english हिंदी తెలుగు മലയാളം தமிழ் ಕನ್ನಡ Contact us आमच्याशी संपर्क साधा स्पॉटिफाय वर ऐका स्पॉटिफाय वर ऐका Download on the App StoreIOS अँप डाउनलोड करा Get it on Google Play अँड्रॉइड अँप डाउनलोड करा
 
लॉग इन
ऑनलाइन देणगी
लॉग इन
  • होम
  • कार्यक्रम
  • थेट प्रसारण
  • टी.वी.
  • नोहाट्यूब
  • स्तुती
  • बातमी
  • डेली मन्ना
  • प्रार्थना
  • अंगीकार
  • स्वप्ने
  • ई पुस्तके
  • भाष्य
  • श्रद्धांजली
  • ओएसिस
  1. होम
  2. डेली मन्ना
  3. दिवस १३ : २१ दिवस उपास व प्रार्थनेचे
डेली मन्ना

दिवस १३ : २१ दिवस उपास व प्रार्थनेचे

Saturday, 24th of December 2022
29 20 768
Categories : उपास व प्रार्थना

आपले चर्च तयार करा

"आणखी मी तुला सांगतो, तूं पेत्र आहेस आणि हया खडकावर मी आपली मंडळी रचीन व तिच्यापुढे अधोलोकाच्या द्वारांचे काहीच चालणार नाही." (मत्तय १६:१८)

चर्च हे विश्वासणाऱ्यांचा समूह आहे, जे बोलाविले गेलेले आहेत. अनेकांना चर्चची मर्यादित समज आहे, आणि त्यांनी चर्चला केवळ एक इमारत इतकेच मर्यादित केले आहे. इमारत ही चर्च पेक्षा वेगळी आहे. कधीही असा विचार करू नका की उपासनेचे भौतिक ठिकाण हे खरे चर्च आहे.

चर्च साठी ग्रीक शब्द हा "एक्लेसिया" आहे, याचा अर्थ बोलाविलेल्या लोकांचा समूह असा आहे. आपण देवाचे उद्धारित लोक आहोत, ज्यांस अंधकारातून काढून त्याच्या अद्भुत प्रकाशात आणलेले आहे. (१ पेत्र २:९)

विश्वासणारे हे चर्च मध्ये आहेत आणि चर्च हे पृथ्वीवर ख्रिस्ताचे शरीर आहे. विभिन्न सिद्धातांनी ख्रिस्ती लोकांना विभिन्न पंथामध्ये विभागले आहे. "विश्वासणारे" म्हणून एकत्र होण्याऐवजी, प्रत्येक जण ख्रिस्ताची पर्वा न करता त्यांच्या पंथांच्या महत्वाचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करीत आहे. "विश्वासणारे" म्हणून आपल्याला ऐक्यतेमध्ये येण्याची, आणि प्रार्थनेची गरज आहे जर ख्रिस्ती लोकांनी एकत्र यावयाचे आहे.

पृथ्वीवरील क्षेत्रात आपण देवाचे पायी चालणारे सैनिक आहोत आणि आपल्या राष्ट्रासाठी धोरणात्मक प्रार्थना केली पाहिजे जेणेकरून परमेश्वर त्याचे चर्च तयार करण्यासाठी त्याची इच्छा पूर्ण करू शकेल. देवाला जे काही करायचे आहे त्यासाठी प्रार्थना केली पाहिजे. आपली प्रार्थना हीच त्यास जे करायचे आहे ते करण्याचा त्यास पार्थिव क्षेत्रात कायदेशीर अधिकार देते.

जेव्हा ख्रिस्ती लोक ऐक्यतेमध्ये असतात, तेव्हा अंधाराचे राज्य अनेकांच्या जीवनावरील अधिकार गमावेल, आणि आपले राष्ट्र हे परिवर्तीत होईल. आपल्या शाळा, राजनीतिक, आरोग्य काळजी, सेना, शिक्षण, व्यवसाय, प्रसार माध्यमे आणि कुटुंब हे या परिवर्तनाचा आनंद घेतील.

चर्चला दोन प्रकारांमध्ये वर्गीकरण केले जाऊ शकते:
१. सार्वत्रिक चर्च 
सार्वत्रिक चर्च मध्ये प्रत्येक राष्ट्रांतील सर्व विश्वासणारे लोक आहेत.

२. स्थानिक चर्च
स्थानिक चर्च हे भौगोलिक स्थानातील लोकांचा (विश्वासू) समूह आहे जे उपासना, प्रार्थना, संगती आणि देवासंबंधी शिकण्यासाठी एकत्र येतात.

चर्चला पुढील शब्दांनी देखील संबोधले जाऊ शकते जसे
१. देवाचे घर (१ तीमथ्य ३:१५)

२. ख्रिस्ताची वधू (प्रकटीकरण १९:६-९; २१:२; २ करिंथ ११:२)

३. ख्रिस्ताचे शरीर (इफिस. १:२२-२३)

४. देवाचे मंदिर (१ पेत्र २:५; इफिस. २:१९-२२)

चर्चच्या जबाबदाऱ्या
चर्चच्या जबाबदाऱ्या हया धार्मिक उपासनेपुरत्या मर्यादित नाहीत; त्यापेक्षा अधिक आपल्याला आपल्या समाजावर प्रभाव करावयाचा आहे. तर मग, चर्चच्या काही जबाबदाऱ्या काय आहेत?

  • उपासना
"स्तोत्रे, गीतें व आध्यात्मिक प्रबंध ही एकमेकांना म्हणून दाखवा; आपल्या अंत:करणात प्रभूला गायनवादन करा." (इफिस. ५:१९)

  • प्रभाव
आपण जबरदस्तीने नव्हे तर आपल्या समाजासमोर योग्य उदाहरणे मांडून प्रभाव पाडावयाचा आहे.
१४ "कोणी तुझ्या तारुण्याला तुच्छ मानू नये; तर भाषण, वर्तन, प्रीति, विश्वास व शुद्धता ह्यांविषयी विश्वास ठेवणाऱ्यांचा कित्ता हो." (१ तीमथ्य ४:१२)
"तुम्ही जगाचा प्रकाश आहा; डोंगरावर वसलेले नगर लपू शकत नाही. १५ दिवा लावून मापाखाली ठेवीत नसतात, दिवठणीवर ठेवतात म्हणजे तो घरातल्या सर्वांना प्रकाश देतो; १६ त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू दया की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे." (मत्तय ५:१४-१६)   

  • जीवने परिवर्तीत करणे
आपल्याला लोकांना अंधाराच्या राज्यातून प्रकाशाच्या राज्यात आणावयाचे आहे. आपल्याला ख्रिस्ताची सुवार्ता आणि देवाच्या राज्याची साक्ष लोकांना द्यावयाची आहे. शुभवर्तमानामध्ये सामर्थ्य आहे की लोकांची जीवने परिवर्तीत करावीत.

"कारण मला सुवार्तेची लाज वाटत नाही; कारण विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला-प्रथम यहूद्याला मग हेल्लेण्याला-तारणासाठी ती देवाचे सामर्थ्य आहे." (रोम. १:१६)

  • वाईटाच्या कृत्यांना नष्ट करणे
आपल्याला लोकांच्या जीवनातील सैतानाच्या कृत्यांना बांधणे, मोकळे करणे आणि नष्ट करावयाचे आहे. आपल्या समाजाला, परमेश्वर, आरोग्य, सुरक्षितता, सुटका आणि साहाय्याची गरज आहे. जर आपण खिंडीत उभे राहिलो नाही, तर अविश्वासी लोक त्यांच्या जीवनात सैतान जे काही करत आहे त्याचा प्रतिकार करू शकणार नाहीत.
"पाप करणारा सैतानाचा आहे; कारण सैतान प्रारंभापासून पाप करीत आहे, सैतानाची कृत्ये नष्ट करण्यासाठीच देवाचा पुत्र प्रगट झाला." (१ योहान ३:८)

  • मध्यस्थी
राजे आणि जे अधिकारात आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यास आपल्याला सुचना दिली आहे. ते सैतानाचे प्रमुख लक्ष्य आहेत. जर ते जे अधिकारात आहेत त्यांना तो ताब्यात घेऊ शकला; तर तो त्यांना चुकीचे कायदे करायला लावू शकतो ज्यामुळे विश्वासणारे व पृथ्वीवरील देवाच्या राज्यावर परिणाम होईल. आपल्या प्रार्थना त्यांना संरक्षित करतात आणि याची खात्री देखील करतात की त्यांनी राष्ट्रामध्ये आणि चर्चसाठी देवाची इच्छा पूर्ण करावी.

"तर सर्वात प्रथम हा बोध मी करितो की, सर्व माणसांसाठी विनंत्या, व स्वस्थपणाचे असे आयुष्यक्रमण करावे. हे आपला तारणारा देव ह्याच्या दृष्टीने चांगले व स्वीकारावयास योग्य आहे. त्याची अशी इच्छा आहे की, सर्व माणसांचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोहचावे." (१ तीमथ्य २: १-४)

  • प्रितीमध्ये चाला
आपल्याला अविश्वासणाऱ्यांप्रती प्रितीमध्ये चालावयाचे आहे. आपल्याकडे जे आहे, ते त्यांच्याकडे नाही, देवाची प्रीति. देवाची प्रीति जितकी अधिक आपण त्यांना दाखवितो, तितकेच अधिक ते देवाकडे आकर्षिले जातील.

प्रीतीने भरलेले जीवन जगा, ख्रिस्ताच्या आदर्शाचे अनुसरण करा. त्याने आपल्यावर प्रीति केली आणि देवाला सुवास मिळावा म्हणून स्वतःला आपल्याकरिता अर्पण व यज्ञ म्हणून दिले. (इफिस. ५:२)

  • अधिकार
चर्चकडे अधिकार आहे की पृथ्वीवर देवाचे राज्य स्थापित करावे आणि वाढवावे.
"पाहा, मी तुम्हांला साप आणि विंचू ह्यांना तुडविण्याचा व शत्रूच्या सर्व शक्तीवरचा अधिकार दिला आहे, तुम्हांला काहीएक बाधणार नाही." (लूक १०:१९)

विश्वासणारे म्हणून, आपण आपल्या राष्ट्राकरिता प्रार्थना करण्याची जबाबदारी घेतली पाहिजे.
आपल्या राष्ट्राची शांति व प्रगती आपल्या स्वतःच्या शांति व प्रगतीकडे नेईल.

नरकाची द्वारे तिच्या आवाक्यात असलेल्या प्रत्येक मार्गाने चर्चशी भांडत आहेत, परंतु आपण प्रभूमध्ये आणि त्याच्या शक्तीच्या सामर्थ्यात मजबूत असले पाहिजे आणि विश्वासाची चांगली लढाई लढली पाहिजे.
पुढील अभ्यासासाठी: इफिस. १:२२-२३; १ करिंथ. १२:१२-२७
प्रार्थना
आपल्या अंत:करणातून येईपर्यंत प्रत्येक प्रार्थना अस्त्र वारंवार म्हणत राहा, त्यानंतरच पुढील प्रार्थना अस्त्राकडे वळा. (ते वारंवार म्हणा, त्यास व्यक्तिगत करा, आणि प्रत्येक प्रार्थना मुद्द्यासह हे किमान १ मिनिटे करा.)

१. पित्या, येशूच्या नावाने तुझे चर्च भारतात तयार कर.

२. पित्या, येशूच्या नावाने मला ओझे दे की या राष्ट्रासाठी प्रार्थना करावी.

३. मी माझ्या विश्वासाला इतर ख्रिस्ती लोकांबरोबर जुळवितो, आणि येशूच्या नावाने आम्ही या शहरावर व राष्ट्रावरील अंधाराच्या बालेकिल्ल्यांना कमकुवत करतो.

४. हे परमेश्वरा, भारतातील चर्चवर तुझ्या प्रीतीचा वर्षाव कर, जेणेकरून येशूच्या नावाने पृथ्वीवर तुझ्या राज्याच्या प्रगतीसाठी एकत्र यावे व मिळून कार्य करावे.

५. या शहरावर व राष्ट्रावर, येशूच्या नावाने आम्ही ख्रिस्तासाठी नवीन प्रदेशांचा दावा करितो. 

६. ईश्वरीय सिद्धांत, मुल्ये आणि चर्चच्या विरोधातील कोणतेही कायदे, येशूच्या नावाने ते उलट व्हावेत.

७. येशूच्या नावाने आमच्या शहरावर व राष्ट्रावर आम्ही देवाची शांति मोकळी करीत आहोत.

८. पित्या, येशूच्या नावाने आमच्या शहरात व राष्ट्रात तुझी इच्छा पूर्ण होवो.

९. पित्या, मी प्रार्थना करतो की पास्टर मायकल, त्यांचे कुटुंबीय व त्यांचा संघ यांना येशूच्या नावाने सर्व परिस्थितीत व सर्व समयी तूं देवाचे वचन घोषित करण्यास धैर्य आणि सामर्थ्य दे.

१०. पित्या, येशूच्या नावाने, मी विनंती करितो की सामर्थ्यशाली चिन्हे, अद्भुते आणि चमत्कार जे मानवी ज्ञान व समज चकित करतील आणि वैज्ञानिक जगाला स्तब्ध करतील ती करुणा सदन चर्च सभांमध्ये घडावी.

११. पित्या, येशूच्या नावाने, मी प्रार्थना करतो की पास्टर मायकल, त्यांचे कुटुंबीय व त्यांचा संघ यांना अलौकिक बुद्धि, समज आणि ज्ञानाने आशीर्वादित कर की कार्यक्रम व उपक्रमांना निर्माण करावेत जे पुनरुज्जीवन व चर्चच्या वाढीसाठी उत्प्रेरक आहेत.

Join our WhatsApp Channel


Most Read
● कोणीही आवडता नाही परंतु घनिष्ठ
● शेवटच्या समयाचे गुपित: भविष्यात्मक पहारेकरी
● विचलित होण्याच्या वाऱ्यामध्ये स्थिर
● तुम्ही अजूनही का थांबून आहात?
● आमचे नको
● वाईट प्रवृत्ति पासून सुटका
● स्वयं-गौरवाचा सापळा
टिप्पण्या
संपर्क
फ़ोन: +91 8356956746
+91 9137395828
व्हाट्स एप: +91 8356956746
ईमेल: [email protected]
पता :
10/15, First Floor, Behind St. Roque Grotto, Kolivery Village, Kalina, Santacruz East, Mumbai, Maharashtra, 400098
आमच्या सामाजिक नेटवर्कवर सामील व्हा!
Download on the App Store
Get it on Google Play
मेलिंग यादीमध्ये सामील व्हा
अन्वेषण
कार्यक्रम
थेट प्रसारण
नोहाट्यूब
टी.वी.
देणगी
डेली मन्ना
स्तुती
अंगीकार
स्वप्ने
संपर्क
© 2025 Karuna Sadan, India.
➤
लॉग इन
कृपया या साईट वर टिपणी आणि कंमेंट करण्यासाठी आपल्या NOAH खात्यावर प्रवेश करा |
लॉग इन