हे परमेश्वरा, असे होवो की तुझ्या इच्छे प्रमाणे होवो
"तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छे प्रमाणे होवो." (मत्तय ६:१०)
आपण जेव्हा देवाची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून प्रार्थना करतो, आपण अप्रत्यक्षपणे त्यास मागणी करीत आहोत की त्याचे राज्य स्थापन करावे व आपल्या जीवनासाठी त्याच्या सिद्ध योजना पूर्ण कराव्यात.
आपला दृष्टीकोन बदलतो जेव्हा आपण देवाची इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करतो. त्याची इच्छा आपोआप आपल्या गरजा पूर्ण करतात, म्हणून आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करण्याची गरज नाही. आपला, "स्वयं" स्वार्थ आणि व्यर्थ गौरव हे वधस्तंभावर खिळिले जातात जेव्हा आपण देवाची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून प्रार्थना करतो.
देवाने कार्यरत होण्याअगोदर पृथ्वीवरील क्षेत्रामध्ये देवाची इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करण्याची गरज आहे. जर आपली प्रार्थना देवाला आमंत्रित करीत नाही, तर तो पाऊल उचलणार नाही.
देवाची इच्छा जाणण्याची आपल्याला का गरज आहे?
१. जर तुम्हांला देवाची इच्छा ठाऊक नसेल, तर देवाच्या इच्छेनुसार प्रार्थना करणे हे कठीण होईल.
२ राजे ४:३३-३५ मध्ये, एलीया संदेष्टा व स्त्रीला ठाऊक होते की ही देवाची इच्छा नाही की मुलाला अकाली मरण यावे, म्हणून, एलीया संदेष्ट्याने कळकळीने प्रार्थना केली जोपर्यंत मुलाला जीवन पुन्हा मिळत नाही. देवाच्या इच्छेविषयी जेव्हा तुम्ही अज्ञानी असता, तेव्हा जीवन जे काही देत आहे ते तुम्ही स्वीकाराल.
२. जर तुम्हांला देवाची इच्छा ठाऊक नसेल, तर जेव्हा तुम्ही पापाच्या परीक्षेत पडाल तेव्हा तुम्ही अपयशी होऊ शकता.
मत्तय ४:१-११ मध्ये, येशूने सैतानाच्या परीक्षेवर वर्चस्व प्राप्त केले कारण तो देवाची इच्छा पूर्णपणे समजला होता. काही क्षणी, सैतानाने देवाच्या वचनाचे चुकीचे भाषांतर केले होते, परंतु येशूने त्याचा प्रतिकार केला. जर तुम्हांला देवाची इच्छा ठाऊक नसेल, तर सैतान तुमच्या जीवनात खेळ खेळेल आणि तुम्हांला सापळ्यात अडकवेल.
३. आपली सुरक्षितता, आशीर्वाद आणि संपत्ति ही देवाच्या इच्छेमध्ये आहे.
जर आपण देवाच्या इच्छेसंबंधी अज्ञानी आहोत, तर सैतान आपला फायदा घेऊ शकतो.
"प्रिय बंधो, जसा तुझा आत्मा सुस्थितीत आहे तसे तुला सर्व गोष्टीत सुस्थिति व आरोग्य असावे, अशी मी प्रार्थना करितो" (३ योहान २). काही लोक विचार करतात की आजार हा त्यांच्या जीवनासाठी देवाच्या इच्छेचा भाग आहे. काही विचार करतात की कदाचित देवाची ही इच्छा आहे की त्यांनी गरिबीद्वारे विनम्र जीवन व्यतीत करावे. सैतानाच्या व्यथेचा स्वीकार करण्यात त्यांची फसवणूक झाली आहे. ही वेळ आहे की तुमच्या जीवनासाठी काहीही जे देवाच्या इच्छेपेक्षा कमी आहे त्याचा प्रतिकार करावा.
४. आपण केवळ तेव्हाच देवाच्या आज्ञेमध्ये राहू शकतो जेव्हा ती आपल्याला ठाऊक आहे.
जर आपण देवाच्या इच्छेविषयी अज्ञानी आहोत, तर आपण आपोआपच त्या गोष्टी करू ज्या त्याच्या इच्छेविरुद्ध आहेत.
"ह्यावरून मी म्हणालो, पाहा, हे देवा, ग्रंथपटात माझ्याविषयी लिहून ठेविले आहे, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी मी आलो आहे." (इब्री. १०:७)
५. जेव्हाकेव्हा आपण देवाच्या इच्छेप्रमाणे चालत नाही, तेव्हा सैतान आपल्यावर हल्ला करण्यास सज्ज होतो.
ना ही सैतानाला स्थान देऊ नये. (इफिस. ४:२७)
६. सैतान आपल्यावर दोष लावतो जेव्हा आपण देवाच्या इच्छेबाहेर जीवन जगत असतो.
"तेव्हा मुख्य याजक यहोशवा हा परमेश्वराच्या दिव्यदूतासमोर उभा आहे व त्याचा विरोध करण्यासाठी सैतान त्याच्या उजवीकडे उभा आहे, असे त्याने मला दाखविले." (जखऱ्या ३:१)
७. परमेश्वर त्याच्या इच्छेच्या बाहेर काही करू शकत नाही.
"तुम्ही मागता परंतु तुम्हांस मिळत नाही; कारण तुम्ही अयोग्य प्रकारे मागता, म्हणजे आपल्या चैनीकारिता खर्चावे म्हणून मागता" (याकोब ४:३). आपण उत्तर प्राप्त करू शकत नाही जेव्हा आपल्या प्रार्थना या देवाच्या इच्छेबाहेर असतात.
८. देवाच्या इच्छेबाहेर असणाऱ्या नियतीस आपण पूर्ण करू शकत नाही.
४ तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुम्हांमध्ये राहीन. जसे फाटा वेलात राहिल्यावाचून त्याला आपल्याआपण फळ देता येत नाही तसे माझ्यामध्ये राहिल्यावाचून तुम्हांलाही देता येणार नाही. ५ मीच वेल आहे, तुम्ही फाटे आहा; जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो, कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हांला काही करिता येत नाही. ६ कोणी माझ्यामध्ये राहिला नाही तर त्याला फाट्याप्रमाणे बाहेर टाकतात व तो वाळून जातो; आणि तसले फाटे गोळा करून अग्नीत टाकतात व ते जळून जातात. ७ तुम्ही माझ्यामध्ये राहिला व माझी वचने तुम्हांमध्ये राहिली तर जे काही तुम्हांला पाहिजे असेल ते मागा म्हणजे ते तुम्हांला प्राप्त होईल." (योहान १५:४-७)
तुमच्या जीवनासाठी देवाची इच्छा आणि योजना जाणण्यासाठी 2 मुख्य किल्ल्या
तुम्ही देवाबरोबर तुमचे संबंध जोपासले पाहिजे. तुम्ही त्यास ओळखण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि केवळ त्याच्याविषयी माहिती घेण्याचा नाही.
त्याच्या वचनामध्ये वेळ घालवून, प्रार्थनेसाठी वेळ काढणे, आणि प्रत्येक संधीचा उपयोग करावा की मंडळीमध्ये कार्यरत व्हावे आणि जे-१२ पुढाऱ्याच्या अधिनतेमध्ये व्हावे इत्यादी गोष्टी करण्याद्वारे तुम्ही ते संबंध उत्तम असे बनवू शकता. जेव्हा तुम्ही तुमच्या जीवनात या शिस्तीला लागू करण्याकडे लक्ष देता, परमेश्वर प्रथम पाऊल उचलण्यास सुरुवात करील की तुम्हांला त्याच्या योजना प्रगट कराव्यात.
"तूं आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको; तूं आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल." (नीतिसूत्रे ३:५-६)
- देवाची इच्छा काय आहे हे जे तुम्हांला अगोदरच ठाऊक आहे त्याचे पालन करा.
अनेक लोकांना त्यांच्या जीवनासाठी देवाची इच्छा काय आहे हे जाणून घेण्याची इच्छा दिसते, परंतु ते या वास्तविकतेकडे दुर्लक्ष करतात की त्याच्या इच्छेच्या ९८ टक्के हे त्याच्या वचनाद्वारे अगोदरच काळजीपूर्वक प्रगट केले गेलेले आहे. परमेश्वर हा त्याच्या इच्छेच्या अधिक आणि अधिक स्वरुपांविषयी अगदी स्पष्ट आहे. उदाहरणार्थ, ही स्पष्टपणे त्याची योजना आहे की आपण लैंगिक अनैतिकतेपासून दूर राहावे.
"कारण देवाची इच्छा ही आहे की, तुमचे पवित्रीकरण व्हावे, म्हणजे तुम्ही जारकर्मापासून स्वतःला अलिप्त ठेवावे." (२ थेस्सलनीका. ४:३)
जर आपण त्या गोष्टी पाळल्या नाहीत ज्या देवाने स्पष्टपणे दाखविल्या आहेत कि ही त्याची इच्छा आहे, तर आपण असा विचार कसा करू शकतो की त्याने आपल्या जीवनाविषयी त्याच्या योजनेसंबंधी पुढील माहिती प्रगट करावी?
१. पित्या, येशूच्या नावात असे होवो की तुझी इच्छा माझ्या जीवनात पूर्ण होवो.
२. काहीही जे माझ्या स्वर्गीय पित्याने माझ्या जीवनात पेरलेले नाही ते येशूच्या नावात अग्निद्वारे नष्ट केले जावे.
३. देवाची इच्छा माझ्यासाठी ही संपन्न होण्याची आहे; त्यामुळे येशूच्या नावात मी माझ्या जीवनात अपयश, नुकसान, आणि उशीर होण्याच्या कार्यास प्रतिबंधित करतो.
४. देवाची इच्छा माझ्यासाठी ही चांगल्या आरोग्यात असावे ही आहे; त्यामुळे माझ्या शरीरात आजार व रोगाची कोणतीही लागण यास मी येशूच्या नावात नष्ट करीत आहे.
५. देवाची इच्छा माझ्यासाठी ही उसने देणारा अशी आहे, उसणे घेणारा असे नाही; त्यामुळे मला कर्जात टाकण्याच्या सैतानी योजनेस मी येशूच्या नावात नष्ट करीत आहे.
६. येशूच्या रक्ताने, असे होवो की कोणताही नियम जो माझ्याविरुद्ध आहे तो येशूच्या नावात वधस्तंभावर खिळीला जावो.
७. कोणतेही मंत्र, चेटूक, शाप आणि दुष्टता जे माझ्या विरोधात केले गेले आहे त्यास येशूच्या नावात मी विखरून टाकीत आहे.
८. मी आदेश देत आहे की माझ्या जीवनापासून वाईट, मरण, लाज, नुकसान, यातना, नकार आणि उशीर हा येशूच्या नावात काढून टाकला जावो.
९. कोणतेही शस्त्र जे माझ्याविरोधात बनविले गेले आहे ते फलदायक होणार नाही, आणि येशूच्या नावात मी कोणत्याही बोलण्याचा धिक्कार करतो जे माझ्या विरोधात उठले आहेत.
१०. हे परमेश्वरा, मला समर्थ कर की येशूच्या नावात तुझी आज्ञा पाळावी आणि पृथ्वीवर तुझे राज्य वाढवावे.