english हिंदी తెలుగు മലയാളം தமிழ் ಕನ್ನಡ Contact us आमच्याशी संपर्क साधा स्पॉटिफाय वर ऐका स्पॉटिफाय वर ऐका Download on the App StoreIOS अँप डाउनलोड करा Get it on Google Play अँड्रॉइड अँप डाउनलोड करा
 
लॉग इन
ऑनलाइन देणगी
लॉग इन
  • होम
  • कार्यक्रम
  • थेट प्रसारण
  • टी.वी.
  • नोहाट्यूब
  • स्तुती
  • बातमी
  • डेली मन्ना
  • प्रार्थना
  • अंगीकार
  • स्वप्ने
  • ई पुस्तके
  • भाष्य
  • श्रद्धांजली
  • ओएसिस
  1. होम
  2. डेली मन्ना
  3. दिवस १४ : २१ दिवस उपास व प्रार्थनेचे
डेली मन्ना

दिवस १४ : २१ दिवस उपास व प्रार्थनेचे

Sunday, 25th of December 2022
25 25 762
Categories : उपास व प्रार्थना

मजवर कृपा करण्यात येईल

"आणि या लोकांवर मिसरी लोकांची कृपादृष्टि होईल असे मी करीन; म्हणून तुम्ही निघाल तेव्हा रिकाम्या हाताने निघणार नाही." (निर्गम ३:२१)

कृपा ही देवाने मनुष्यावर आणि मनुष्याने मनुष्यावर दाखवलेली दयाळू कृती आहे. आपल्या सर्वांना इतरांकडून चांगल्या गोष्टी आणि दया हवी असते. मनुष्य हे आशीर्वादाचे माध्यम आहेत, तर परमेश्वर हा आशीर्वाद आणि कृपेचा स्त्रोत आहे. जेव्हा देव मनुष्यावर कृपा करतो, लोक त्याजवर कृपा करू लागतात. या दिवसासाठी पवित्रशास्त्रातील आपल्यासाठी वचन, पवित्रशास्त्र प्रगट करते की हा परमेश्वर आहे जो लोकांना कृपा देतो: "मी आपल्या लोकांवर कृपा करीन..... ." आज, मला देवाच्या कृपेसाठी रडायचे आहे. देव कोणालाही तुमच्यावर कृपा करण्यास कारणीभूत करू शकतो; मित्र किंवा लोक जे तुम्हांस ठाऊक आहेत तितक्यांसाठीच हे मर्यादित नाही. परमेश्वर एखादया अनोळखी मनुष्याला किंवा शत्रूचा देखील उपयोग करू शकतो की तुमच्यावर कृपा करावी. मी तुमच्या जीवनावर आदेश देत आहे की येशूच्या नावाने तुमच्यावर कृपा करण्यात येईल.

अनेक लोक जीवनात रिकामी आहेत; त्यांना एकतर प्रत्यक्षात किंवा आध्यात्मिक रीतीने लुटले किंवा त्यांची फसवणूक केली गेली आहे. इस्राएली लोक मिसर देशातून रिकामी हाती निघून गेले असते, परंतु देवाच्या कृपेने धन, गौरव आणि संपत्तीसह ते तेथून निघून गेले. देवाची कृपा तुमच्या वाया गेलेल्या वर्षांसाठी दैवीरीत्या भरपाई करू शकते.

देवाची कृपा मनुष्याच्या जीवनात काय करू शकते?
१. देवाची कृपा लोकांना तुमची दखल घेण्यास लावते.
हे एक जागरुकता निर्माण करते आणि लोकांना तुमच्याबद्दल सकारात्मक छाप ठेवण्यास प्रवृत्त करते.
तेव्हा ती त्यास दंडवत घालून म्हणाली, "मज परक्या स्त्रीवर आपण कृपादृष्टि करून माझा समाचार घेतला याचे काय कारण बरे?" (रुथ २:१०)

२. देवाची कृपा उन्नतीची शास्वती देते 
"कारण त्यांच्या बलाचे वैभव तूं आहेस; तुझ्या प्रसादाने आमचा उत्कर्ष होत राहील." (स्तोत्रसंहिता ८९:१७)

३. कृपा तुमच्यासाठी देवाचे साहाय्य सुरक्षित करते
जेव्हा जेव्हा आपल्याला साहाय्याची गरज लागते, आपण देवाच्या कृपेसाठी रडू शकतो. दैवी कृपेमध्ये वाढ, अधिक साहाय्यासाठी मार्गदर्शन करेल.

"हे परमेश्वरा, तूं आपल्या लोकांवर प्रसन्न होतोस, तेव्हा माझी आठवण कर; माझ्या उद्धारार्थ मला दर्शन दे." (स्तोत्रसंहिता १०६:४)

४. वैवाहिक स्थिरतेसाठी देवाच्या कृपेची गरज असते
देवाच्या कृपेनेच तुम्हांस योग्य जोडीदार मिळेल, सौंदर्य, संपत्ति किंवा शारीरिक दिसण्याने नाही.
"ज्याला गृहिणी लाभते त्यास उत्तम लाभ घडतो. त्यास परमेश्वराचा अनुग्रह प्राप्त होतो." (नीतिसूत्रे १८:२२)

५. देवाच्या कृपेने, तुम्ही देवाकडून काहीही मागू शकता.
कृपेनेच देव आपल्या विनंत्या प्रार्थनेने मान्य करतो. जर कृपेचा अभाव असेल, तर प्रार्थनेला उत्तर मिळणार नाही. प्रार्थनेच्या ठिकाणी कृपा ही फारच महत्वाची आहे.

"तो त्याला म्हणाला, तुझा माझ्यावर प्रसाद झाला असल्यास तूच माझ्याशी बोलत आहेस ह्याचे मला काहीं चिन्ह दाखीव." (शास्ते ६:१७)

६. देवाची कृपा हीच आपल्याला त्याच्या दयेचा अनुभव घेऊ देते.
अनुग्रह, दया, कृपा आणि देवाची प्रीति कशी कार्य करते हे जेव्हा तुम्ही समजता, तेव्हा तुम्ही देवाचा उत्तम आनंद घ्याल. कृपेशिवाय, दया ही उपलब्ध असणार नाही, आणि दयेची अनुपस्थिती न्यायाकडे नेईल. जेव्हा दया असते, तेव्हा ती न्यायावर विजय मिळविते.

"परदेशचे लोक तुझे कोट बांधीत आहेत,
त्यांचे राजे तुझी सेवा करीत आहेत;

कारण मी क्रोधाविष्ट होऊन तुला ताडिले तरी आता मी प्रसन्न होऊन तुजवर दया केली आहे." (यशया ६०:१०)
"कारण ज्याने दया केली नाही त्याचा न्याय दयेवाचून होईल; दया न्यायावर विजय मिळविते." (याकोब २:१३)

ज्यांनी कृपेचा आनंद घेतला त्यांची पवित्रशास्त्रील उदाहरणे:

  • येशू
लूक २:५२ नुसार, आपण स्पष्टपणे पाहू शकतो की कृपा तसेच ज्ञान हे वाढू शकते. जर येशूला पृथ्वीवरील त्याचे कार्य पूर्ण करण्यासाठी कृपेची गरज आहे, तर तुम्ही कोण आहात ज्यांस याची गरज नाही? कृपा ही जीवनास महत्वाची आहे; हेच मनुष्याचे जीवन सोपे करते.

  • मरीया, येशूची आई
देवाच्या कृपेनेचे मरीयेची निवड करण्यात आली. नगरात तेथे इतर अनेक कुमारी होत्या, परंतु देवाच्या कृपेने तिला निवडिले. त्या इतर कुमारीकांवर देखील कृपा करण्यात आली, परंतु पावितशास्त्र सांगते, मरीयेवर, "अत्यंत कृपा केली". कृपा ही स्तरांमध्ये आहे, आणि त्यालाच "अत्यंत कृपा" असे म्हणतात, येशूच्या नावाने तुम्ही अत्यंत कृपेचा आनंद घेऊ शकता. (लूक १:२८, ३०)

कृपेचा आनंद घेण्यासाठी काय करावे?

  • देवाच्या वचनाचे आज्ञापालन करा
वचनाचे पालन केल्याने तुम्हाला देवाच्या कृपेचा किती आनंद मिळेल हे निश्चित होईल.

"माझ्या मुला, माझे धर्मशास्त्र विसरू नको, तुझ्या चित्तात माझ्या आज्ञा वागोत;
कारण त्यापासून दीर्घ आयुष्य, वयोवृद्धि व कल्याण ही तुला प्राप्त होतील.
दया व सत्य ही तुला न सोडोत; त्यांची माळ तूं आपल्या गळ्यांत वागीव;
त्यास आपल्या हृत्पटलावर लिहून ठेव;
म्हणजे तुला देव व मनुष्य यांजकडून,
अनुग्रह व सुकीर्ति ही प्राप्त होतील." (नीतिसूत्रे ३:१-४)

  • नम्र व्हा
अनुग्रहासाठी आणखी एक शब्द हा "कृपा" आहे. नम्रता आपल्याला देवाची कृपा मिळविण्यास कारणीभूत होते. एक गर्विष्ठ मनुष्य विचार करतो की तो सक्षम व स्वतंत्र आहे; असा व्यक्ति नबुखद्दनेस्सर सारखा आहे, जो याबाबतीत अज्ञानी होता की त्याचे यश, विजय, कीर्ती आणि संपत्ति हे त्यास देवाने दिलेले आहे. गर्व हे तुम्हाला देवाच्या कृपेपासून हिरावून घेऊ शकते.

"तूं निजतेवेळी भिणार नाहीस; तूं निजशील आणि तुझी झोप सुखाची होईल." (नीतिसूत्रे ३:२४)

  • इतरांशी चांगले वागा
लोक ज्यांना तुम्ही पसंत करतात किंवा ते जे तुमच्याबरोबर चांगले आहेत त्यांच्यापुरतेच तुमची दया मर्यादित नसली पाहिजे. तुम्ही तुमच्या स्वर्गीय पित्यासारखे असले पाहिजे आणि अटी विना इतरांना प्रीति करावी.
"सज्जनाला परमेश्वराचा प्रसाद घडतो, परंतु दुष्टपणाच्या युक्ती योजणाऱ्याला तो दोषी ठरवितो." (नीतिसूत्रे १२:२)

४३ ‘आपल्या शेजार्‍यावर प्रीति कर व आपल्या वैर्‍याचा द्वेष कर,’ असे सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे.
४४ मी तर तुम्हांला सांगतो, तुम्ही आपल्या वैर्‍यांवर प्रीति करा, आणि जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा.
४५ अशासाठी की, तुम्ही आपल्या स्वर्गातील पित्याचे पुत्र व्हावे; कारण तो वाइटांवर व चांगल्यांवर आपला सूर्य उगववतो आणि नीतिमानांवर व अनीतिमानांवर पाऊस पाडतो.
४६ कारण जे तुमच्यावर प्रीति करतात त्यांच्यावर तुम्ही प्रीति केली तर तुमचे प्रतिफळ काय? जकातदारही तसेच करतात ना?
४७ आणि तुम्ही आपल्या बंधुजनांना मात्र प्रणाम करत असलात तर त्यात विशेष काय करता? परराष्ट्रीयही तसेच करतात ना?
४८ ह्यास्तव जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे तसे ‘तुम्ही पूर्ण व्हा.’ (मत्तय ५:४३-४८)

  • कृपेसाठी प्रार्थना करा
कृपा ही दैवी आशीर्वादाचा प्रकार आहे; तुम्ही कोणत्याही परिस्थितीसंबंधी कृपा मागू शकता. परमेश्वर मनुष्यांसमोर तुम्हांवर कृपा करण्यास तयार आहे.

"कारण तूच नीतिमानाला आशीर्वाद देतोस;
हे परमेश्वरा, तूं त्याच्याभोवती कवचाप्रमाणे कृपेचे वेष्टण घालितोस." (स्तोतसंहिता ५:१२)

पुढील अभ्यासासाठी: उत्पत्ति ६:८; १ शमुवेल १६:२२; प्रेषित ७:१०
प्रार्थना
आपल्या अंत:करणातून येईपर्यंत प्रत्येक प्रार्थना अस्त्र वारंवार म्हणत राहा, त्यानंतरच पुढील प्रार्थना अस्त्राकडे वळा. (ते वारंवार म्हणा, त्यास व्यक्तिगत करा, आणि प्रत्येक प्रार्थना मुद्द्यासह हे किमान १ मिनिटे करा.)

१. पित्या, येशूच्या नावाने तुझी कृपा माझ्या जीवनात वाढावी असे कर.

२. परमेश्वरा, येशूच्या नावाने पूर्वी जेथे माझा अस्वीकार केला गेला तेथे स्वीकारावे असे कर.

३. येशूच्या नावाने या हंगामात आणि या महिन्यात मजवर कृपा करण्यात येईल.

४. पित्या, येशूच्या नावाने लोकांनी मजवर कृपा करावी असे कर.

५. पित्या, मला आर्थिकदृष्ट्या आशीर्वादित कर म्हणजे मी देखील इतरांना आशीर्वाद देऊ शकावे.

६. येशूच्या नावाने माझ्या जीवनातील कृपेविरोधातील प्रत्येक वृत्ति मी उखडून टाकतो.

७. हे परमेश्वरा, येशूच्या नावाने तुझी कृपा माझ्या व्यवसायावर होऊ दे.

८. पित्या, उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिमेकडून मला येशूच्या नावाने शोधण्यासाठी तुझी कृपा कर.

९. मी आदेश देत आहे की आशीर्वाद, उन्नति, संपत्ति आणि संधीचे प्रत्येक द्वार येशूच्या नावाने अग्निद्वारे उघडले जावे.

१०. माझी प्रगती होण्यापासून कोणतीही शक्ती जी मला रोखत आहे तिला येशूच्या नावात मी मोडून काढतो.

११. पित्या, तुझ्या कृपेने, प्रत्येक आशीर्वादविरोधी योजना व अडथळ्यांना मी तपासत आहे.

१२. परमेश्वरा, या २१ दिवसांच्या उपासात सहभागी होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा व माझा येशूच्या नावाने तुझ्या गौरवासाठी उपयोग कर.

Join our WhatsApp Channel


Most Read
● केवळ इतरत्र धावू नका
● दिवस १७ : ४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
● आमचे नको
● दिवस ३०:४० दिवसांचा उपवास आणि प्रार्थना
● त्या विश्वासांना मर्यादित करणे जे तुम्हाला अडखळण करते
● देवाने एवढी प्रीती केली की त्याने दिला
● यहूदा च्या जीवनाकडून धडा- ३
टिप्पण्या
संपर्क
फ़ोन: +91 8356956746
+91 9137395828
व्हाट्स एप: +91 8356956746
ईमेल: [email protected]
पता :
10/15, First Floor, Behind St. Roque Grotto, Kolivery Village, Kalina, Santacruz East, Mumbai, Maharashtra, 400098
आमच्या सामाजिक नेटवर्कवर सामील व्हा!
Download on the App Store
Get it on Google Play
मेलिंग यादीमध्ये सामील व्हा
अन्वेषण
कार्यक्रम
थेट प्रसारण
नोहाट्यूब
टी.वी.
देणगी
डेली मन्ना
स्तुती
अंगीकार
स्वप्ने
संपर्क
© 2025 Karuna Sadan, India.
➤
लॉग इन
कृपया या साईट वर टिपणी आणि कंमेंट करण्यासाठी आपल्या NOAH खात्यावर प्रवेश करा |
लॉग इन