरज आहे आणि मग बेथेल ला जावे लागेल. आणि मग तेथून यरीहो ला यावे. जेव्हा तुम्ही यरीहोस याल, तुम्ही आत्म्या मध्ये योद्धे झालेले असाल.
राजाला गौरव असो!
प्रार्थना
(कृपा करून कमीत कमी ५ मिनिटासाठी प्रत्येक प्रार्थना मुद्द्यांवर प्रार्थना करा.)
हे परमेश्वरा, मला विरोध करणाऱ्यांना विरोध कर; माझ्याबरोबर लढणाऱ्यांशी लढ. (स्तोत्र ३५:१)
हे माझा देवा, माझ्या वैऱ्यांपासून मला सोडीव. जे माझ्यावर उठतात त्यांच्यापासून मला वाचीव. दुष्कर्म करणाऱ्यांपासून मला सोडीव. (स्तोत्र ५९:१-२)
माझे जीवन व माझ्या कुटुंबावर त्याच्या दैवी संरक्षा साठी देवाला गौरव असो. तुझ्यावर चालविण्याकरिता घडिलेले कोणतेही हत्त्यार तुजवर चालणार नाही; तुजवर आरोप ठेवणाऱ्या सर्व जिव्हांना तूं दोषी ठरविशील. परमेश्वराच्या सेवकांचे हेच वतन आहे, हीच मजकडून मिळालेली त्यांची धार्मिकता आहे, असे परमेश्वर म्हणतो. (यशया ५४:१७)
Join our WhatsApp Channel
Most Read
● मानवी स्वभाव● तुमच्या घरातील वातावरण बदलणे-४
● कृपेचे प्रगट होणे
● तुम्ही एक खरे उपासक आहां काय?
● आध्यात्मिकदृष्टया तुम्ही योग्य आहात काय?
● शेवटच्या समयाचे गुपित: भविष्यात्मक पहारेकरी
● देवाचे 7 आत्मे: परमेश्वराचा आत्मा
टिप्पण्या